National Service Scheme Maharashtra

National Service Scheme Maharashtra

Share

राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र
🤝 "स्वतःसाठी नव्हे, तर इतरांसाठी"
🌱 सेवा | नेतृत्व | सामाजिक बांधिलकी
🇮🇳 युवा शक्ती राष्ट्रासाठी

09/07/2026

🚩 पुणे ते पंढरपूर आषाढी वारी २०२६ 🚩

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वच्छ वारी • स्वस्थ वारी • निर्मल वारी • हरित वारी' या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय तणावमुक्ती व व्यसनमुक्ती विशेष दिंडी उत्साहात सहभागी होत आहे.

📅 ९ ते २५ जुलै २०२६

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सेवाभाव, जनजागृती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देत वारकऱ्यांसोबत पायी चालत आहेत.

सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेला बळ देत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्त समाजासाठी चला, आपणही या जनचळवळीत सहभागी होऊया.

जनजागृती • समाजप्रबोधन • सेवाभाव



(SwasthWari NirmalWari HaritWari Vyasanmukti StressFreeMaharashtra YouthForChange HigherAndTechnicalEducation Maharashtra Sevabhav NSSVolunteers)

Photos from National Service Scheme Maharashtra's post 02/07/2026

पोलिओमुक्त भारताच्या दिशेने एक सामूहिक पाऊल! 💉🇮🇳

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत उत्साहाने सहभाग घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली आणि बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.

निरोगी, सशक्त आणि पोलिओमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.



(Maharashtra CommunityService स्वच्छ_निरोगी_भारत)

21/06/2026
Photos from National Service Scheme Maharashtra's post 09/06/2026

१० जून – जागतिक नेत्रदान दिन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या नेत्रदान जनजागृती अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, संवेदनशीलता आणि मानवतेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न.

नेत्रदान हे केवळ दान नाही, तर एखाद्या दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची संधी आहे. चला, नेत्रदानाचा संकल्प करूया आणि समाजात जनजागृती घडवूया.

“नेत्रदान – श्रेष्ठ दान” 👁️






(HigherAndTechnicalEducation, MaharashtraGovernment, StudentPower, SocialResponsibility, GiftOfSight, VisionForAll ChandrakantDadaPatil, Maharashtra, NSSActivities, EyeDonationAwareness)

Photos from National Service Scheme Maharashtra's post 09/06/2026

नेत्रदान जनजागृती अभियान

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना (NSS), महाराष्ट्र यांच्या माध्यमातून राज्यभर नेत्रदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

🏫 ७०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग

📍 महाराष्ट्रव्यापी जनजागृती उपक्रम

👨‍⚕️ नेत्र चिकित्सा शिबिरे

🤝 सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश

"आपल्या एका संकल्पातून एखाद्याच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण होऊ शकतो."
नेत्रदान – महादान ✨




09/06/2026

👁️ १० जून – जागतिक नेत्रदान दिन

मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात नेत्रदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

विद्यापीठे, महाविद्यालये आणि हजारो NSS स्वयंसेवकांच्या सहभागातून नेत्रदानाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

नेत्रदान म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याची संधी.

चला, आपणही या जनजागृती अभियानाचा भाग बनूया.

✨ नेत्रदान – महादान






(ChandrakantDadaPatil, HigherAndTechnicalEducation, Maharashtra, StudentPower, SocialResponsibility, EyeDonationAwareness, GiftOfSight, YouthForChange, NSSVolunteers, VisionForAll)

Photos from National Service Scheme Maharashtra's post 09/06/2026

नेत्रदान जनजागृती, वृक्षारोपण आणि योग अभियानाचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. ९ जून : विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाबाबत जागरूकता आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, संबंधित विभागीय अधिकारी, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे आदी उपस्थित होते. राज्यातील विविध विद्यापीठांचे एनएसएस संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह ६७० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,
नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान आहे.१० जून जागतिक नेत्रदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे..तसेच नेत्रदान जनजागृती उपक्रमांसोबत नेत्रतपासणी व नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करून हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावाआणि समाजातील नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करावे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ जून २०२४ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'एक पेड माँ के नाम' (एक झाड आईच्या नावाने) या देशव्यापी अभियानाचा प्रारंभ केला. या मोहिमेंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आईच्या सन्मानार्थ आणि आईच्या नावाने एक रोपटे लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणे, हरित आवरण (Green Cover) वाढवणे आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उद्देश असून हे अभियान एक मोठी जनचळवळ बनली आहे.त्यामुळे ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.




09/06/2026

👁️ जागतिक नेत्रदान दिन | १० जून

मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजना (NSS), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यभर नेत्रदान जनजागृती अभियान व नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

🏫 ६७ विद्यापीठे
🎓 ७०० हून अधिक महाविद्यालये
🤝 हजारो NSS स्वयंसेवक
यांच्या सहभागातून नेत्रदानाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.
"नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान!" 👁️✨






(Maharashtra, EyeDonationAwareness, SevaParmoDharma YouthForChange, NSSVolunteers, VisionForLife, नेत्रदान, जागतिकनेत्रदानदिन, राष्ट्रीयसेवायोजना, महाराष्ट्रNSS)

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Department Of Higher & Technical Education Mantralaya
Mumbai
400001