11/03/2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e - kyc करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याने ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना e - kyc दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
आज अखेर सुमारे 18 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन e- kyc दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी.
दुरुस्ती करण्याकरिताची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.
दुरुस्ती करण्याकरिता ladakibahin.maharashtra.gov.in या लिंक वर भेट द्यावी व दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी!
08/03/2026
तिच्या सामर्थ्यानेच समाज घडतो.
तिच्या स्वप्नांनीच भविष्य उजळते.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#महिलादिन
05/03/2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e - kyc करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याने ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना e - kyc दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
आज अखेर सुमारे 17 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन e- kyc दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करावी.
दुरुस्ती करण्याकरिताची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.
दुरुस्ती करण्याकरिता ladakibahin.maharashtra.gov.in या लिंक वर भेट द्यावी व दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी!
02/03/2026
आपणा सर्वांना होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
19/02/2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या अद्वितीय शौर्याला, दूरदृष्टीला आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराला विनम्र अभिवादन.
त्यांचे आदर्श स्त्री-शक्ती आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी आहेत.
#शिवजयंती #सशक्तमहाराष्ट्र
07/02/2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!
e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना
28/01/2026
भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो .
24/01/2026
मुलगी म्हणजे सामर्थ्य. मुलगी म्हणजे भविष्य.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना पंख देऊया.
14/01/2026
मकर संक्रांत शुभेच्छा ✨
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला
नवीन उर्जा, सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येवो ही मकर संक्रांत 🌾🪁
सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
नव्या आशा, नव्या संधी आणि आनंदाने जीवन उजळो हीच सदिच्छा.
#मकरसंक्रांत #तिळगूळ #उत्सव #हार्दिकशुभेच्छा #समृद्धी #सकारात्मकता
22/12/2025
तुमची वैयक्तिक नि:शुल्क डिजिटल लायब्ररी — कुठेही, कधीही!
13/12/2025
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.
सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे.
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.
#लाडकीबहीणयोजना #लाडकीबहीण
02/12/2025
स्वच्छतेची छोटी सवय, निरोगी आयुष्याची मोठी कमाई.