महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना -दहिसर विधानसभा क्षेत्र

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना -दहिसर विधानसभा क्षेत्र

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना -दहिसर विधानसभा क्षेत्र, Political organisation, Dahisar, Mumbai.

Photos from महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना -दहिसर विधानसभा क्षेत्र's post 06/07/2019

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष (म.न.वि.से) राजेश गं.येरूणकर व समाजसेविका पूनम आचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने आधार वृद्धाश्रम या ठिकाणी वृध्दांकरीता सहसम्मेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. दरम्यान वृध्दांकरीता मनोरंजनाचे विविध कार्यक्रम वृध्दांना सहभाग करून करण्यात आले..

याप्रसंगी आधार वृध्दाश्रामाचे विश्वस्त मा.श्री.गिरीधारी रोहरा (भजनलाल) साहेब, दहिसर विधानसभा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म.न.वि.से राजेश गं.येरूणकर, समाजसेविका पूनम आचार्य, उद्योजक उमेश आचार्य, महिला विभाग अध्यक्षा जयश्री पटेल, अॅड. दिपक शर्मा, मागठणे विधानसभा अध्यक्ष विलास मोरे, म.न.वा.से उपाध्यक्ष सचिन पाटील, म.न.वि.से विभाग अध्यक्ष कुणाल मेस्त्री, विद्यार्थिनी सचिव प्रियांका थोरात, प्रभाग क्रमांक १३चे स्थानिक शाखा अध्यक्ष दत्ता सागवेकर, उपविभाग अध्यक्ष कुणाल मईनकर, उपविभाग अध्यक्षा अपूर्वा कदम, मनसे शाखा अध्यक्ष दिपक गव्हाणे, धीरज शुक्ला, महिला शाखा अध्यक्षा तृप्ती दवे, अनिता शिर्के, वंदना कदम , वृंदा जाधव, कुस्तूरी रोहेकर, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष नरेंद्र भानसे, नितीन हांडे, महिला उपशाखा अध्यक्षा प्रतिभा कांबळे, महाराष्ट्र सैनिक दिनेश बालगुडे, देवेंद्र खैराडी, मुकुंद कांबळे आणि इतर प्रतिष्ठित मंडळी (आधार वृध्दाश्राम) उपस्थित होते..

14/06/2019

#महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना दहीसर विधानसभा विभागअध्यक्ष तसेच #महाराष्ट्र_नवनिर्माण_विद्यार्थी_सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, सन्माननीय राजसाहेबांचे विश्वासू सहकारी, सय्यमी, प्रेमळ आणि खंदे राजकीय व्यक्तिमत्त्व, आमच्या सर्वांचे लाडके, मार्गदर्शक, कोणत्याही अडीअडचणीत सर्वप्रथम खंबीर असणारे आणि इतरांना हक्काने मदतीसाठी हात देणारे.. आमच्या सर्वांचे लाडके #राजेश_येरूणकरसाहेब ( ून) आपणांस वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा..

आई जगदंबा आपणांस सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, आनंद देवो.. आपली प्रकृती उत्तम राहो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सद्धिछा..

13/06/2019

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि मराठीच्या प्रसारासाठी गेली १३ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘मराठीहृदयसम्राट ’ स्वरराज ऊर्फ सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता नसताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.
सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार राज ठाकरे’ यांच्या कुंचल्यात आहे, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी मनसेच्या स्थापनेपासून गेली तब्बल १३ वर्षे अविरतपणे चालवीत आणि पार पाडत आहेत.
व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे राजसाहेब ठाकरे यांना काका बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता.
महाराष्ट्रात सर्व नेत्यांपैकी गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारे नेते म्हणून इंटरनेटच्या विश्वातही त्यांचा दबदबा आहे.
ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात.
जेट एअरवेजमधून जेव्हा अनेक मराठी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरे यांना भेटले व राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले.

रेल्वे भरतीतील परप्रांतीय आंदोलन तर राज ठाकरेंच्या यशस्वी आंदोलनांपकी एक आहे.या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक तरुणांना नोकरी मिळाली.

अनेक राजकीय व ज्योतिष विश्लेषकांच्या अंदाजानुसार राज ठाकरे २०२० या वर्षी सत्तेत असेल.
राज ठाकरे हे आजतागायत महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आहे.त्यांच्या सभेला जमणारी गर्दी व इंटरनेटवर त्यांना सर्च करणारा सर्वात मोठा वर्ग त्यांचाच चाहता आहे.

अश्या या माझ्या खंद्या नेतृत्वाचा आज (१४ जून) वाढदिवस आहे ही सोनेरी पहाट उजाडली ती या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला घेऊनच.
राजसाहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाकडे आहे एकच इच्छा
तुमची शंभरी साजरी करण्याचे भाग्य या महाराष्ट्राला लाभो हीच सदीच्छा

28/04/2019
Photos from महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना -दहिसर विधानसभा क्षेत्र's post 26/04/2019

आज, दिनांक २६ एप्रिल २०१९ रोजी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दहिसर पूर्वेकडे असलेल्या #विद्या_मंदिर #विद्या_प्रसारक_मंडळाच्या शाळेला निवेदन देण्यात आले..
त्यांनी २०१८-१९ च्या सांस्कृतिक आणि इतर स्पर्धात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वाटण्यात आले.. सदर प्रशस्तीपत्रात #नरेंद्र_मोदीचा फोटो ठेवण्यात आला हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष #कुणाल_उमेश_मेस्त्री यांच्या लक्षात आले.. तसेच, आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले.. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आणि म.न.वि.से उपाध्यक्ष श्री #राजेश_गंगाराम_येरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेला योग्य जाब विचारत त्या कृतीवर स्पष्टीकरण द्यावे आणि दिलेले सर्व प्रशस्तीपत्र परत मागवून नव्याने वाटण्यात यावी अशी कणखर भूमिका मनसे विभाग अध्यक्ष राजेश येरूणकर यांनी मांडली.. संबंधित प्रकरणाचे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थिनी विभाग सचिव #प्रियंका_थोरात, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष #अमोद_कदम, महाराष्ट्र सैनिक #प्रतुल_नाईक, #सागर_मोरे, #रिया_शिर्के आणि इतर सहकारी उपस्तीत होते..

09/03/2019

‘राज’सूर्य उगवणारच..

१३ वर्ष स्वाभिमानाची..
१३ वर्ष न्यायाची..
१३ वर्ष संधीची..
१३ वर्ष संघर्षाची..
१३ वर्ष सत्याची..
१३ वर्ष नैतिकतेची..
१३ वर्ष निष्ठेची..
१३ वर्ष आत्मविश्वासाची..
१३ वर्ष जनसेवेची..
१३ वर्ष मेहनतीची..
१३ वर्ष सन्मानाची..
१३ वर्ष महाराष्ट्र प्रेमाची..

आणि

१३ वर्ष मराठी अस्मितेची..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची...

वर्धापण नव्हे... नव्या रूपात पदार्पण...

MNS दहिसर :मराठी भाषा दिवस के मौके पर निर्बन्ध प्रतियोगिता एवं सांस्कृतिक कार्यक्रम किया गया 28/02/2019

https://youtu.be/b0sJYfzgnk4

MNS दहिसर :मराठी भाषा दिवस के मौके पर निर्बन्ध प्रतियोगिता एवं सांस्कृतिक कार्यक्रम किया गया महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभा के तरफ से ज्ञानपीठ पुरस्कार सम्मान प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यकार कुस....

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Dahisar
Mumbai
400068