18/08/2025
We are delighted to welcome Shri T. D. Kasar Sir as the new Managing Director & CEO of Maharashtra Housing Development Corporation Ltd. ✨
Under his dynamic leadership, we look forward to achieving new milestones in affordable and sustainable housing.
We also take this moment to express heartfelt gratitude to Shri Vivek Dahiphale Sir for his dedicated leadership and invaluable contributions during his tenure. 🙏
15/08/2025
स्वतंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 🇮🇳
24/07/2025
आज दिनांक २४ जुलै २०२५ रोजी मंत्रालयीन दालन, मुंबई येथे मा. गृहनिर्माण राज्यमंत्री तथा सहअध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (महा-हौसिंग) यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या विविध योजनांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस महा-हौसिंगचे मा. व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सद्यस्थिती, अंमलबजावणीची गती, भौतिक व आर्थिक प्रगती, प्रलंबित प्रकरणांची सोडवणूक तसेच आगामी धोरणात्मक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
मा. गृहनिर्माण राज्यमंत्री तथा सहअध्यक्ष यांनी अडथळ्यांची तातडीने सोडवणूक करून प्रकल्पांची गती वाढवण्याचे निर्देश दिले. पारदर्शक प्रक्रिया, वेळेत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देणे व गरजूंना प्राधान्य देणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
26/05/2025
महाहौसिंगमार्फत सोलापूर येथे सुरु असलेल्या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी कामकाजाचा आढावा घेण्यासंदर्भात शनिवार दिनांक - २४/०५/२०२५ रोजी महाहौसिंगचे मा.व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी- श्री. विवेक दहिफळे साहेब तसेच महाहौसिंगचे मा.संचालक प्रशासन/विपणन/जमीन - श्री. प्रविण कोळी साहेब यांनी भेट दिली.
08/03/2025
Happy International Women’s Day!
Today, we honor the incredible strength and resilience of women in our lives and workplaces.
Let’s celebrate our achievements and continue to uplift each other as we work towards equality and empowerment for all.
01/01/2025
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुमच्या स्वप्नांना वाचा देण्यासाठी नवीन वर्ष २०२५ तुमचं उत्तम वर्ष असो! 🌈🎇
17/10/2024
Congratulations to Hon. Shri. Vivek Dahiphale Sir on stepping into the role of Managing Director at MahaHousing. A big thank you to Hon. Shri. Ajit Kawade Sir for his outstanding leadership.
14/10/2024
The signing of a master MOU between the Maharashtra Housing Development Corporation Limited (MHDC) and IIFL on 6th September 2024 marks a significant step forward in housing development initiatives. The agreement was formalized between Mr. Ajit M Kawade, Managing Director & CEO of MHDC, and Mr. Piyush Mediratta, Head of Government Business, Maharashtra, IIFL.
30/09/2024
प्रधानमंत्री आवास योजना अनुदान: रुपये २.५ लाख
पात्र बांधकाम कामगारांसाठी अतिरिक्त अनुदान: रुपये २ लाख
मजरेवाडी, सोलापूर
गट क्र. 69/1/A नई जिंदगी रोड,
विमानतळाच्या बाजूला,
1 BHK सदनिका 2 बाल्कनींसह
केवळ रुपये १०,१६,६६६/-
संपर्क करा : ८८२८४०३६४२/८८२८४८९८०५
28/09/2024
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण २०२४ च्या धोरणाबाबत सूचना
महाराष्ट्र शासनाचा गृहनिर्माण विभाग २०२४ मध्ये राज्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण तयार करीत आहे. अखेरचे गृहनिर्माण धोरण २००७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले असून त्यात मुंबईसाठी विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियम (डीसीपीआर) आणि राज्यासाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन विनियम (यूडीसीपीआर) लागू करण्यात आले आहेत. या बदलांचा महाराष्ट्रातील स्थावर संपदा क्षेत्रावर खोलवर परिणाम झाला आहे. ‘सर्वांसाठी घरे हे आव्हान पेलण्यासाठी आणि झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नव्या गृहनिर्माण धोरणात लोकसंख्येच्या ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
नवीन गृहनिर्माण धोरणात बांधकाम खर्च कमी करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता समाविष्ट करणे आणि त्याद्वारे परवडणारी घरे हे उद्दीष्ट आहे. हवामान बदलाचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम गृहनिर्माण धोरणात संबंधित घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे हरित आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची गरज अत्यंत महत्त्वाची बनली आहे. या बाबींचा विचार करून राज्यासाठी नवे गृहनिर्माण धोरण तयार करणे आवश्यक आहे, परवडणारी, सर्वसमावेशक, शाश्वत आणि पुनर्निर्माणशील घरे पुरवून घरांची उपलब्धता सुधारण्यावर गृहनिर्माण धोरणात भर देण्यात आला आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील वाढीचा संबंधित क्षेत्रांवर आणि त्याद्वारे अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक परिणाम याचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट आहे.
सर्व भागधारकांनी दिनांक ०३/१०/२०२४ पर्यंत दस्ताऐवजातील प्रस्तावावर आपल्या सुचना ईगेलद्वारे [email protected] सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृपया नमूद केलेल्या तारखेनंतर सादर केलेल्या सूचना / मते विचारात घेतली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Please check the following link :
https://drive.google.com/file/d/1kyeSPQ27DSGyB1RGpYBok7BMgAZEZl27/view?usp=drivesdk
13/09/2024
We were delighted to welcome Mr. Sanjay Shukla, Managing Director, and Mr. Anuj Rastogi, General Manager, of NHB to Mahahousing. Their visit underscores our strong partnership and shared commitment to advancing housing solutions. Together, we’re building a better tomorrow!
08/09/2024
आत्ताच घर बूक करा आणि मिळवा तुमचा आनंदाची गुरुकिल्ली !!!