01/05/2026
मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना मराठीमय शुभेच्छा.
मायमराठी ही आपल्या भावना, विचार आणि संस्कारांची सजीव अभिव्यक्ती आहे. ती केवळ संवादाचं साधन नसून, आपल्या माणुसकीचा, ओळखीचा आणि सामाजिक बांधिलकीचा पाया आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला मराठीनेच एक मजबूत धागा दिला आहे.
आजच्या आधुनिक युगात इंग्रजीसह इतर भाषांचा प्रभाव वाढत असताना, आपल्या मातृभाषेचं जतन आणि संवर्धन करणं अधिक महत्त्वाचं ठरत आहे. शिक्षण, प्रशासन, कला, साहित्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांत मराठीचा अधिकाधिक वापर करून आपण तिचं सामर्थ्य वाढवू शकतो.
मराठी ही आपल्या प्रत्येकाच्या मनातली ओळख आहे. ती जपणं, वाढवणं आणि पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. या राजभाषा दिनानिमित्त आपण सर्वांनी मराठीचा सन्मान राखण्याचा आणि तिच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्याचा दृढ संकल्प करूया.
01/05/2026
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आजचा हा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि जडणघडणीचा उत्सव आहे. या भूमीने दिलेला पराक्रम, केलेले संस्कार आणि कष्टाची परंपरा आजही प्रत्येक क्षेत्रात आपल्याला पुढे नेत आहे. या प्रगतीच्या प्रवासात असंख्य श्रमिकांचे हात, त्यांची जिद्द आणि त्याग यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
शहरांच्या गगनचुंबी इमारती असोत किंवा गावागावातील शेतमळे.. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा, कामगारांचा घाम आणि कष्ट दिसतात. त्यांच्या मेहनतीमुळेच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि समाजाची प्रगती शक्य होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांचे सुरक्षित, सन्मानजनक जीवन हे आपल्या सर्वांचे प्राधान्य असले पाहिजे.
आजच्या दिनाच्या या निमित्ताने, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करताना श्रमिकांच्या योगदानाचा आदर करूया आणि त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याची जबाबदारी स्वीकारूया. आपला महाराष्ट्र अधिक सक्षम, अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या दिशेने आपण सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाऊया.
30/04/2026
धारावीसाठी आम्ही लढलो आणि धारावीचा विजय झाला!
माहिम-धारावी स्कायवॉकच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, आता या स्कायवॉकची संपूर्ण जबाबदारी बीएमसीची असेल!
वर्षा ताईच्या मेहनतीतून साकारलेल्या या धारावी स्कायवॉकची देखभाल आणि दिवाबत्तीच्या मुद्द्यावरून म्हाडा आणि बीएमसीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ओढाताण सुरू होती. म्हाडाने बांधलेल्या या स्कायवॉकचे हस्तांतरण बीएमसीकडे करण्यात आले होते, परंतु बीएमसीने ते स्वीकारले नसल्याचा दावा केला होता. या गंभीर विषयावर आम्ही आंदोलन केले. जिल्हा नियोजन समिती आणि विधानसभेत आवाज उठवला तसेच बीएमसीकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर बीएमसीने आता अधिकृत पत्र जारी करून हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता या स्कायवॉकची देखभाल योग्य प्रकारे केली जाईल आणि तो कायम प्रकाशमान राहील, अशी आम्हाला आशा आहे.
Varsha Gaikwad
30/04/2026
Dharavi deserves better. And we're making sure BMC delivers. 🔍
Kicked off our ward-by-ward accountability drive across Dharavi today.
Here's what we found and what we demanded ⬇️
🧱 The retaining wall of the drain near Kamala Nagar has collapsed. People are falling in. Raised this in the Assembly. Took officials to the spot today. Repair work must begin immediately.
🚰 Drainage pipes broken. Water pipes and drainage pipes mixing. Streets made unwalkable. Our team showed BMC officials the exact spots — no excuses left.
💧 Pressed the Storm Water Department on the spot to deploy suction pumps and clear choked gutters where the situation was critical.
📍 Today: Ward 186 & 187 reviewed. Coming days: Health department, SWD, and all concerned BMC officials will be with us as we go ward by ward.
This is just the beginning. We will ensure Dharavi is safer, cleaner and prepared for the monsoons
30/04/2026
भारतात चलचित्रांची मुहूर्तमेढ रोवणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे 'पितामह' धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
#दादासाहेब_फाळके
30/04/2026
आपल्या खंजिरीच्या तालावर अवघ्या देशाला राष्ट्रभक्तीची आणि स्वच्छतेची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी केवळ भजने गायली नाहीत, तर 'ग्रामगीता' लिहून खेड्यांच्या विकासाचा पाया रचला. अनिष्ट रूढी-परंपरांच्या बेड्या तोडून समाजात समता आणि एकता रुजवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
#राष्ट्रसंत_तुकडोजी_महाराज
29/04/2026
दोनशेच्यावर निरनिराळे शोध लावणारे, चाळीसहून अधिक शोधांचे एकस्व (पेटंट) संपादन करणारे, भारताचे "एडिसन" म्हणून ओळखले जाणारे महान शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांना जयंतीदिनी वंदन करते. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.