28/05/2026
त्याग, श्रद्धा, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र ईद-उल-अजहा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा. सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजहा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Committed to the welfare of Mumbai and it’s People !
28/05/2026
त्याग, श्रद्धा, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र ईद-उल-अजहा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा. सर्व मुस्लिम बांधवांना ईद-उल-अजहा निमित्त हार्दिक शुभेच्छा!
21/05/2026
08/05/2026
08/05/2026
दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!
तुमच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा हा सुंदर विजय आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. तुमच्या या यशामुळे कुटुंब, शिक्षक आणि समाजाचा गौरव वाढला आहे.
आयुष्यातील पुढील प्रत्येक पाऊल यश, प्रगती आणि नव्या संधींनी भरलेले असो, हीच शुभेच्छा!
ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही, त्यांनी निराश होऊ नये. अपयश हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, पुन्हा जोमाने प्रयत्न करा. यश तुमची नक्की वाट पाहत आहे!
सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
”
06/05/2026
समतेचा विचार कृतीत उतरवणारे, शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र बनवणारे आणि बहुजनांना न्यायाचा हक्क मिळवून देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचे प्रेरणास्थान आहेत.
सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, वंचित घटकांना “सत्तेत वाटा” मिळावा आणि समाजात समानतेची भावना रुजावी यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
लोककल्याण, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
04/05/2026
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आदरणीय दादांच्या कामगिरीला आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री मा.ना.श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला सन्मान देत बारामतीच्या माय-बाप जनतेने अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
मा. ना. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना विक्रमी विजयाबद्दल त्यांचे आदरपूर्वक अभिनंदन!
आदरणीय अजितदादांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत विजयाची ही वाटचाल महाराष्ट्राला अधिक समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.
पुनःश्च अभिनंदन !!!
03/05/2026