Indian National Congress - Maharashtra

Indian National Congress - Maharashtra

Share

Official Page of Maharashtra Pradesh Congress Committee

02/06/2026

पेपरफुटीचा सरदार धर्मेंद्र प्रधान चा राजीनामा झालाच पाहीजे!

आज मुंबईच्या रस्त्यांवर युवक कॉंग्रेस आंदोलन करत असताना NEET पेपरफुटी व CBSE घोटाळ्याचा हा सरदार स्वतःला वाचविण्यासाठी छोटे मोहरे असलेल्या CBSE तील अधिकाऱ्यांवर कारवाई करत होता.

पण लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा करणाऱ्या या लीक प्रधान चा राजीनामा घेतल्या जात नाही, तोपर्यंत युवक व विद्यार्थ्यांचा हा आक्रोश थंड होणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लक्षात घ्यावे.

आज मुंबईतील आक्रोश मोर्चाचे नेतृत्व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब व मुंबई युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केले.

Uday Bhanu Chib Zeenat Shabrin Inc
Mumbai Youth Congress
Indian Youth Congress

02/06/2026

भाजपने शिक्षण व्यवस्थेला पेपरफुटीच्या माफियांच्या माध्यमातून लुटीचा व्यवसाय बनवून टाकले आहे. व्यापम घोटाळ्यापासून सुरू झालेल्या या कथानकाची किंमत आता CBSE च्या विद्यार्थ्यांनाही मोजावी लागत आहे.

मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेस अध्यक्ष

02/06/2026

विकासाचा GDP वाढला नाही, पण सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा हा 'नवा GDP' नक्कीच वाढलाय!

02/06/2026

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला आहे!

Photos from Indian National Congress - Maharashtra's post 02/06/2026

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हा लढा न्याय्य मागण्या मान्य झाल्याशिवाय थांबणार नाही!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा आज कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट क्रांती महामोर्चा पुणे-नाशिक महामार्गावरील भोरवाडी, आंबेगाव येथे पार पडला.

सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्यायाने पेटलेला बळीराजा अडथळ्यांना घाबरत नाही. हजारो शेतकरी सर्व अडथळे पार करून आंदोलनस्थळी पोहोचले आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम, कांद्याला न्याय्य भाव आणि शेतीला सन्मान मिळालाच पाहीजे, या मागण्यांशी तडजोड कधीही केली जाणार नाही.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके, आ. बापूसाहेब पठारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आ. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. देवदत्त निकम, पुणे ग्रामीण कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. लहुआन्ना निवंगूने, श्री. कमलाकर सातव तसेच महाविकास आघाडीतील स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

02/06/2026

या भाजप आमदाराच्या म्हणण्याप्रमाणे, भाजप निवडणुकीत फेरफार करून विजय मिळवतो.

निवडणुका निवडणूक आयोग, ईव्हीएम (EVMs) आणि मतांच्या चोरीच्या माध्यमातून जिंकल्या जातात.

हे लोकांच्या मतांनी निवडणुका जिंकत नाहीत; म्हणूनच, यांना जनतेची काहीही पर्वा नाही. लोकांच्या हालअपेष्टांमुळे यांना काहीही फरक पडत नाही.

02/06/2026

मला ना मुख्यमंत्री व्हायचं आहे, ना मंत्री व्हायचं आहे. पदं आणि सत्तेपेक्षा माझ्यासाठी विचारांचा संघर्ष महत्त्वाचा आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांनी दाखवलेल्या मार्गावरून मी पुढे चाललो आहे. या प्रवासात माझं काय होईल याची मला पर्वा नाही.

मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Harshwardhan Sapkal

02/06/2026

स्वतःच्याच उत्तरपत्रिकेची योग्य तपासणी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला ₹2,000 पर्यंत पैसे भरावे लागू शकतात. विचार करा, जेव्हा 4 लाख मुलांनी असे अर्ज केले असतील, तेव्हा CBSE किती कमाई करत असेल?

मा. श्री. राहुलजी गांधी
लोकसभा विरोधीपक्ष नेते

Rahul Gandhi

02/06/2026

निष्पाप आदिवासी कुटुंबावर झालेल्या पोलीस अत्याचार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारणार!

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार श्री. रोहित पवार यांची आज दुपारी २:०० वाजता जळगाव जामोद पोलीस स्टेशन (जि. बुलढाणा) येथे संयुक्त पत्रकार परिषद.

Harshwardhan Sapkal Rohit Rajendra Pawar

02/06/2026

असा कसा देत नाय,
घेतल्याशिवाय राहत नाय!

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विराट क्रांती महामोर्चा, भोरवाडी, पुणे-नाशिक महामार्ग

Harshwardhan Sapkal

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai