08/05/2026
मंत्रालय येथे ‘टेक-वारी २.०’ (महा टेक लर्निंग वीक) कार्यक्रमाचे आयोजन
याप्रसंगी आमदार दिलीपराव बनकर आणि आ. विक्रांत पाटील, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
08/05/2026
लिंब-मर्ढे येथील विकासकामांचे विकास खारगे यांच्याकडून कौतुक!
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मौजे लिंब व मर्ढे येथील पाणंद रस्ते, बा.सी. मर्ढेकर स्मारक आणि ऐतिहासिक बारा मोटेच्या विहिरीला भेट दिली. शेतकऱ्यांसाठी केलेल्या पाणंद रस्त्यांच्या दर्जेदार कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले.
शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याबद्दल उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव आणि वर्ये महसूल पथकाचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच गावाच्या विकासासाठी प्रशासन व ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकजुटीचा गौरव केला.
08/05/2026
पिंपळगाव बसवंत येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिर उत्साहात संपन्न झाले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीत पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांना विविध महसुली सेवांचा तत्काळ लाभ देण्यात आला. विविध प्रमाणपत्रांचे वितरण, महसुली तक्रारींचे निराकरण, ७/१२ उतारे, फेरफार प्रकरणे तसेच इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचला असून महसूल सेवा अधिक सुलभ आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.