04/12/2021
पुन्हा एकदा झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील अनवली व कासेगाव भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. दिलीप धोत्रे यांनी नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश देऊन पक्षातर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी तीन लाख रुपयांची तसेच इतर शेतमालासाठी एकरी एक लाखापेक्षा अधिक मदत करावी अशी मागणी श्री. धोत्रे यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा भरपाई न दिल्यास विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व विमा कंपन्यांच्या कार्यालयावर 'खळ्ळ-फटॅक' आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला.
याप्रसंगी श्री. शशिकांत पाटील, श्री. दिलिप पाचंगे, श्री. सिद्धेश्वर गारड, श्री. अनिल बागल, श्री. कृष्णा मासाळ, श्री. महादेव मांढरे, श्री. दीपक भोसले आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
#शेतकऱ्यांची_मनसे
27/10/2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर च्या वतीने सन्मानीय राज साहेब ठाकरे यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी नवसाला पावणाऱ्या समनापुर गणपती मंदिर येथे गणरायाची महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित उपजिल्हाध्यक्ष किशोर डोके, विद्यार्थी सेना अध्यक्ष संकेत लोंढे, शहरअध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, दर्शन वाकचौरे, दीपक वरपे , उपशहर अध्यक्ष संदीप आव्हाड, अविनाश भोर ,ज्ञानेश्वर नाईकवाडी,आकाश अडांगळे, सागर सोनवणे,गिरीश उमाप,मनोज दातीर, प्रमोद काळे, सुरज तळेकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
25/10/2021
हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली मनसेची पहिली ऊस परिषद..!
शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ आर पी ची रक्कम द्यावी अश्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेण्यात आली, यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अशोक तावरे , बीडचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, वैभव काकडे, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, लातूरचे जिल्हाध्यक्ष नरसिंह भिकाने, जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू सोळंखे, गजानन गीते,नांदेडचे जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार, रवी राठोड, परभणीचे जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, शेखराज, रुपेश सोनटक्के, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राजेंद्र गपाट, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,अप्पा करचे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...
#शेतकऱ्यांची_मनसे
25/10/2021
शेतकरी मालकाचा जिव वाचवण्यासाठी बैलांची वाघाशी झुंज...
22/10/2021
शेतकरी बांधवांसाठी मनसे मैदानात..!
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा....
#शेतकऱ्यांची_मनसे
16/10/2021
सस्नेह जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम MNS Adhikrut हे आता कात टाकत आहे. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांच्यासह विविध समाज माध्यमांवर उपस्थित लक्षावधी महाराष्ट्र सैनिकांना आणि जगभरातील मराठीजनांना जोडून घेत नव्या रंगात, नव्या ढंगात येत आहे. आपल्याला मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी मांडलेला नवनिर्माणाचा विचार अधिक प्रभावीपणे सर्वदूर पोहोचवायचा आहे. त्यासाठी तुमचाही सहभाग हवाच.
MNS Adhikrut वर वाचा- पहा
० मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या रोखठोक भूमिका.
० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांच्या व्हिडिओ मुलाखती.
० उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा परिचय.
० विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आणि ताज्या घडामोडीवरील विशेष लेख.
नव्या रूपातील MNS Adhikrut आवर्जून लाइक, फॉलो आणि शेअर करा. आणि हो, तुमचा प्रतिसाद सर्वात महत्वाचा. कॉमेंट बॉक्समध्ये तो नोंदवायला विसरू नका.
आपलाच,
MNS Adhikrut परिवार
#डिजिटल_सीमोल्लंघन
15/10/2021
अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून पिकनुकसान झालेल्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत तत्काळ मिळायलाच हवी, या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'काळा दसरा' आंदोलन केले.
'काळा दसरा' आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्र सैनिकांनी काळे फलक हाती घेऊन राज्य सरकारविरोधी घोषणा देऊन शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असलेल्या सरकारी तसंच प्रशासकीय व्यवस्थेचा तीव्र निषेध केला. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढाही यावेळी वाचण्यात आला. नुकसानीमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी रावणरुपी महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक दहन यावेळी करण्यात आले. पक्षाचे नेते श्री. दिलीप धोत्रे आणि श्री. बाबू वागस्कर, सरचिटणीस श्री. संतोष नागरगोजे, उपाध्यक्षा सौ. रुपालीताई पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र गारुडकर, श्री. समीर थीगळे, श्री. विनोद जावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
#शेतकऱ्यांची_मनसे
15/10/2021
आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभ_दसरा #विजयादशमी
12/10/2021
अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट मदत मिळावी ह्या मागणीसाठी संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हजारो शेतकऱ्यांच्या समवेत धरणे आंदोलन करण्यात आले.
#शेतकऱ्यांची_मनसे