MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत

Share

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अधिकृत प्रसार माध्यम. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अधिकृत प्रसारमाध्यम

Photos from MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's post 04/06/2026

मिरा-भाईंदर मनपा शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मनविसेचे निवेदन; भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी...

मिरा-भाईंदर महानगरपालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दीपाली पवार यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. निवेदनात शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी (PF), उपदान (Gratuity), PF कर्ज प्रक्रिया, आयकर भरणा, वरिष्ठ वेतन श्रेणी, वेळेवर पगार तसेच बदली प्रक्रियेतील अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले. १२ वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना अद्याप वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

तसेच काही शिक्षकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत मुख्याध्यापक पदे व बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार होत असल्याची तक्रार करण्यात आली. अनेक शिक्षकांच्या १५ वर्षांपासून बदल्या झालेल्या नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय शालेय पोषण आहार आणि गणवेश वितरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून करण्यात आली. शिक्षकांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.

Photos from MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's post 04/06/2026



RTE प्रवेशासाठी मनविसेचा यशस्वी पाठपुरावा, ४० ते ५० विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश...

RTE २०२६ अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीदरम्यान विनाकारण प्रवेश रद्द करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या प्रकरणाची दखल घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. प्रवेश नाकारण्यात आलेल्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कोथरूड विभाग अध्यक्ष शशांक अमराळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर निवडक पालकांसह त्यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेऊन महानगरपालिका आणि जिल्हा परिषद स्तरावर विद्यार्थ्यांचे प्रवेश चुकीच्या पद्धतीने नाकारले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सुमारे ८ ते १० दिवसांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जवळपास ४० ते ५० विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत पुन्हा प्रवेश मिळवून देण्यात यश आले.

या यशस्वी पाठपुराव्याबद्दल पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आभार मानत श्री.अमित साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शशांक अमराळे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, कोथरूड विधानसभा सचिव मंदार ठोंबरे, उपाध्यक्ष आकाश बोबडे आणि आदित्य येले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's post 03/06/2026

डहाणूकरवाडी मेट्रोतील विनयभंग प्रकरणानंतर मनविसे आक्रमक; महिला सुरक्षेसाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम...

डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकावर भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
सेनेने मेट्रो प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या घटनेमुळे मेट्रो स्थानकांवरील महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सुरक्षेतील गंभीर त्रुटींवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनायक अनिल राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मेट्रो प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत महिला सुरक्षेबाबत सहा प्रमुख मागण्या मांडल्या. तसेच या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. निर्धारित मुदतीत ठोस उपाययोजना न झाल्यास मेट्रो प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून देण्यात आला. महिलांची सुरक्षा हीच संघटनेची प्राथमिकता असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालाड विधानसभा विभाग अध्यक्ष शशांक डेहलीकर, उपविभाग अध्यक्ष योगेश घरत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष सिद्धेश गवाणकर, कामगार सेना उपाध्यक्ष यशवंत हाडगे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग सचिव श्रीकांत घाडगे, उपविभाग सचिव मयुरेश शेट्ये, शाखा सचिव भावेश सुर्वे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Photos from MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's post 02/06/2026

किर्ती महाविद्यालयाच्या निकालातील त्रुटींवर मनविसे आक्रमक, सुधारित निकालाची मागणी...

किर्ती महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याची गंभीर दखल घेतली. यासंदर्भात संबंधित विद्यार्थी, पालक तसेच माहीम विधानसभा कार्यकर्ते सुमित सातार्डेकर यांच्या समवेत महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात निकालातील त्रुटी तात्काळ दूर करून सुधारित निकाल जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. उद्यापर्यंत निकालात आवश्यक दुरुस्ती न झाल्यास सर्व विद्यार्थ्यांसह पुन्हा महाविद्यालयात येऊन प्राचार्यांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष चिन्मय मुणगेकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

02/06/2026

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नाशिक शहर यांच्या वतीने आयोजित ‘स्वराज्याचं आख्यान’ हा सांस्कृतिक सोहळा नाशिककरांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राची लोककला, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांचे जिवंत चित्र उभे करणाऱ्या कलाकारांनी आपल्या दमदार सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोहित अभय उगांवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपस्थित नाशिककरांचे आयोजकांनी आभार मानले.

Photos from MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत's post 31/05/2026

परीक्षा देऊनही निकालात ‘Absent’; NMU प्रशासनाविरोधात मनविसे आक्रमक...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील TYBCA विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनही निकालात ‘Absent’ दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या Android Application Development विषयाच्या परीक्षेला विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही निकालात गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने परीक्षा संचालक श्री.योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उपस्थिती पत्रकाची तात्काळ पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच सुधारित निकाल त्वरित जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

प्रशासनाने वेळेत दुरुस्ती न केल्यास विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, चोपडा तालुका संघटक चेतन पवार, विद्यार्थिनी वर्षा घाडगे, लीना चौधरी, प्रिया धनगर, चैताली खोंडे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

31/05/2026
29/05/2026

मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहरतर्फे आयोजित “लोककलेचा जागर - फोक प्रबोधन” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी दर्शन घडवणाऱ्या कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने सर्व स्तरांतील नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष श्री. धनंजय विजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित पुणेकरांचे मनःपूर्वक आभार.

28/05/2026

सामाजिक उपक्रमांनी पोलादपुरात श्री.अमितसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा...

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा युवा हृदयसम्राट श्री.अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव काळभैरवनाथ-जोगेश्वरी मंदिरात अमितसाहेब ठाकरे यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणे घालून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर महाड-पोलादपूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तालुक्यातील विविध आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन लहान मुलांना अल्पोपहार व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी महाड-पोलादपूर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Maharashtra NavNirman Sena, 2nd Floor, Matoshri Towers, Padmabai Thakkar Marg, Shivaji Park, Mahim
Mumbai
400016