02/06/2026
🚩 महत्वाची मागणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या त्यांच्या मूळ गावी विकासासाठी निधी मंजूर केला होता. मात्र तब्बल ८ वर्षांपासून कोणताही प्रस्ताव प्राप्त न झाल्याने हा निधी अद्यापही अखर्चित आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
याच पार्श्वभूमीवर भीमशक्ती विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष समाजभूषण पंकज ललितजी मेश्राम यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आंबवडे येथे आवश्यक भूसंपादन, पुनर्वसन व जागतिक दर्जाचे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, विचार आणि संघर्ष भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंबवडे येथे भव्य स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे.
जय भीम! जय संविधान! 💙
#जयभीम #डॉबाबासाहेबआंबेडकर #आंबवडे #सामाजिकन्याय #भीमशक्ती #महाराष्ट्र #संविधान #बहुजनसमाज 💙✊🏻
01/06/2026
🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
भीमशक्ती संस्थापक मा. खा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचे स्वीय सहाय्यक आयु. दीपक (बापू) थोरात यांना
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌺
आपल्या नम्र, संवेदनशील आणि कार्यतत्पर स्वभावामुळे आपण नेहमीच संघटनेचे बळ वाढवत आहात.
आपणास उत्तम आरोग्य, यशस्वी आयुष्य आणि यशाची नवीन शिखरे गाठण्याची तथागतांच्या चरणी प्रार्थना. 🙏
– भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश परिवार
30/05/2026
“राज्यकर्त्यांपेक्षा न्यायकर्ती अधिक मोठी असते!”
धर्म, न्याय, आणि सेवा यांचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर.
त्यांच्या दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांना प्रजेसाठी माता म्हणून मानलं गेलं.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त
🙏🏽 विनम्र अभिवादन! 🙏🏽
या मातीच्या संत राजमातेचे स्मरण सदैव प्रेरणादायी राहो!
#राजमाता
27/05/2026
त्याग, समर्पण आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या ईद-उल-अजहा बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद घेऊन येवो याच सदिच्छा!
#बकरी_ईद
27/05/2026
🌹 माता रमाई आंबेडकर यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏
ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला संघर्षात साथ दिली, त्यांच्या पाठीशी उभी राहून क्रांतीची वाट उजळवली, त्या माता रमाई आजही आमच्या प्रेरणास्तंभ आहेत.
त्याग, सहनशीलता आणि धैर्य यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई.
“माझा भीमराव समाजासाठी लढतो आहे, मी त्याच्या संघर्षाची साक्षीदार आहे” – ही त्यांची भूमिका आजही अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त, आपण त्यांच्या कार्याला, त्यागाला आणि संघर्षाला मानाचा मुजरा करूया! 🙇♂️
🔷 नारीशक्तीचा आदर्श – माता रमाई!
🔷 संघर्षांची सावली – रमाई!
🔷 बाबासाहेबांच्या यशामागील आधारस्तंभ – रमाई!
🕯️ कोटी कोटी प्रणाम
#माता_रमाई
#रमाई_आंबेडकर
#भीमरायांची_रमाई
#महिला_सशक्तीकरण
ीम
26/05/2026
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रबोधनकार डॅा. अनिरुद्धजी वनकर
यांनी माझ्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्य कार्यकारिणी निवड प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन घेतले.
या प्रसंगी समाजभूषण पंकज मेश्राम, भूषण गायकवाड, गौतम गवई, मनोज बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
20/05/2026
✋🇮🇳 दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाशी महत्वपूर्ण संवाद…
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे जी यांची नवी दिल्ली येथे राज्यसभेचे खासदार मा. श्री. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या समवेत समाजभूषण पंकज मेश्राम आणि भूषण गायकवाड यांनी सदिच्छा भेट घेतली.
या विशेष भेटीदरम्यान अमरावती व अकोला जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वसामान्य मागासवर्गीय कार्यकर्त्यांना जिल्हा व राज्यस्तरावर संधी मिळावी, यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सामाजिक न्याय, संघटन बळकटी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दिशेने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. ✊🇮🇳
15/05/2026
✊🏽 भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक आसते…
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक आसते !! ✊🏽
दलित-शोषितांच्या हक्कासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे,
गीतांमधून क्रांती चेतवणारे,
क्रांतीशाहीर वामनदादा कर्डक
यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतीशील अभिवादन! 🙏🏽🌹
आज त्यांच्या ज्वलंत शब्दांची आणि जागवणाऱ्या ओळींची समाजाला पुन्हा नव्याने गरज आहे…
चळवळीला दिशा देणारा, प्रेरणा देणारा आवाज… वामनदादा!
#वामनदादा_कर्डक #क्रांतीशाहीर #जयभीम
14/05/2026
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ज्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी अपार यातना सहन केल्या, पण कधीही शत्रूपुढे न झुकता स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित ठेवला…
अशी असामान्य शौर्यगाथा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज!
🔥 “मरण पत्करू पण धर्म न सोडू!” या मंत्रावर चालणारे हिंदवी स्वराज्याचे खर्या अर्थाने रक्षक!
🙏 छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय त्याग, शौर्य आणि बलिदानाला कोटी कोटी प्रणाम!
आपण सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया.
⸻
#संभाजीमहाराज #छत्रपतीसंभाजीमहाराज #जयसंभाजी #शौर्यदिवस
14/05/2026
मुंबई भीमशक्ती युवा नेते आयु. किरण गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस आयुष्यात नेहमी सुख, शांती, आनंद व यश लाभो, हिच तथागत बुद्धांच्या चरणी प्रार्थना!
आपले विचार, कार्य आणि सामाजिक बांधिलकी अशीच समाजासाठी प्रेरणा ठरो, हीच शुभेच्छा! 🙏
#वाढदिवसाच्या_शुभेच्छा #भीमशक्ती