Municipal Engineers Association, Mumbai

Call Directions

Municipal Engineers Association, Mumbai This page is created only for BMC Engineers. Rest are requested not to like d page.

अभियंत्यांच्या विविध प्रश्नांवर मा. संचालक (अ.से. व प्र.) यांच्या दालनात बैठक पार पडली. संघटनेकडून अभि. नवनाथ घाडगे जीवन...
22/10/2026

अभियंत्यांच्या विविध प्रश्नांवर मा. संचालक (अ.से. व प्र.) यांच्या दालनात बैठक पार पडली. संघटनेकडून अभि. नवनाथ घाडगे जीवन पाटील , विशाल कोकाटे, किरण जकापुरे व राहुल कोल्हे आदी उपस्थित होते.

१) कनिष्ठ अभियंत्यांना दुय्यम अभियंता पदी पदोन्नती देण्याची प्रकिया प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहे. तसेच दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती तात्काळ पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.
२) सहा. अभियंता पदांची थेट भरतीऐवजी पदोन्नतीने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया व्हावी यासाठी अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्या दालनात नगर अभियंता व संचालक अभियांत्रिकी यांच्या उपस्थितीत मीटिंग आयोजित केली जाणार आहे.
३) ॲानलाईन बदल्यांबाबत संघटनेने काही सूचना दिल्या आहेत.
त्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.

सदर बैठकीस संबंधित अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनादेखील विविध विषय मांडण्याची संधी दिली गेली.

संघटनेकडून अभियंत्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा सातत्याने करण्यात येत आहे.

आपल्या माहितीकरीता

-अभि. डॅा. नवनाथ घाडगे अध्यक्ष (प्र)
-अभि. जीवन पाटील कार्याध्यक्ष (प्र)
म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन, मुंबई.✊

All members of MEA are requested to please take note of this communication  and try to avoid to get associated with susp...
21/10/2026

All members of MEA are requested to please take note of this communication and try to avoid to get associated with suspended members for the reasons there off

अभि. सागर आगाशें यांच्या अकाली निधनाची बातमी खूपच धक्कादायक आणि दुःखद आहे.अभियंता परिवाराचा एक तेजस्वी सदस्य निखळला..!सा...
17/10/2026

अभि. सागर आगाशें यांच्या अकाली निधनाची बातमी खूपच धक्कादायक आणि दुःखद आहे.

अभियंता परिवाराचा एक तेजस्वी सदस्य निखळला..!

सागरच्या कुटूंबीयाच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत..
ओम शांती 🙏🙏🙏

काल दी ७/१०/२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत अभियंत्यांची संघटना मुन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन्स ( MEA) , मुंबई...
08/10/2026

काल दी ७/१०/२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत अभियंत्यांची संघटना मुन्सिपल इंजिनियर्स असोसिएशन्स ( MEA) , मुंबई च्या कार्यकारिणीची सभा संपन्न झाली . संघटनेचे कार्याध्यक्ष इंजी. रमेश भुतेकर , अध्यक्ष इंजी . टी वी शाह , उपाध्यक्ष इंजी. राजेंद्र जोशी आणि कोषाध्यक्ष शरद राघव यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव २/३ पेक्षा जास्त मतांनी समत झाला . घटनेच्या कलम १५ नुसार या सर्वांना निलंबित करण्यात आले . संघटनेचे कामकाज सुरळीत व्हावे म्हणून अध्यक्ष पदाचा अतिरिक्त प्रभार संघटनेचे कार्याध्यक्ष इंजी. डॉ. नवनाथराव घाडगे यांच्याकडे , भुतेकर यांचा कार्याध्यक्ष पदाचा प्रभार संस्थेचे उपाध्यक्ष इंजी. जीवन पाटील यांच्याकडे , कोषाध्यक्ष पदाचा प्रभार इंजी. जयंत खराडे यांच्याकडे व सरचिटणीस पदाचा कार्यभार इंजी. दीपक चौगुले यांच्याकडे देण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला . या कार्यकारिणी सभेस कार्यकारिणीचे ५२ सदस्य उपस्थित होते .

म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या आज सायंकाळी होणाऱ्या कार्यकारीणी सभेस सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांनी वेळेवर उ...
07/10/2026

म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनच्या आज सायंकाळी होणाऱ्या कार्यकारीणी सभेस सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

आपला नम्र,
अभि. नवनाथ घाडगे,
कार्याध्यक्ष,
म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशन, मुंबई

सर्व कायदेशीर बाजू तपासून , स्थानिक पोलिस स्टेशन ला अवगत करून  कार्यकारिणी सभा आयोजित केली आहे . त्यामुळे निश्चिंत राहून...
06/10/2026

सर्व कायदेशीर बाजू तपासून , स्थानिक पोलिस स्टेशन ला अवगत करून कार्यकारिणी सभा आयोजित केली आहे . त्यामुळे निश्चिंत राहून सर्वानी यावे . संघटनाच सेवेतील अभियंत्यांची आहे त्यामुळे चिंता नसावी . सेवेतील अभियंत्याना धमकावणाऱ्यास घरी बसवण्याची योग्य वेळ हीच आहे .
अभि. नवनाथ घाडगे
कार्याध्यक्ष म्यूनिसपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील कामगार , कर्मचारी , अभियंते , अधिकारी याना पूर्वीची पेन्शन योजना लागू करण्यासाठी आयोजित सर्व कामगा...
01/10/2026

मुंबई महानगरपालिकेतील कामगार , कर्मचारी , अभियंते , अधिकारी याना पूर्वीची पेन्शन योजना लागू करण्यासाठी आयोजित सर्व कामगार कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या मेळाव्यात म्यूनिसपल इंजिनिअर्स असोसिएशन्स चा कार्याध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, मुंबई येथे भूमिका मांडताना

कनिष्ठ व दुय्यम अभियंताच्या पदोन्नती बाबतचे नगर अभियंता यांना दिलेले पत्र
30/09/2026

कनिष्ठ व दुय्यम अभियंताच्या पदोन्नती बाबतचे नगर अभियंता यांना दिलेले पत्र

27/11/2025

Address

Bal Dandavate Smruti, N. M. Joshi Marg
Mumbai
400013

Opening Hours

9am - 5pm

Telephone

02223098063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Municipal Engineers Association, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category