आपल्या या पृष्ठाचे (पेजचे) आज १००० 👍 लाईक्स पुर्ण झाले, त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व अभिनंदन !
💐
Vihar Lake
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vihar Lake, Landmark & historical place, kanjurmarg, Mumbai.
27/06/2020
विहार तलाव व परिसराचा सुमारे ९३९ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला शिलालेख.
मुंबईतील विहार येथे (सध्याच्या विहार तलावाजवळ) शिलाहार राजा अनंतदेव याच्या काळातील गध्देगाळ सापडली आहे. गध्देगाळ हा शिलालेखाचाच एक प्रकार असून हा प्रकार शिलाहार राजवटीत विशेष प्रसिद्ध होता. सध्या ही गध्देगाळ मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे.
४’ x १.५” आकाराचा गध्देगाळ शिलालेख वालुकाश्म दगडात कोरण्यात आला आहे. गध्देगाळीचा वरचा भाग गोलाकार असून त्याभागात चंद्र-सूर्य कोरलेले आहेत. नंतर कोरीव लेख असून त्याच्या खाली गाढव व स्त्री संकरशिल्प आणि खालच्या भागात अजून तीन ओळी कोरल्या आहेत. ह्या सर्वात खाली असलेल्या तीन ओळींचे आजतागायत वाचन करता आलेले नाही.
ह्या गध्देगाळीची किंवा शिलालेखाची पहिली नोंद इ.स.१८८२ साली प्रकाशित झालेल्या बॉम्बे गॅझेटीयर, Vol XIV मध्ये करण्यात आलेली आहे. त्यात हा शिलालेख शक १००३ (इ.स.१०८१)मध्ये शिलाहार राजा अनंतदेव याच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला असल्याचे नमूद केले गेले आहे.
शिलालेखाचे वाचन :
संवतु (त्) १००३ महामण्डलेस्व (श्व) राध्दि (धि) पतिश्रीअनं-
तं (त) देव अमात्यरु[द्र]पैयेत्यादि श्रीकरणं (णम्) | विया–
डिकवंस (श) मावैयासुत अज्यपा नायकस्य खै-
रामणं यत्र सिध्दाय देणा पडणं गृहद्रम्म
अर्थ :
संवत १००३ मध्ये महामंडलेश्वराधिपति श्रीअनंतदेव याच्या राजवटीत त्याचा अमात्य रुद्रपैय व इतर अधिकारी असताना, वियाडिक वंशातील मावैयाचा पुत्र अज्यपानायक याला खैरामण गावातील काही घरांची घरपट्टी द्रम्माच्या रुपात दान दिली.
शिलालेखाचा ठसा :
शिलाहार राजा अनंतदेव याचा विहार शिलालेख
लेख नागरी लिपीत कोरलेला असून भाषा संस्कृत असली तरी तिच्यावर मराठीचा प्रभाव आहे. ह्या लेखात खैरामण ह्या स्थानाचा उल्लेख आहे. पण हे स्थान नक्की कोणते हे कळून येत नाही. भगवानलाल इंद्राजी यांनी खरासण असे वाचले आणि त्याचा संदर्भ पारसी जमातीशी जोडला. डॉ. म. गो. दीक्षित यांनी खैरामणच्या ऐवजी वैणापटण असे वाचले आणि ते विहारचे जुने नाव असावे असे त्यांनी सुचवले. परंतु त्याला कोणताही पुरावा नाही आहे.
संदर्भ :
Corpus Inscriptinum Indicarum Volume VI, Inscriptions of the Shilaharas, 1977 (Editor: V. V. Mirashi)
प्राचीन मराठी कोरीव लेख (संपादक: शं. गो. तुळपुळे)
श्री. पंकज विजय समेळ यांचा ब्लॉग
#विहारतलाव #विहारसरोवर
01/06/2020
The golden age of Vihar Lake.
In the 70's and 80's, Vihar Lake was a priority in the list of tourist attractions in Mumbai. School trips were coming here regularly. The children were playing in the side garden. It has two small towers called 'Humpty' & 'Dumpty' as well as a large round face for children to play. this park and those building were the center of attraction. People used to walk on the embankment here. This place looks very beautiful in the rainy season. The water flowing from the dam still looks attractive today.
After a series of bomb blasts in Mumbai in 1992, the place was closed for security reasons. At present, only people from Ultanpada tribal villages are admitted from here. The land of the entire lake falls within the boundaries of the village of Mauje Tirandaj as per Corporation.
There is also a BEST bus station. From here two bus lanes departs.
25 LTD. Vihar Sarovar to Prabodhankar Thackeray Udyan, Sewree Bus Station (until now, this bus route was towards Backbay Depot) &
186. Vihar Sarovar to Agarkar Chowk, Andheri Station (East)
https://goo.gl/maps/kX74LnbdJqPUXevY6
#विहारतलाव #विहारसरोवर
01/06/2020
विहार तलावाचा सुवर्णकाळ.
६०, ७० आणि ८०च्या दशकात मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीमध्ये विहार तलावाचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. शाळांच्या सहली नियमितपणे येथे येत असत. बाजूला असलेल्या उद्यानामध्ये मुले खेळत असत. येथील उद्यानात मुलांना खेळण्यासाठी 'Humpty' आणि 'Dumpty' नावाचे दोन लहान मिनार आणि एक मोठा गोलाकार चेहरा आहे. मुलांसाठी हे उद्यान आणि ह्या वास्तू आकर्षणाचे केंद्रस्थान होते. येथील बंधाऱ्याच्या बांधावरून लोक फिरत असत. पावसाळ्यात हे ठिकाण खुपच सुंदर दिसते. बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी आजही विलोभनीय दिसते.
१९९२च्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे ठिकाण फिरण्यासाठी प्रतिबंधित केले. सध्या येथून फक्त उलटणपाडा आदिवासी गावठाणच्या लोकांनाच प्रवेश दिला जातो. संपूर्ण सरोवराची जमीन महानगरपालिकेच्या मौजे तिरंदाज या गावाच्या हद्दीत येते.
येथे बेस्टचे बस स्थानक देखील आहे. येथून पूर्वीपासून दोन बस मार्गिका सुटतात.
२५ मर्या. विहार सरोवर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस स्थानक (आता-आतापर्यंत हा बसमार्ग बॅकबे आगारापर्यंत होता.) आणि
१८६. विहार सरोवर ते आगरकर चौक, अंधेरी स्थानक (पूर्व) https://goo.gl/maps/kX74LnbdJqPUXevY6
#विहारतलाव #विहारसरोवर
26/01/2012
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Kanjurmarg
Mumbai
400072
