19/04/2026
अक्षय तृतीया – संपत्ती, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा शुभ दिवस!
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि यश अक्षय राहो. 💫
#अक्षयतृतीया
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashok Mishra BJP, Political organisation, Mumbai.
19/04/2026
अक्षय तृतीया – संपत्ती, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा शुभ दिवस!
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि यश अक्षय राहो. 💫
#अक्षयतृतीया
15/04/2026
अंधेरीला आदर्श विधानसभा बनवण्याचा दृढ संकल्प
जनतेच्या सहभागातून विकासाची गंगा सतत वाहती ठेवणार
बाटी-चोखा सारख्या सामाजिक उपक्रमातून एकता आणि संवाद अधिक बळकट
जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद!
मा आमदार श्री मुरजी (काका) पटेल यांनी कार्यक्रम वेळी अशोक मिश्रा यांचे कौतुक केले याची दखल वृत्तपत्र वाहिनीने घेतली.
12/04/2026
स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
त्यांचा सुरेल आवाज, अजरामर गीते आणि भारतीय संगीतविश्वावर केलेली अमिट छाप सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… 🌹
12/04/2026
भारतीय जनता पार्टी आयोजित उत्तर भारतीय स्नेह संमेलन आयोजक श्री अशोक अशोक मिश्रा यांच्या सहकाऱ्याने उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास मा. आमदार श्री मुरजी (काका) पटेल, मुंबई भाजप महामंत्री मा .श्री .पवनजी त्रिपाठी, मुंबई उपाध्यक्ष ,महिला मोर्चा सौ. संध्याताई यादव भाजप नेते श्री गजेंद्र भंडारी जी तसेच पत्रकार श्री आदित्य दुबे जी ,नवभारतचे पत्रकार श्री .राजकुमार सिंह जी ,पत्रकार दिनेश जी ,वकील मनोज सिंह जी ,डॉ .शिवशयाम जी इतर मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
उत्तर भारतीय बांधवांमध्ये एकात्मता, बंधुता आणि सांस्कृतिक जपणूक यांचा सुंदर संगम या संमेलनातून अनुभवायला मिळाला.कार्यक्रमाचे संचालन श्री उत्तम पांडे जी ने केला .
06/04/2026
सेवा, संघर्ष आणि समर्पणाची ४६ वर्षे…
भारतीय जनता पार्टीचा अभिमानाचा प्रवास!
स्थापना दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
02/04/2026
“ज्याच्या हृदयात प्रभू श्रीराम वास करतात, ज्याच्या चरणी साक्षात शक्ती नतमस्तक होते... अशा संकटमोचन महाबली हनुमानाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो.
श्री हनुमान जयंतीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🚩”
#हनुमानजयंती
30/03/2026
प्रभाग क्र. ७९ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (वास्तु उद्यान)बाहेरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.सदर काम पूर्ण करून देण्याचा शब्द मी महानगर पालिका निवडणुकीच्या आधी नागरिकाना शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे हे काम आज माझ्या स्वखर्चातून पूर्ण करण्यात आले.मा. आमदार श्री मुरजी (काका) पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी सदर ठिकाणी उपस्थित राहून कामाची पाहणी करून ते पूर्ण करून घेतले.
या प्रसंगी तेथील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#विकासकाम #प्रभाग७९ #मुंबई #रस्तेकाम LokSeva
27/03/2026
श्रीराम नवमी च्या पावन दिना निमित्ताने प्रभाग क्र. ७९ मधील विविध मंडळांना सदिच्छा भेट दिली. 🙏या भेटीदरम्यान मंडळांमध्ये सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून श्रीरामांचे दर्शन घेतले व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वत्र उत्साह, श्रद्धा आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा अंगीकार करत समाजात एकात्मता, सद्भावना आणि संस्कारांची जपणूक व्हावी, हीच मनापासून इच्छा.
27/03/2026
अंधेरी (पूर्व) विधानसभेत हिंदू रक्षक सेना आयोजित श्रीराम नवमी निमित्त भव्य बाईक रॅली उत्साहात पार पडली. मा. आमदार श्री मुरजी पटेल (काका) यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हिंदू बांधव सहभागी झाले होते.या प्रसंगी श्री अशोक मिश्रा यांनी उपस्थित राहून रॅलीत सहभागी होत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
भगवान श्रीरामांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून, एकात्मता व धार्मिक उत्साहाचे दर्शन घडले. 🙏🚩
26/03/2026
श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
प्रभु श्रीरामांच्या आदर्श, संयम आणि धर्मनिष्ठेचा मार्ग आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-शांती आणि समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना 🙏
🚩 जय श्रीराम! 🚩
#श्रीरामनवमी #जयश्रीराम #रामभक्त #हिंदूसंस्कृती #सणउत्सव
23/03/2026
शहीद दिनानिमित्त भारतमातेच्या वीर सुपुत्रांना—भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू—यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन.
स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेलं बलिदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांनी आणि धैर्याने आजही आपल्या देशाला दिशा दिली आहे.
अशा महान क्रांतिकारकांना कोटी-कोटी नमन! 🇮🇳🙏
20/03/2026
प्रभाग क्र. ८० मधील तरुण विकास मित्र मंडळ, व साई हनुमान सेवा समिती मंडळ यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित श्री सत्यनारायण पूजेच्या दर्शनासाठी मा. श्री अशोक मिश्रा यांनी उपस्थित राहून सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी मंडळाचे पध्दीकारी व नागरिक उपस्थित होते
#गुढीपाडवा #वार्ड80