कवितांचे माहेरघर World of Poems

कवितांचे माहेरघर World of Poems

Share

हे page सर्व साहित्यातील उत्कृष्ट कविता?

23/03/2022

मेरी हवाओं में रहेगी,
ख़यालों की बिजली,
यह मुश्त-ए-ख़ाक है फ़ानी,
रहे रहे न रहे।

भगत सिंह

09/02/2022

अरे अभागे ! प्रेम करके तो देख !
-सरला माहेश्वरी

हिजाब पहना तो मारेंगे
जींस पहना तो मारेंगे
बुर्का पहना तो मारेंगे
टाँगें दिखाई तो मारेंगे
घूँघट हटाया तो मारेंगे
बोली तो मारेंगे !
न बोली तो मारेंगे !

खिलखिलाई तो मारेंगे
मोबाइल रखा तो मारेंगे
प्रेम किया तो मारेंगे
नौकरी की तो मारेंगे
घर पर रही तो मारेंगे !
इस बहाने ! उस बहाने मारेंगे !
धर्म के नाम पर मारेंगे !
अधर्म के नाम पर मारेंगे !

तुम मारोगे जरूर
ढकूं या उघाड़ूँ कुछ भी
मेरे होने के लिए ही मारोगे
जनम के पहले ही मारोगे !

सच यह है कि तुम्हे
हमारा हिजाब भी डराता है ! हमारी जींस भी डराती है !
घूँघट उठाना भी डराता है ! हमारा बुर्का भी डराता है !
हमारा चुप रहना भी डराता है ! बोलना भी डराता है !
हमारा पढ़ना भी डराता है ! ना पढ़ना भी डराता है !
नौकरी करना भी डराता है ! और घर में रहना भी डराता है !
हमारा खिलखिलाना भी डराता है ! चुप रहना भी डराता है !
गोया हम इंसान नहीं मुट्ठी में बंद तुम्हारे डर का दूसरा नाम हैं !

पर वे दिन दूर नहीं जब
मार ! मार ! मार ! होगा पलटवार !
पलटवार !
खार ! खार ! खार ! ये मार ! वो मार !
ये मार ! वो मार !
तब लड़ाई बराबरी की होगी ! तब आएगा लड़ाई का मज़ा !!

अरे कायर पुरुष मत डर ! मत डर !
हम इंसान है ! मुट्ठी खोल हाथ मिला !
साथ चलकर तो देख ! अपने से निकल कर तो देख !
हमारी आँख से भी देख !
ज़िंदगी को फूलों की तरह महकते तो देख !

पागल ! नजरों को दो-चार करके तो देख !
अरे अभागे ! प्रेम करके तो देख !

07/09/2021

यह कविता नहीं है। बस किसी शाम टहलते हुए कुछ इस तरह ख़्याल आया किसी को देख कर। कभी कभी लिखना चाहिए। कच्चा पक्का ही सही।

दौड़ता हुआ लड़का
लैम्प पोस्ट के उजाले से किसी भविष्य की तरफ निकलता
खो जाता उजाले के बाद के अंधेरे में
अचानक प्रकट हो जाता है बगल में
पकड़ में आने से पहले तेज़ी से फिर ओझल हो जाता है
रेल गाड़ी की तरह धप-धप करता हुआ आता है
और चला जाता है
दौड़ता हुआ लड़का
नोख भर चर्बी तक गलाने की होड़ में लगा हुआ है
दौड़ता हुआ लड़का
विचारों को भोथरा छोड़ अपने छरहरे शरीर को ले भागता
खो जाता उजाले के बाद के अंधेरे में
लैम्प पोस्ट के नीचे से गुज़रते हुए उसके बाद
धीरे धीरे चलता हुआ आता हूं मैं
हवा की बूंदों में उसके पसीने की गंध है मिली हुई
सात सौ साल पुराने विचारों की सड़न है उसमें
बदले की भावना लिए ख़ुद को बलिष्ठ बना रहा है
भोथरे विचारों को छरहरे नौजवानों की ज़रूरत है
ऐसी हर ज़रूरत को पूरा करने के लिए
हर शाम मेरे बगल से निकल जाता है
दौड़ता हुआ लड़का
लैम्प पोस्ट के उजाले से किसी भविष्य की तरफ निकलता
खो जाता उजाले के बाद के अंधेरे में

---रवीश कुमार

Photos from कवितांचे माहेरघर World of Poems's post 15/08/2021

हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

— ग. दि. माडगुळकर

10/08/2021

हे माझे मृत्यूपत्र
-- अमृता प्रीतम

पूर्ण शुद्धीत, नशा पाणी न करता
लिहीते आहे मी आज
हे माझे मृत्युपत्र

मी मेल्यावर
खोली धुंडाळा माझी
उलथंपालथं करा सगळं घर
कडीकुलुप नाहीच कशाला
सगळं अस्ताव्यस्त पसरलंय
देऊन टाका कुणाकुणाला

माझी स्वप्ने देऊन टाका
चूलमूल आणि शेजसंगत
यातच मिटून गेलेल्या
तमाम बायकांना
आपल्याच जगात हरवल्यात बिचाऱ्या
युगे झाली विसरुन गेल्यात स्वप्न पहायला

वाटून टाका
माझं खळाळतं हास्य
वृद्धाश्रमातल्या म्हाताऱ्यांना
अमेरिकेतल्या झगमगाटी शहरात
मुलं हरवलीत त्यांची

टेबलावर बघा
काही रंग दिसतील
त्या रंगांनी रंगवा
त्या विधवा पत्नीची साडी
जिच्या पतीच्या रक्ताने
देशाची सीमा रंगलीय
तिरंग्यात लपेटून
काल झोपी गेलाय तो

माझे अश्रू आहेत ना
ते त्या सगळ्या कविजनांना द्या
एकेका थेंबाची होईल एकेक गजल
गळ्याशप्पथ

माझा सन्मान , माझी प्रतिष्ठा
त्या वेश्येसाठी राखून ठेवलीय
मुलीला शिकवता यावं म्हणून
तिने देहाचा बाजार मांडलाय

या देशातील सगळे तरुण
पकडा एकेक करुन
प्रत्येकाच्या दंडात टोचा
माझा आक्रोश
क्रांतीचा एल्गार होईल तेव्हा
त्यांना गरज पडेल त्याची

आणि हे माझं वेडेपण आहे ना
ते त्या सूफीच्या वाट्याचं
घरदार सोडून निघालाय तो
ईश्वराच्या शोधात

बस्स एव्हढंच.
बाकी उरेल
माझी असूया
माझी लालसा
माझा संताप
माझं खोटेपण
माझा स्वार्थ

असं करा
जाळून टाका ते सारं
माझ्याबरोबरच.

-- अमृता प्रीतम
भाषांतर: अनंत घोटगाळकर
मूळ कविता पहिल्या कमेंट मध्ये

19/08/2020

*जिंदगी से बड़ी सजा हैं नहीं,*
*और क्या जुर्म है पता ही नहीं।*
*सच घाटे या बढ़े, तो सच ना रहे*
*झूठ को कोई इंतिहा ही नहीं।*

*कृष्ण बिहारी नूर*

11/08/2020
11/08/2020

अलविदा 😥🙏🌺

07/08/2020

१२० वर्षांपूर्वी रविंद्रनाथ टागोरांनी दीनो दान ही कविता लिहिली- एका मंदिराबाबतच ही कविता होती. तिचा बंगालीतून इंग्रजीत अनुवाद बनज्योत्स्ना लाहिरी यांनी केला. तो आनंद पटवर्धनांच्या भिंतीवर वाचला. त्याचा मराठी अनुवाद...
-------------------------------------------
“या मंदिरी देव नाही”, संत म्हणाला.
राजा संतप्त झाला आणि म्हणाला,
“देव नाही? संतश्री, आपण नास्तिकासारखे का बोलत आहात?
या सिंहासनावर अमूल्यरत्नांनी जडवलेली,
तेजःपुंज सुवर्णमूर्ती विराजमान झालेली पाहाता आहात आपण,
तरीही मंदिर रिते आहे म्हणता?”
“रिते नाही, ते तर काठोकाठ भरले आहे... राजाच्या अहंतेने.
या जगासमोर, हे राजाधिराज,
तुम्ही देवाला नव्हे तर स्वतःलाच मांडले आहे.” संत म्हणाला.
कपाळावर आठ्या चढवत राजा वदला,
“दोन दशलक्ष सुवर्णमुद्रा उधळल्या मी या गगनचुंबी मंदिरावर.
सर्व पूजाअर्चनांची आवर्तने पूर्ण केली.
आणि तुमची ही प्राज्ञा?
या भव्य मंदिरी देव नाही म्हणता?”
संत शांतपणे उत्तरला,
“मंदिर बांधले त्याच वर्षी...
तुमच्या वीस दशलक्ष प्रजाजनांना अवर्षणाने घेरले होते;
दारिद्र्याच्या खाईत पिचलेले हे भुकेलेले, निराधार लोक
तुमच्या दारी आले, तुमची करुणा भाकत...
हाकलून दिले गेले त्यांना,
ते गेले... वाटा नेतील तिथे,
जंगलात, गुहांत आसरा शोधत पळाले,
रस्त्याकडेच्या झुडुपांच्या आधाराने राहिले,
जुन्या पडक्या देवळांत राहिले...
त्याच वर्षी, राजाधिराज, जेव्हा तुम्ही
तुमच्या देवाच्या मंदिरावर वीस लक्ष सुवर्णमुद्रा उधळल्यात.
त्याच दिवशी देवाने सांगितले...
‘माझ्या शाश्वत आलयात, निळ्यागहिऱ्या आकाशात,
असतात लाखो दिवे उजळलेले.
माझ्या मंदिराचा पाया असतो मूल्यांनी घडलेला,
सत्य, शांती, सहानुभाव आणि प्रेम या मूल्यांचा.
हा दरिद्री, दळिद्री कवडीचुंबक
जो आपल्या प्रजाजनांना आधार देत नाही,
तो मला घर देण्याची आकांक्षा बाळगतो?’
त्याच दिवशी देवाने तुमच्या या मंदिराचा त्याग केला.
आणि तो गेला रस्त्यावर, झाडांखाली जगू पाहाणाऱ्या गरीब लोकांमध्ये.
भव्य महासागरावरचा फेस जसे बुडबुडेच असतात निव्वळ,
तसे तुमचे हे भकास मंदिर आहे...
संपत्ती आणि अहंतेचा बुडबुडाच केवळ.”
संतप्त राजाने गर्जना केली
“ओहोः, यःकश्चित मूर्ख प्राण्या, या क्षणी माझ्या राज्यातून चालता हो.”
संत शांतपणे उत्तरला,
“याच जागेतून तुम्ही देवाला परागंदा केलेत,
आता हेच योग्य...
देवाच्या भक्तालाही हद्दपार करा”.

मूळ बंगाली कविता- रविंद्रनाथ टागोर
इंग्रजी अनुवाद- बनज्योती लाहिरी
मराठी अनुवाद- मुग्धा कर्णिक

26/07/2020

तू इधर-उधर की न बात कर, ये बता कि क़ाफ़िला क्यूँ लुटा
मुझे रहज़नों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है
— शहाब जाफ़री

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mumbai