28/05/2023
आज नव्या संसदभवनाच लोकार्पण/उद्घाटन झालं त्यावेळी प्रसारित झालेल अखंड भारताच मानचित्र, संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी याव्यतिरिक्त एकही इतर उल्लेख यात नाही जेव्हां इस्लाम चा ई आणि ख्रिस्ता चा ख नव्हता तेव्हाचा समृध्द अखंड हिंदु भारत आणि आज नवीन संसद भवनात घुमलेला वेदमंत्रांचा घोष निस्सीम शिवभक्त असलेल्या चोल रजवांशाचा नंदी ची प्रतिमा असलेला सेंगोल राजदंड हे सर्व १९७० ला संविधानात घुसवलेल्या धर्मनिरेक्षतेचा छेद करेल का ? हा हिंदु संस्कृतीचा उषःकाल समजावा का ?
#मोदी_हैं_तो_संभव_है
#भगवं_वादळ
05/03/2021
दोन पक्षी आहेत.! त्याबद्दल जरा सांगतो आज.! आणि हिंदूंना त्या दोन पक्ष्यांच्या बद्दलची जी माहिती आहे, त्यावरून खूप काही शिकण्यासारखं आहे.!
पक्षी क्रमांक एक : #डोडो.!
हा डोडो नावाचा पक्षी मॉरिशस आणि हिंदमहासागराच्या बाकी काही द्विपांवर बऱ्याच वर्षांपूर्वी सापडत होता.! तिथे त्यावेळी मनुष्यवस्ती बिलकुल नव्हती.!
हे डोडो तिथे आरामात रहायचे.! कारण त्या द्विपांवर त्यांची शिकार करणारे दुसरे कोणीच नव्हते.! त्यामुळे हळू हळू हा डोडो पक्षी आत्मरक्षा करणे आणि शत्रूवर आक्रमण करणे, हे अजिबात विसरून गेला.! नंतरच्या त्याच्या पिढ्यांना तर एकच उद्योग होता.! खाणे, पिणे, रिकामचोट फिरणे, आणि झोपणे.! बास.!
त्यांना जोरात पळाव लागत नव्हत.! कुणा शत्रूचा पाठलाग करावा लागत नव्हता, पंख असूनसुद्धा, क्षमता असूनसुद्धा उडण्याची आवश्यकताच पडत नव्हती.! त्यामुळे त्यांच्या पायाची हाडं ही हळू हळू दुबळी होत गेली.! आणि फक्त त्यांच्या गब्दुल शरीराचा भार संभाळण्याइतपतच त्यांच्या पायात जोर राहिला.!
सोळाव्या शतकाच्या सुरवातीला मॉरिशस मध्ये डच लोकांनी पहिले पाऊल ठेवले.! त्यांनी ह्या डोडोला बघितलं आणि प्रचंड आश्चर्यात पडले.! कारण खूप सहजगत्या ह्या पक्ष्याला ते पकडू शकत होते.! मग डच लोकांनी ह्या डोडोची शिकार करायला सुरुवात केली.!
ह्या डच लोकांनी त्यांच्यासोबत त्यांचे कुत्रे पण आणले होते.! आणि खूप सारे उंदीर ह्या डचांचे सोबती म्हणून त्या बेटावर गेले होते.! ह्या कुत्र्यांनी पण ह्या डोडोची शिकार करायला सुरुवात केली.! उंदीर डोडोची अंडी खाऊन टाकायचे.!
तरीपण हा डोडो पक्षी कधीच स्वतःच किंवा त्याच्या अंड्यांचं संरक्षण करायचा नाही.! कारण पिढ्यानपिढ्या त्याला आक्रमकतेची आवश्यकताच पडली नव्हती.! तो जीव वाचवून जोरात पळून जाणे किंवा हल्ला करणे हे साफ विसरूनच गेला होता.!
परिणाम असा झाला की सन १७१० पर्यन्त ह्या पृथ्वीतलावरून डोडो नामक पक्ष्याची प्रजाती संपूर्णपणे विलुप्त झाली.! आता ह्या पक्षाच्या दोन प्रतिकृती पेंढा भरून ठेवण्यात आल्या आहेत.! एक आहे ब्रिटनच्या रॉयल म्युझियम मध्ये आणि दुसरी आहे मॉरिशस युनिव्हर्सिटी मध्ये.!
आता पक्षी क्रमांक दोन : #केसोवरी.!
हे केसोवरी साहेब ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी ह्या प्रदेशात म्हणजे प्रशांत महासागर आणि कॅरेबियन समुद्र ह्यांच्यामधल्या अनेक बेटांवर वस्तीला असतात.! हा पक्षी शहामृग, इमू आणि डोडो ह्यांच्याच प्रजातीमधला आहे.!
ह्याला सुद्धा डोडोसारख्याच परिस्थितीमध्ये जगावं लागलं.! ह्यांची पण शिकार करणारे प्राणी होते, अगदी मनुष्यप्राण्यासकट.!
पण ह्यांच्या प्रत्येक पिढीने आलेल्या अनुभवांवरून स्वतःमध्ये प्रचंड आक्रमकता, संताप, अत्यंत धोकादायक हत्यार विकसित करून घेतले.! मनुष्य किंवा बाकी दुसरे प्राणी बघितल्यावर हा पक्षी फक्त स्वतःच संरक्षण करतो.! ती विचारधारणा त्याने त्याच्यात विकसित करून घेतलीये.!
आज परिस्थिती अशी आहे की ह्या पक्ष्याने मनुष्याला बघितलं की त्या मनुष्याच्या आयुष्याची दोरीच तुटली म्हणून समजा.! कारण हा त्या माणसाला पळवू पळवू त्याच्या पंजाने फाडून मारतो.! हा केसोवरी तशी ५० किलोमीटर वेगाने पळू शकतो.! ह्याच्या पंजाची नख ही ८ इंच लांब असतात आणि चांगली धारदार असतात.!
ह्यांनी अजून एका बाबतीत नैपुण्य मिळवलंय.! हे शत्रूवर झुंडीने आणि नियोजनपूर्वक हल्ला करतात.! ब्रिटीशांनी ह्या प्रदेशावर कबजा केला, तेंव्हा ते ह्यांची शिकार बंदुकीने करायचे, तेंव्हा दुसरीकडून ह्यांची एक झुंड त्या बंदूकधारी शिकाऱयांवर हल्ला चढवायची.!
आज परिस्थती अशी आहे की ह्या प्रदेशातल्या ज्या जंगलात ह्यांची वस्ती आहे, वावर आहे, तिथे धोक्याची सूचना देणारे मोठे मोठे फलक लावलेले आहेत.! कारण मनुष्याला बघितलं की हे पक्षी अनावर होऊन हल्लाच करतात.!
केसोवरी ही प्रजाती आज नष्ट झालेली नाही, उलट त्यांच्या नैसर्गिक वातावरणात ती प्रजाती वाढतीये.!
निसर्गाने घालून दिलेला नियम आहे हा.! जो निसर्ग अत्यंत कठोरतेने पाळतो पण.!
जी सजीव प्रजाती आपल्या पुढच्या पिढ्यांना मागच्या आणि वर्तमानातल्या अनुभवांवरून प्रतिकार करायला, स्व संरक्षण करायला शिकवत नाही, ती सजीव प्रजाती एका काळानंतर ह्या पृथ्वीतलावरून नष्ट होऊन जाते.!
आपल्या देशाचा लचका तोडून जो भाग शांतिदूताना दानात दिल्या गेला, त्या पापिस्तानात हिंदूंनी बांधलेल्या मोठ्या मोठ्या घरात, हवेल्यात आज तेच शांतिदूत मोठ्या दिमाखात रहातायत.!
काश्मीर मध्ये हिंदूंच्या घरांवर, जमिनींवर, मालमत्तेवर शांतिदूतांचाच कब्जा आहे.! केरळ मध्ये कासारगौडमध्ये सुद्धा हिंदूंच्या मालमत्तेवर ह्या शांतिदूतांचाच कब्जा आहे.!
ही फक्त काही उदाहरण आहेत, जिथून हिंदू नामशेष झालाय किंवा नामशेष होण्याच्या पातळीवर आहे.! बाकी हिंदुस्थानात अशी बरीच ठिकाण आहेत जिथे हीच परिस्थिती आहे ! सगळंच लिहीत बसलो, तर खूप मोठा लेख होईल.!
कधी शिकणार हिंदू.? कधी भोवतालच्या परिस्थितीच आकलन होणार हिंदूला.? कधी हे समजून घेऊन जातीपातीच्या चिखलातून बाहेर येऊन हिंदू एक होणार.?
आता तुम्हीच ठरवा हिंदूंनो, की सर्वधर्मसमभाव नावाच्या नशे मध्ये डोडो पक्षी व्हायचं का केसोवरी पक्षी व्हायचं.!
निर्णय तुमचा.!
लेख संकल्पना आणि फोटो : #जितेंद्र_प्रताप_सिंह
आनंद कुलकर्णी
01/02/2021
छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या माणसांचे आदरातिथ्य करून त्यांना कॉफी दिली ! :एका डच माणसाचा वृत्तांत
शीर्षक वाचून दचकला असाल ना ! हो तसा दचकण्या सारखाच उल्लेख आहे हा, परंतु हा वृत्तांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हैदराबाद मध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या आणि शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका अनामिक डच माणसाने लिहून ठेवला आहे, त्यामुळे तो खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या डच माणसाने पुढे, शिवाजी महाराज आणि कुतुबशाहाची भेट झाली तेव्हा एका खिडकीतून ," मी ही भेट पाहिली" असे देखील लिहून ठेवले आहे आणि त्या भेटीत काय घडले याचेही वर्णन तो करतो.
कॉफी बद्दलचा वृत्तांत पुढील प्रमाणे आहे,
छत्रपती शिवाजी महाराज हैदराबाद शहराच्या वेशीवर असताना, हैदराबादेत उपस्थित असलेला आपला अनामिक डच माणूस लिहितो,
“ गोलकोंड्याच्या राजाला भेटण्याची संधी मला अनेकदा मिळाली. १६७६ साली प्रसिद्ध शिवाजी राजा १२००० पायदळ आणि २४००० घोडदळ घेऊन आला आणि हैदराबाद पासून ३ लीगच्या अंतरावर (सुमारे १५ किलोमीटर ) येऊन थांबला आणि त्याने, "भरपूर खंडणी दिली नाहीत तर आम्ही तुमचं शहर जाळून राख करून टाकू" अशी धमकी त्याने गोलकोंड्याच्या राजाला दिली . शिवाजी राजाने दिलेल्या या धमकी मुळे हैदराबाद शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले . आम्ही देखील आमची वखार (डच ईस्ट इंडिया कंपनीची वखार ) , तिच्यात असलेला मौल्यवान माल आणि आमच्या जीवाचे आता कसे होणार या भीतीने थरथर कापू लागलो .
शिवाजी राजाच्या रूपाने आमच्यावर कोणतीही आपत्ती कोसळू नये म्हणून हेर हार्टसिन्क यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे यान व्हान न्येनदाल यांनी शिवाजी राजाच्या छावणीत जाऊन त्याची भेट घेतली आणि त्याने आमच्यावर हल्ला करू नये म्हणून, ऍबिगेलने ज्याप्रमाणे राजा डिव्हेडला भेटवस्तू दिल्या होत्या (बायबल मधली एक कथा) , त्याचप्रमाणे आम्ही त्याला १००० फ्लोरिन किमतीचे बदाम, खजूर, द्राक्षं आणि पिस्ते भेट म्हणून दिले. आमच्या भेटीसाठी उभारलेल्या खास तंबूमध्ये त्याने आम्ही दिलेल्या भेटवस्तू मोठ्या नम्रतेने स्विकारल्या. या प्रसंगी आमच्या माणसांना त्याने कॉफी दिली , त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घातले , त्यांना मानाची वस्त्रे दिली आणि त्यांनी निर्भयपणे वखारीकडे जावे आणि निश्चिन्त असावे, आमच्याकडून तुम्हाला किंवा तुमच्या वखारीला कोणताही उपद्रव होणार नाही असे त्यांना सांगितले.”
या डच माणसाने हा वृत्तांत , ही घटना घडून गेल्यानंतर १० वर्षांनी लिहिला आहे त्यामुळे त्याची ही आठवण कितपत अचूक असेल हे आज सांगता येणे कठीण आहे, परंतु तरी देखील या प्रसंगात शिवाजी महाराजांकडून डचांना कॉफी देण्यात आली हा उल्लेख निश्चितपणे अप्रूप निर्माण करणारा आहे ! त्याकाळी कॉफी हा पदार्थ अस्तित्वात होता या बद्दल काही शंका नाही, कारण कॉफीचा उल्लेख ‘कहावा’ या नावाने मआसिर ए आलमगिरी मध्ये आला आहे. (पहा- मआसिर ए आलमगिरी, इंग्रजी भाषांतर, जदुनाथ सरकार, पृ. १७७)
हा प्रसंग English Records on Shivaji या पुस्तकात पृ. ३४९ वर दिला आहे. मूळ उल्लेख रॉबर्ट ऑर्म याच्या हस्तलिखितात खंड २६८, पृ. १-११ वर आहे. रॉबर्ट ऑर्म याची हस्तलिखिते ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे असल्याचे समजते. (https://discovery.nationalarchives.gov.uk/details/r/9fb04bbe-15d8-4966-a171-ef4db9875dfa)
श्री संकेत कुलकर्णी Sanket Kulkarni यांनी शोध घेतला तर मूळ हस्तलिखित मिळू शकेल
लेखन सीमा
संदर्भ:-
१) English Records on Shivaji
२) Shivaji : His Life and Times, Gajanan Bhaskar Mehendale
चित्रें:-
१) छत्रपती शिवाजी महाराजांचे डच माणसाने काढलेले चित्र
२) English Records on Shivaji मधला कॉफीचा उल्लेख
लेखक
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे,
३१ जानेवारी २०२१
28/01/2021
मुंबई भायखळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली
आज पौष पौर्णिमा ( दि. २८ जानेवारी २०२१ ) अर्थात माँसाहेब जिजाऊमाता जयंती निमित्ताने भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुंबई विभागातील धारकऱ्यांनी मोठ्या संख्येंने शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र येउन राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या मुर्तीचे आणि बाल शिवराय यांच्या मुर्तीचे कांजुरमार्ग येथील धारकरी सचिनराव गावडे आणि त्यांच्या सौभाग्यवतींकडून पूजन करण्यात आले. आदरणीय भिडे गुरुजींनी लिहिलेले श्लोक वाचन करण्यात आले !
पाश्चिमात्य Mother day साजरा करण्यापेक्षा पौष पौर्णिमा अर्थात राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती हाच खरा #मातृदिन आहे आणि हा दिवस संपूर्ण देशात मातृदिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा याप्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री. पुरुषोत्तम बाबर यांनी व्यक्त केली.
पुरुषोत्तमदादा बाबर, स्वप्नीलराव म्हात्रे, शार्दुलराव खरपुडे आणि मिलिंदराव नारकर यांनी नियोजन केले होते. कार्यक्रमाला शोभेल अशी सुंदर रांगोळी काढली गेली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांकरता रेल्वे बंद असतानाही मिळेल ते वाहन घेउन मुंबईभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त धारकरी उपस्थित होते !
|| श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ||
मुंबई विभाग
27/01/2021
पौष पौर्णिमा ,
आंग्ल दिनांक २८ जानेवारी,२०२१
22/01/2021
पकडल्या गेलेल्या क्षणापासून त्यांच्यावर अनेक अत्याचार केले गेले डोळे फोडले,अंगावरची सर्व चामडी सोलून काढली पुन्हा चार दिवसांनी त्या ठिकाणी दुधावर ज्याप्रकारे साय येते तशी चामडी यायची ती पुन्हा सोलून काढली जायची अधिक वेदना व्हाव्या म्हणून मीठ चोळले जायचे कान कापून काढले नंतर काही दिवसांनी जीभ कापून टाकली जीभ कापल्यावर संभाजी महाराजांनी अन्न ग्रहण करणं सोडून दिलं.
नंतर त्यांच्या मृत्यू जवळ आला असं औरंगजेब ला समजलं तेव्हा पायापासून शरीराचे तुकडे करा असा आदेश दिला कारण गळ्यावर घाव घातल्यावर जीव लगेच जाईल अन वेदना ही कमी होतील.
म्हणून पायापासून डोक्यापर्यंत तुकडे करण्यात आले हे तुकडे गावाबाहेर नदी पात्राच्या निवडुंगाच्या झाडीत टाकण्यात आले.
किती ह्या वेदना.?
किती हा नीचपाणा.?
आज तीनशे वर्ष होऊन गेली मात्र अजूनही वेदना देणं सुरूच आहे....
कधी थांबणार हे....?
कोण थांबवणार हे....?
की असच सहन करायचं माझ्या राज्यानं...?
18/01/2021
😂🤣 हे असले लोक झोपडी सुद्धा धड बनवू शकत नाही ते एवढया मोठ्या वास्तू बनवू शकतील ?
गांजा छाप वितिहासकर
16/01/2021
ही सरस्वती देवी आहे वॉशिंग्टन मध्ये. अमेरिकेत! तिच्या पायाशी बसून ३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सरस्वतीच्या पायाशी बसलेला एक मुलगा आहे - बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष, धर्माने ख्रिश्चन.
लहानपणी इंडोनेशिया मधील शाळेत शिकलेला हा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर, इंडोनेशियाने ही सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह!
'सुसंस्कृत' पणा म्हणतात तो हा. जे सुसंस्कृत असतात त्यांना विद्येचे, विद्येच्या देवतेचे महत्व. विद्येच्या देवतेची पूजा करायला - देव, धर्म, देश, वंश, पदवी, वर्ण ... काहीही आड येत नाहीत.