मराठी माणूस आणि मुंबई - लेख पंधरावा
बिल्डर, बिल्डिंग मटेरियल ,हार्डवेअर, माशांचे व्यापारी, कृषी व्यवसायिक, असे वेगवेगळ्या विषयावरती छोटे मराठी बिझनेस ग्रुप आपण बनवतोय.
या पोस्टला तुमच्या सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ही मराठी मानसिकता खूप वेगाने बदलत आहे
याचे लक्षण आहे, सर्वांना धन्यवाद.
आता याच विषयाचा मी आज लेख येत आहे. मित्रांनो पटेल, लोढा, लोखंडवाला, गाला झवेरी रुस्तमजी, दवे हिरानंदानी, अशी सगळी मोठ्या बिल्डरची नाव आपण ऐकतो, आहेत अर्थात काही मराठी नावे सापडतात उदाहरणार्थ परांजपे, हावरे , मगर पण परप्रांतीय बिल्डरच्या तुलनेने खूप कमी मराठी नावे समोर येतात. आपण या एका व्यवसायाचे उदाहरण घेऊ, एकूणच मुंबईतले आणि आसपासचे बिल्डरची नाव आपण घेतली तर पाच टक्के सुद्धा मराठी नावे आपल्याला सापडणार नाहीत.
का व्हावी अशी परिस्थिती आपण कधी विचार केलाय का ?
मुंबईत आता घर घेणे हे मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहे, टेनंट बिल्डिंगमध्ये , एक गरीबा सारखी पार्किंग नसलेली बिल्डिंग येथे 295 / 325 रुपये चे घर मूळ मराठी माणसाला दिले जाते , ती सुद्धा खूप मोठी मेहरबानी केल्यासारखं. त्यापुढे एक आलिशान टॉवर उभा राहतो 50 60 मजल्यांचा आणि येथे दोन तीन चार बीएचके फ्लॅट अमराठी लोक घेतात.
आता मुंबईतले बिल्डर आणि मुंबईतली घरे हा विषय सोडून देऊ, ही घरे घेण्याची क्षमता मराठी माणसांमध्ये येईल याकरता नक्की काम करूया पण आता मुंबईच्या बाहेर म्हणजे नवी मुंबई पनवेल, वसई ठाणे, घोडबंदर आणि कल्याण डोंबिवली अंबरनाथ आता नव्याने विकसित होणारी महामुंबई म्हणजेच द्रोणागिरी ऊरण उलवे पुढे जाऊन अलिबाग पेण च्या आसपासची गावे येथे मोठ-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स बनायला लागले, पलावा,
रुस्तमजी
हिरानंदानी, साई वर्ल्ड, भूमी, खूप सारे बिल्डर आपल्याला पाहायला मिळतात,
त्यांनी विकसित केलेल्या 200 एकर, चारशे एकर 1000 एकर अशा भव्य दिव्य टाउनशिप आपण पाहतो, खूप सुंदर डेव्हलपमेंट अगदी युरोप सारखे आणि त्यात हजारो घरे, सुदैवाने या टाऊनशिप मधील घरे मराठी माणसांना परवडतात अजून तरी, यातली किती बिल्डर मराठी आहेत, आणि नाहीत तर का का नाहीत ? कधी आपण विचार केला ?
आता हे सगळे मोठे कॉम्प्लेक्स मोठ्या टाऊनशिप विकसित होतात आमच्या कोकणात, जमिनीचे मालक कोण म्हात्रे, मोकल, भोईर ,कोळी,ठाकूर, सगळे जमिनीचे मालक मराठी, या कॉम्प्लेक्स मध्ये घरे विकत घेणारे 80 टक्के मराठी, बिल्डिंगला परवानगी देणारे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मदत करणारे नेते सगळे मराठी फक्त यात प्रचंड प्रॉफिट कमवणारा एकच घटक म्हणजे बिल्डर गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी , अगदी ते टॉवर बांधणारे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मराठी असतात, घर विकत घेणाऱ्यांचे पैसे आणि यांना फायनान्स करणारे बरेचशे मराठी असतात म्हणजे फायनान्स सुद्धा मराठी मात्र व्यवसाय करणारा माणूस अमराठी, आता तर हे सर्व लोक मुंबईच्या आसपास दोनशे एकर हजार एकर अशा जागा विकत घेत आहेत आणि आमचे मराठी स्पर्धा करून आपल्या उरल्या सुरल्या जागा विकत आहेत, मुंबईच्या आसपासच कोकण 90% लोकांनी विकले. भविष्यात त्याच जागेमध्ये झालेल्या एका बिल्डिंगमध्ये एक किंवा दोन घरे जमिनी विकणारे विकत घेतील. म्हणजे एक लाख फूट जमीन विकली आणि दोन हजार फुटाचा घर घेतल . बऱ्याच ठिकाणी आपल्याच जमिनी विकून त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांवर वॉचमन म्हणून काम करताना आमची मराठी माणसे दिसतात. हे असं नव्या मुंबईत कल्याण डोंबिवली मध्ये वसई विरार मध्ये घडलं आता हेच त्याच्या पुढच्या मुंबईत म्हणजे पेण अलिबाग आणि त्यानंतर खेड चिपळूण ला होणार आहे. हे असं घडणार हे सांगायला कुठल्याही तज्ञाची गरज नाही हे असंच घडणार आहे. दिलीप पन्नास वर्षे एकाच पद्धतीने आम्ही बनवले जात आहोत.
कधीतरी मराठी माणसे आपण एकत्र असा विचार करणार आहोत का जमिनी पण आमच्या असतील, आणि यावर कॉम्प्लेक्स पण आम्ही डेव्हलप करू मालक सुद्धा आम्ही असु
सतीश मगर नावाच्या एका इंजिनियरने आपल्या मगर आडनाव्याच्या लोकांच्या जमिनी एकत्र करून त्यावर मगरपट्टा नावाची टाउनशिप विकसित केली, राहायला बाहेरचे लोक आले पण टाऊनशिप ची मालकी मगर आडनावाच्या लोकांकडेच ठेवतो तिथले कॉलेज, तिथलं थिएटर, तिथली ऑफिसेस ,इथल्या आयटीच्या बिल्डिंग, सर्वात महत्त्वाचं तिथे विकसित झालेले छोटे मोठे व्यवसाय सगळ्याची मालकी मगर आडनावांच्या लोकांकडे, आणि प्रत्येक मगर कुटुंबाकडे मर्सिडीज घेता येईल इतकी आर्थिक समृद्धी सतीश मगर नावाच्या एका माणसाने निर्माण केले.
पण असे सतीश मगर. म्हात्रे भोईर परब गावकर पाटील आपल्याला का निर्माण करता येत नाही ? का सर्व म्हात्रे किंवा भोईर परब गावकर एकत्र येऊन आपल्या जमिनीवर आपली टाऊनशिप विकसित करत आणि यात आपल्याच मराठी लोकांना घर उपलब्ध करून देत. यातून प्रॉफिट कमवून मोठा बिल्डर ब्रँड आपलाच का तयार होत नाही. हे सगळं शक्य आहे पण भांडणातून आम्हाला मराठी माणसांना कधी वेळ मिळेल आम्ही कधी एकत्र येणार आम्ही वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रशिक्षण आणि एका दिशेने कधी काम करणार, राजस्थान आणि गुजरात मधून येऊन लोक शून्य भांडवल असताना जमीन नाही स्थानिक पाठबळ नाही असं असताना परप्रांतीय लोक आज मोठमोठे बिल्डर बनले , असे मराठी माणसे पण बनवू शकले असते खरे तर जागा आमच्या मालकीच्या होत्या, त्यांनी तर जागा विकत घेऊन टाऊनशिप उभ्या केल्या आम्हाला आमच्या असलेल्या जागांवर टाऊनशिप करायच्या होत्या पण आम्ही नाही केलं, आम्हाला आजही वाटतं आम्ही आमच्या जातीचे,समाजाचे, भाषेच ,गाववाले, आमदार नगरसेवक तयार केले की आमचा विकास होईल, खरंच हे शक्य आहे का ? असं व्हायचं असतं तर तो कधीच झाला असता.
चला उशिरा का होईना आता जागे होण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला एक 100 तरुण मराठी बिल्डर एकत्र येऊन अशा स्वरूपाचे कॉम्प्लेक्स टाउनशिप प्रोजेक्ट उभे करता येतील का या दृष्टीने प्रयत्न करूया, यासाठी एकमेकांना मदत करू,प्रशिक्षण घेऊ, समजून घेऊ फायनान्स कसा उभा करतात याचं ज्ञान घेऊ यासाठी आवश्यक असलेले स्टार्टअप उभे करूया, शेअर मार्केटचा अभ्यास करूया कंपन्यांचे शेअर्स उभे करूया, आमचं कोकण आमची महामुंबई इथे विकासाच्या प्रक्रियेत सर्वाधिक वाटा आमच्या स्थानिक माणसाचा असेल आमच्या मराठी माणसाचा असेल असा आग्रह धरूया केवळ भावनिक नाही तर यासाठी रात्रंदिवस काम करूया, मराठी माणसांकडे पैसे आहेत जे बाकीच्यांना इन्व्हेस्टमेंट म्हणून देतात त्यांना मराठी उद्योजकांवर विश्वास ठेवण्यासाठी विनंती करूया आणि त्यांच्या विश्वासाला पात्र सुद्धा ठरूया. होय हे शक्य आहे जर सतीश मगर करू शकतात जर नांदेड सिटी वाले करू शकतात तर म्हात्रे ठाकूर भोईर, पाटील परब गावकर सुद्धा करू शकतात, मराठी माणसांनी ठरवण्याची आवश्यकता आहे नक्की सतीश मगर सारखी अनुभवी माणसे आपल्याला मार्गदर्शन करतील दिशा दाखवतील. यापुढे वेगाने विकसित होणारी मुंबई महामुंबई तिसरी मुंबई आणि कोकण येथे सर्वाधिक विकासाच्या प्रक्रियेत मराठी माणसाचा सहभाग असेल यातून मराठी उद्योजक आणि मराठी ब्रँड सुद्धा उभे राहतील यासाठी काम करूया.
मी एक रियल इस्टेट इंडस्ट्रीचा उदाहरण दिले आहे असंच बांधकाम साहित्याबद्दल, असंच बेकरी , मिठाईची दुकाने कपडा मार्केट होजियरी मार्केट किराणा व्यापार माशांचे मार्केट हापूस आंब्याचे मार्केट कृषी उत्पादनांचे मार्केट सर्व विषयात मराठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे आणि यासाठी पुढची 25 वर्ष मान खाली घालून फक्त काम काम आणि काम केले पाहिजे, छत्रपती शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले हा विचार मनाशी धरून मराठी तरुणांनी, उद्योगी मुलांनी या पुढच्या काळात एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने व्यावसायिक साम्राज्य केवळ मुंबईत नाही देशात निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी योग्य दिशेने सातत्याने काम करणारी एक रचनात्मक चळवळ हवी आणि शिवस्वराज्य मराठी उद्योजक परिवार आणि संघटनेच्या माध्यमातून आपण व्यवसायाच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये एक चळवळ सुरू करत आहोत आणि या प्रत्येक विषयात पाटून काम करणार्या तरुण उद्योगी उद्योजक मराठी मुलांची टीम आपण उभे करणार आहोत.
जय शिवराय
संजय यादवराव
समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स
शिवस्वराज्य मराठी उद्योजक परिवार
शिवस्वराज्य मराठी संघटना
Kokonut Voyage
Kokan Green Life is a brand to promote natural beauty KOKAN among World. Kokan is a vast stretch of crystal blue waters of the Arabian Sea & sun-kissed beaches.
Rocky Mountains in the Western Ghat leap up to the sky while lush, velvety green valleys are homes to sleepy hamlets. Delicious & unique cuisine & a peek into the rustic village life & folk art are a treat. Kokan is dotted with ancient temples & historical forts. They are the icons of our glorious traditions & legacies. When you are in Kokan you are in presence of nature at its best. Enjoy each mo
30/01/2025
कोकणात जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी नामदार नितेश राणे पुढाकार घेणार.
रामदास बोट दुर्दैवी अपघातानंतर गेली 40-50 वर्ष कोकणातील जलवाहतूक सुरू झाली नाही. ती सुरू झाली तर कोकणामधील पर्यटन पाचपट वाढेल आणि दर्जेदार पर्यटक कोकणात येण्याची प्रक्रिया सुरू होईल पण त्यासाठी पायाभूत सुविधा हव्यात. या गोष्टी आता घडायला लागतील.
परदेशात राहणारे कोकणातील उद्योजक चार्टर्ड अकाउंटंट गौतम प्रधान यांनी स्वतःची गुंतवणूक करून आपले गाव श्रीवर्धन साठी जलवाहतूक सुरू करण्याचे ठरवले त्याप्रमाणे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून कर्ज काढून बोट विकत घेतली दुर्दैवाने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मान्य करून देखील पुरेशी सहकार्य मिळाले नाही आणि त्यामुळे ही बोट सर्विस प्रत्यक्ष सुरू झाली नाही. ही बोट सर्विस सुरू होण्याकरता. जेट्टी आवश्यक आहे त्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उद्योजक माँगिया यांच्या पुढाकारातून मांडवा जेट्टी विकसित झाली आणि त्यानंतर अलिबाग मुंबई नियमित बोट सर्विस गाड्या अलीकडे पलीकडे नेणारी एम टू एम सुरू झाली या बोट सर्विस मुळे अलिबाग तालुक्यातील पर्यटन किमान दुप्पट वाढले आणि दर्जेदार पर्यटक अलिबाग मध्ये येण्याची प्रक्रिया सुरू झाली. याबद्दल महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि उद्योजक मोंगीया यांचे अभिनंदन केले पाहिजे.
असाच फरक कोकणातल्या पर्यटनात पडेल जर मुंबईपासून श्रीवर्धन दाभोळ रत्नागिरी सिंधुदुर्ग अशी बोट सर्विस सुरू झाली. मात्र यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित होणे गरजेचे आहे.
काशीद आणि दिघी येथे जेट्टी बनवण्याचे काम सुरू आहे ते पूर्ण झाले
तर लगेच काशीद आणि दिघी म्हणजे पुढे श्रीवर्धन साठी बोट सर्विस सुरू होईल. भारतातील सर्वात वेगवान तीन तासात श्रीवर्धनला घेऊन जाणारी बोट गौतम प्रधान यांनी घेतली आहे. पण प्रशासकीय दिरंगाईमुळे ती सुरू होऊ शकली नाही
सदर विषयाची चर्चा नामदार नितेशजी राणे यांच्याकडे केली. धडाकेबाज आणि वेगवान निर्णय घेण्याची कामाची पद्धत असलेले नामदार नितेश राणे यांनी या कामांमध्ये पूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. या दोन्ही जट्टीचे उर्वरित काम वेगाने पूर्ण होईल आणि लवकरच नामदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून कोकणातील जलवाहतूक सुरू होईल असा विश्वास आहे.
लवकरच मुंबई ते काशीद आणि दिघी अशी बोट सर्विस म्हणजेच कोकणातील जलवाहतुकीचा दुसरा टप्पा सुरू होईल आणि यासाठी नामदार नितेश राणे पुढाकार घेणार आहेत.
कोकणातील जलवाहतुकीचे कोकणवाशीयांचे स्वप्न पुढील काळात नक्की पूर्ण होईल. असा विश्वास कालच्या चर्चेतून मिळाला. याबद्दल माननीय नितेशजी राणे यांचे गौतम प्रधान यांनी आभार व्यक्त केले आहेत.
संजय यादवराव
ग्लोबल कोकण
कोकण चेंबर ऑफ कॉमर्स
10/06/2023
स्वाभिमानी कोकण! स्वावलंबी कोकण ! उद्योगी कोकण ! समृद्ध कोकण !
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात सहभागी झालेले उद्योजक,
उद्योजकाचे नाव - प्रथमेश शिंदे
उद्योग - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
अश्या विविध क्षेत्रातील उद्योगांना आणि त्याचे नाविन्य समजून घेण्यासाठी आजच स्वराज्याभूमी कोकण महोत्सवाला भेट द्या !!
शेवटचे २ दिवस- नेस्को सेंटर, गोरेगाव
अवश्य भेट द्या !
#स्वराज्यभूमी #भव्यस्वराज्यभूमीकोकणमहोत्सव #गौरवशालीइतिहास #गोरेगाव #स्वराज्यभूमीकोकण2022 #कोकण #मुंबई #निसर्गसंपन्न #परंपरा #संस्कृती #कला #लोककला #छत्रपतीशिवाजीमहाराज
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the business
Telephone
Website
Address
Office No. 25 & 26, Ajay Shopping Center, T. H. Kataria Marg, Matunga Road (West)
Mumbai
400016
Opening Hours
| Monday | 10am - 7pm |
| Tuesday | 10am - 7pm |
| Wednesday | 10am - 7pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |
