03/06/2026
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, मा. श्री. आनंद परांजपे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य संघटन प्रमुख पदी (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) नियुक्ती करण्यात येत आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
03/06/2026
📍 रेवदंडा, #रायगड |
ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. श्री. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आज त्यांच्या #रेवदंडा येथील निवासस्थानी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे सुपुत्र सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांचीही भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याशीही एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.
यावेळी रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि धर्माधिकारी कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
03/06/2026
वारसा हिंदुत्वाचा ! संकल्प भव्य कुंभमेळ्याचा ! कुंभमेळ्यासाठी ४५०० एसटी बसचे नियोजन, तसेच विशेष रेल्वेही सोडण्यात येणार !
03/06/2026
आता प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित होणार
03/06/2026
शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा विधानसभानिहाय शिवसंवाद दौऱ्याचा दुसरा टप्पा ५ आणि ६ जून, २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा अधिकृत दौरा पुढील वेळापत्रकानुसार पार पडेल.
03/06/2026
गुजरातमधल्या सुरत जिल्ह्यातील बारडोलीजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचा अपघात झाल्याची दुर्घटना काल उशिरा घडली. या दुर्घटनेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर या मृतात्म्यांस शांती प्रदान करो. तसेच, या अपघातातील जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. या दुर्घटनेतील मृतांना शिवसेना पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
03/06/2026
माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन !
02/06/2026
डिझेलपासून इलेक्ट्रिककडे...
२०४७ पर्यंत एसटी बस होणार पूर्णतः इलेक्ट्रिक!
आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाच्या दिशेने महाराष्ट्राचे ऐतिहासिक पाऊल…