Shree Jai Hanuman Vyayam Shala, Ramwadi

Shree Jai Hanuman Vyayam Shala, Ramwadi

Share

विलेपार्ले (पूर्व) नगरीत आपली संस्था कार्यरत असून सहा दशकांहून अधिक काळ आपला समृध्द वारसा जपत आहे.

17/04/2025

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !

27/08/2024

६९ व्या वर्षी कडकडीत ७ थर लावून दाखवले…..✨💥

आज या लागलेल्या ७ थरांमध्ये फक्त एका दिवसाची मेहनत नाही तर ७० वर्षांची तपश्चर्या आहे… वाडवडिलांनी १९५५ साली साडेचार थरांपासून गोविंदा खेळायला सुरुवात केली होती. ती परंपरा आज विद्यमान असणाऱ्या सगळ्यांनी फक्त जपली नाही तर वाढवली फळवली आणि पुढेही नेली…
आज कडक ७ थर लागल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून येणारं पाणी हीच आमच्या वाडवडिलांना आमची मानवंदना…..🚩

आम्ही चालवू हा पुढे वारसा…….✨🙏🏼




17/04/2024

॥ श्री रामचंद्रोविजयतेराम् ॥

शुक्रवार, दिनांक ५ एप्रिल २०२४ फाल्गुन कृ. पापमोचिनी एकादशीच्या सुमुहूर्तावर श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी विलेपार्ले पूर्व येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिरात श्रींच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साह आनंद आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या आनंद सोहळ्याची ही छोटीशी ध्वनीचित्रफीत…



॥ जय हनुमान ॥

04/04/2024

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥



18/09/2023

धन्यवाद Aamhi Parlekar ✨🌼

प्रिय वाचक,
'आम्ही पार्लेकर' - सप्टेंबर २०२३ च्या अंकाची लिंक खालील प्रमाणे :-
https://www.parlekar.com/aamhi-parlekar-september-2023/
( क्लिक होत नसल्यास कृपया वरील लिंक ब्राउझर मध्ये कॉपी-पेस्ट करावी )

आपला,
ज्ञानेश चांदेकर
संपादक

08/09/2023

" आम्ही पार्लेकर " समूहाचे मनापासून धन्यवाद ✨🙏🏽

'गोविंदा रे गोपाळा' म्हणत विलेपार्ल्यातील पहिल्या गोविंदा पथकाचा यशस्वी दहिकाला

७ सप्टेंबर रोजी पार पडलेला दहिकाला उत्सव महाराष्ट्राभर आनंदाने साजरा झाला. यामध्ये विलेपार्ले येथील 'श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी' या जुन्या जाणत्या गोविंदा पथकाने आपल्या दहीकाला उत्सवाची यंदा... Read more सविस्तर वाचा 'आम्ही पार्लेकर' च्या वेबसाइटवर https://www.parlekar.com/a-successful-celebration-of-the-first-govinda-team-in-vileparly-called-govinda-re-gopala/

Photos from Shree Jai Hanuman Vyayam Shala, Ramwadi's post 07/09/2023

आम्ही जपली ६८ वर्षांची उज्ज्वल परंपरा....

एक, दोन, तीन मग दहा मग पंचवीस मग पन्नास मग साठ अशा वर्षांची गणना कोणत्याही संस्थेच्या स्थापनेनंतर केली जातेच. पण या एक एक वाढणाऱ्या वर्षागणिक त्या संस्थेतल्या सदस्यांवरची जबाबदारी शतपटीने वाढत जाते. ही जबाबदारी असते संस्थेचे उद्दिष्ट जपण्याची, ही जबाबदारी असते संस्थेचा नाव लौकीक वाढवण्याची आणि ही जबाबदारी असते उत्तमापासून सर्वोत्तमापर्यंतच्या प्रवासाची...
आज श्री जय हनुमान व्यायाम शाळेतील प्रत्येक सदस्याला आपल्या वाडवडीलांनी आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला आपण आपापल्या परीने का असेना पण यथा शक्ती यथा मती न्याय दिल्याचे समाधान निश्चितच असेल.
संस्थेने यंदाचाही गोविंदा साऱ्या बाळ गोपाळांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणालाही इजा न पोहोचता उत्साह आनंदाने साजरा केला. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत हे ही यशस्वी गोविंदाचे पुष्प संस्थेतील साऱ्याच बाळगोपाळ, थोरा मोठ्यांनी अतिशय श्रद्धेने मारुतीरायाच्या चरणी अर्पण केले.
आज दिवसभर मानवी मनोरे रचून जी काही बक्षिस मिळवली ती सारी बक्षीसं मारुतीरायासमोर ठेवताना प्रत्येक गोविंदाच्या मनात , "इदं न मम" हाच भाव होता.
हे गणपती गजानना, हे मारुतीराया तुमच्या या आशीर्वादाने संस्थेचा नावलौकिक असाच वाढत राहू दे, तुमचे आशीर्वाद प्रत्येक बाळगोपाळावर अखंड बरसत राहू दे. ज्या काही चुका कळत नकळतपणे आमच्याकडून झाल्या असतील त्या पदरी घालून घे आणि आमच्याकडून तुमची ही सेवा अशीच अखंड अविरतपणे होत राहू दे......

✨ आजच्या दहीकाला उत्सवाचे आणखीही व्हिडियो तसेच रंजक आठवणी तुम्हाला आमच्या या पेजवर पाहायला मिळतील. ✨

बोल बजरंग बली की जय !
जागेवाले की जय !

Photos from Shree Jai Hanuman Vyayam Shala, Ramwadi's post 06/09/2023

आज रात्री बरोबर बारा वाजता कृष्ण जन्माचा पाळणा हलेल. वाडीतल्या बाळगोपाळांच्या आरतीचे "जय जय देव जय देव" असे सूर पुन्हा एकदा रामवाडीचां ठाव घेतील. ढोलकीच्या तालावर टाळांच्यासाथीने वाडीतली पोरं पुन्हा एकदा
"गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा,
अरे तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा रे गोपाळा
गोविंदा आला रे आला, हा रामवाडीवाला,
गोविंदा साठी रे साठी दही दुधाची वाटी,
गोविंदा रे गोपाळा...."
या तालावर ठेका धरतील. इतक्या दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली गोविंदांची तालीम आज पूर्ण होईल. आपल्या दिवसभरातल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत सरावाला येणारा प्रत्येक बाळगोपाळाच्या समर्थ खांद्यावरच आज श्री जय हनुमान व्यायाम शाळा रामवाडीचां ६८ वर्षांचा गोविंदा दिमाखात उभा आहे.

इथे स्पर्धा नाही, तर आहे उत्सवाचां आनंद,
इथे उंचच उंच मनोरे रचण्याची धडपड नाही, तर आहे एकमेकांना सांभाळून घेत आपला उत्सव वेगळ्याच उंचीवर नेण्याची जिद्द,
इथे आहे प्रेम, इथे आहे विश्वास, इथे आहे उमेद, इथे आहे आशा आणि इथे आहे आपली परंपरा जपण्यासाठीची तयारी...

याच ताकदीवर आज श्री जय हनुमान व्यायाम शाळेची ही ६८ वर्षांची दैदिप्यमान परंपरा उभी आहे आणि यापुढेही निश्चितच उभी राहिलं.

बाळगोपाळांनो, उद्या ऐन उत्सवाचा दिवस. उद्याचा उत्सव हा जसा आपण उत्साह आनंदाने जल्लोषाने साजरा करणार आहोत. तसच या उत्साह आनंद जल्लोषासोबत आपल्यावर जबाबदारीचही आहे. जबाबदारी कोणत्याही गोविंदाला इजा होणार नाही याची, जबाबदारी एकमेकांच्या सुरक्षिततेची, जबाबदारी प्रशासनाला सहकार्य करण्याची, जबाबदारी शिस्तीची ऐक्याची आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची. जबाबदारी आपल्या उत्सवाला डाग लागेल अशी छोटीशी देखील कृती आपल्या हातून घडणार नाही याची.....
अशा साऱ्या जबाबदाऱ्या पाळून आपल्याला उद्याचा गोविंदा थाटामाटात साजरा करायचा आहे.... मग तयार आहात ना!

बोल बजरंग बली की जय !
जागेवाले की जय !

25/08/2023

२३ ऑगस्टचां दिवस हा फक्तं भारताच्याच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिला जावा असा.. इस्रोने चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वीरीत्या लँडिंग करून भारताच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला. या निमित्ताने भारतीय शास्त्रज्ञ वैज्ञानिकांच्या आणि चांद्रयान ३ मोहिमेत सहभागी असणाऱ्या साऱ्याच घटकांना आपल्या श्री जय हनुमान व्यायाम शाळा रामवाडी या मुंबईतील ६८ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या दहीकाला पथकातर्फे पाच थरांचा मानवी मनोरा उभारत तिरंगा फडकवून सलामी देण्यात आली. याच घटनेची "महाराष्ट्राचा गोविंदा" या पेजने घेतलेली दखल.
शून्यातून प्रवास सुरू करत अवकाशात झेपावण्यासाठी भारताला सर्वसमर्थ राष्ट्र म्हणून नव्याने ओळख करून देणाऱ्या साऱ्या शास्त्रज्ञ वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन.






Photos from Shree Jai Hanuman Vyayam Shala, Ramwadi's post 25/08/2023

६८ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेला गोविंदा....

श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी हे आपलं गोविंदा पथक यावर्षी ६८ वर्षांची वाटचाल पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल करीत आहे. मुंबई उपनगरातील सगळ्यात आधीच्या गोविंदा पथकांपैकी एक असलेले आपले श्री जय हनुमान व्यायाम शाळा रामवाडीचे गोविंदा पथक हे आताच्या उंचच उंच मानवी मनोरे रचण्याच्या स्पर्धेसाठी नाही तर आपल्या हिंदू उत्सवांची उज्ज्वल परंपरा जोपासणारे म्हणून ओळखले जाते. स्व. श्री. हरिभाऊ बुरटे मास्तरांच्या कडक शिस्तीच्या तालमीत वाढलेल्या या आपल्या संस्थेने अगदी तीन चार , साडेचार थरांपासून मानवी मनोरा उभारायला सुरूवात केली आणि त्याच शिस्तीत आजही कडक असे ६ थर लावून मंडळाने आपला नावलौकिक राखला आहे.
यंदाही त्याच उत्साहात आनंदात आणि जल्लोषात श्री जय हनुमान व्यायाम शाळा रामवाडीचा बाळगोपाळ दहीहंडी साजरी करण्यासाठी निघणार आहे. तालीम तर सुरू झाली आहेच. यंदाच्याही वर्षी आपल्या मंडळाचे नाव गाजू दे सुखरूपपणे याही वर्षीचा उत्सव प्रत्येक गोविंदा साजरा करू दे हीच श्री मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना.....
मग पार्लेकरांनो येताय ना यंदाही तुम्ही, आपल्या रामवाडीच्या बाळ गोपाळांचा गोविंदा बघायला....!

बोल बजरंग बली की जय!
जागेवाले की जय !
अरे एक दोन तीन चार रामवाडीची पोरं हुशार!
अरे एक दोन तीन चार हरी मास्तरांची पोरं हुशार!







Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ramwadi, Mahant Road, Vileparle ( E )
Mumbai
400057