ABVP North Mumbai

ABVP North Mumbai

Share

Official page of ABVP North Mumbai (Malad to Dahisar)

06/05/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) दिंडोशी तर्फे ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ लॉ येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

मांडण्यात आलेल्या प्रमुख समस्या व मागण्या:
• कॅन्टीनमध्ये पुरेशी बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास तात्काळ दूर करावा
• उशिरा फी भरण्यावर आकारण्यात येणारी दंडात्मक फी पूर्णपणे रद्द करावी
• प्रत्येक विभागात प्रॅक्टिकल ट्रेनिंग व स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्स वाढवावेत
• युवक संसद उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवावा
• क्रीडा सुविधा सुधारून स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू करावा
• विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी
• कॅम्पसमधील बाऊन्सर व्यवस्था हटवावी

प्रशासनाने या सर्व मागण्यांवर १५ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

[ Student Issues, College Infrastructure, Skill Development, Campus Facilities, Student Welfare, Fee Policy, Pr

05/05/2026

अभाविप दिंडोशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार श्री. अतुल भातखळकर यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) गठित करून सखोल चौकशी करावी, सर्व दोषींना तात्काळ निलंबित करावे तसेच प्रभावित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी राज्य शासन व कुलपती मा. राज्यपाल यांच्याकडे करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात तातडीने व ठोस कारवाई व्हावी, ही अभाविपची ठाम भूमिका आहे.

[ Mumbai University Paper Leak, SIT Investigation, Re-Exam Demand, Student Justice, Exam Integrity, Campus Protest, ABVP Action, University Accountability ]

04/05/2026

अभाविप, बोरिवली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार सुनील प्रभू यांना भेटून मुंबई विद्यापीठ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात लक्ष घालून SIT गठित krun तपास करण्याची, सर्व दोषींना निलंबित व पुनर्परीक्षा घेण्याची राज्य शासन व कुलपती मा. राज्यपालांकडे मागणी करावी असे निवेदन देऊन विनंती केली.

14/04/2026

*SUMMER CAMP 2K26 🌞🏕️*
*Explore • Learn • Grow*

Students for Development Dindoshi invites you to 3 days of learning, bonding, and fun at *Shri Neelkanth Seva Sansthan, Saphale (W), Palghar* from *19th–21st April 2026*.

*Key Activities Include:*
- *Bhajan Jamming* 🎶 & *Bonfire Evening* 🔥
- *Debate Competition* 🎤 to sharpen your thoughts
- *Temple Visit* 🛕 for cultural connection
- *Attractive Games & Team Challenges* 🏃‍♂️
- *Nature Walks, Skill Workshops & Creative Sessions* 🌿

08/04/2026

रायगढ़ किले की शैक्षणिक सहल – एबीवीपी दिंडोशी जिला

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी) दिंडोशी जिला के कार्यकर्ताओं ने 105 विद्यार्थियों के लिए रायगड किले की शैक्षणिक सहल का आयोजन किया। इसका उद्देश्य विद्यार्थियों को इतिहास से परिचित कराना और राष्ट्रभक्ति की भावना विकसित करना था।

इस यात्रा में विद्यार्थियों ने उत्साहपूर्वक भाग लिया और किले के प्रमुख स्थलों जैसे राजदरबार, बाजारपेठ और शिवाजी महाराज की समाधि का दर्शन किया। कार्यकर्ताओं ने किले के इतिहास और महत्व की जानकारी दी।

इस सहल से विद्यार्थियों में इतिहास के प्रति रुचि बढ़ी तथा अनुशासन, सहयोग और नेतृत्व जैसे गुणों का विकास हुआ। यह सहल सभी के लिए प्रेरणादायक और यादगार रही।

🚩
dindoshi
Mumba
# abvpkokan

Photos from ABVP North Mumbai's post 08/02/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कांदिवली पूर्व नगर 🚩
शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील पोईसर सेवा बस्ती (बिहारी टेकडी) येथे मुलींसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय सचिवालय सचिव मा. श्री देवानंद त्यागी यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी विभाग संयोजक मा. श्री शिवम तिवारी हेही विशेष उपस्थित होते.
या स्पर्धेत ३० हून अधिक मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत खेळभावना, चिकाटी आणि आत्मविश्वास दाखवून दिला. क्रीडा उपक्रमांमुळे मुलींमध्ये नेतृत्वगुण, आरोग्याची जाणीव आणि सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते, यावर यावेळी भर देण्यात आला.
या प्रसंगी रवि रंजन झा, हेमंत झा, निखिल मिश्रा, राघव पांडेय, अभिषेक शुक्ला तसेच दीपक मिश्रा उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
🏸 खेळातून सशक्तीकरण – मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल!

03/02/2026
Photos from ABVP North Mumbai's post 19/01/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,दिंडोशी जिल्हा 🚩

स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या “युवक सप्ताह” निमित्ताने सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील "रघुवीर स्कूल" येथे “राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका” या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रांत SFD संयोजक श्री. प्रविण शुक्ला यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती दर्शविली.
स्वामी विवेकानंदांनी दिलेला “उठा, जागे व्हा आणि उद्दिष्टप्राप्ती होईपर्यंत थांबू नका” हा अमूल्य संदेश आजही युवकांना प्रेरणा देणारा आहे. राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत मोलाची असून सामाजिक जबाबदारीची जाणीव, सुदृढ चारित्र्य, आत्मविश्वास व राष्ट्रनिष्ठा यांच्या बळावर युवक सशक्त भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात,असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
चारित्र्यसंपन्न, आत्मविश्वासपूर्ण व राष्ट्रनिष्ठ युवक घडविणे हेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे मूळ तत्त्व असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका, समाजाप्रती युवकांची कर्तव्ये तसेच मूल्याधिष्ठित व जबाबदार जीवनपद्धतीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास हेमंत झा, प्रिन्स सोनार तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Photos from ABVP North Mumbai's post 18/01/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दिंडोशी जिल्हा 🚩

स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या “युवक सप्ताह” निमित्ताने रविवार,दि. १८ जानेवारी २०२६ रोजी कांदिवली पूर्व येथील "स्पेक्ट्रम क्लासेस" येथे “राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका” या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी अभाविप दिंडोशी जिल्हा प्रमुख प्रा.सुभाष चौधरी यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती दर्शविली. स्वामी विवेकानंदांनी दिलेला “उठा, जागे व्हा आणि उद्दिष्टप्राप्ती होईपर्यंत थांबू नका” हा अमूल्य संदेश आजही युवकांना प्रेरणा देणारा आहे. राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत युवकांची भूमिका अत्यंत मोलाची असून सामाजिक जबाबदारीची जाणीव, सुदृढ चारित्र्य, आत्मविश्वास व राष्ट्रनिष्ठा यांच्या बळावर युवक सशक्त भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. चारित्र्यसंपन्न, आत्मविश्वासपूर्ण व राष्ट्रनिष्ठ युवक घडविणे हेच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे मूळ तत्त्व असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका, समाजाप्रती युवकांची कर्तव्ये तसेच मूल्याधिष्ठित व जबाबदार जीवनपद्धतीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास रवि रंजन झा, निखिल मिश्रा, हेमंत झा, प्रिन्स सोनार, तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

17/01/2026

🚩 स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित युवक सप्ताहाच्या निमित्ताने 🚩
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कांदिवली (पूर्व) यांच्या वतीने
Spectrum Classes, कांदिवली (पूर्व) येथे
“Vivekananda’s Teachings and Today’s Youth”
या अत्यंत प्रेरणादायी विषयावर
एक भव्य परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
🔹 विषय: Vivekananda’s Teachings and Today’s Youth
🔹 वेळ: दुपारी ३:०० वाजता ⏰
🔹 स्थळ: Spectrum Classes, हनुमान नगर, कांदिवली (पूर्व) 🏫

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


202, Sankalp Karyalay, Trimurti Arcade, Zakeria Road, Opposite Shivaji Chowk, Malad West
Mumbai
400064