NCP Mumbai

NCP Mumbai

Share

Official page of Mumbai Regional Nationalist Congress Party - Mumbai NCP

Photos from NCP Mumbai's post 21/05/2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'समता महोत्सव २०२५' आज मुंबई, वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कर्तृत्त्वान मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, अभिनेते मिलिंद शिंदे, बौध्द धर्मप्रचारक भदंत आर. आनंद, आंबेडकर साहित्य संग्रहाकार रमेश तुकाराम शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या पानसरकर, प्रियदर्शनी जाधव यांचा सन्मान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी गायक आदर्श शिंदे यांचा गजर भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मा. श्री. नवाब मलिक, मा. आ. श्रीमती. सना मलिक - शेख, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, माजी खासदार मा. श्री. समीर भुजबळ, माजी आमदार मा. श्री. झिशान सिद्दीकी, युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुरज चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक आणि मुंबई कार्याध्यक्ष मा. श्री. सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते मा. श्री. संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. संतोष धुवाळी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष मा. श्री. महेंद्र पानसरे, माजी नगरसेवक मा. श्री. कप्तान मलिक, मुंबई महिला अध्यक्षा मा. श्रीमती आरती साळवी, मुंबई युवक अध्यक्ष मा. श्री. सुनिल गिरी, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष मा. श्री. विभू घुगे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.




Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


A/5, Nationalist Congress Party, Madam Cama Road, Opposite Mantralaya, Mumbai , Mumbai, India
Mumbai
400032