Indian National Congress - Mumbai

Indian National Congress - Mumbai

Share

Official page of Mumbai Regional Congress Committee

The Mumbai Regional Congress Committee (MRCC) is the unit of the Indian National Congress for the city of Mumbai. The current President of the Mumbai Congress is MLC Shri Bhai Jagtap and Working President is Former MLC Shri Charan Singh Sapra.

03/06/2026

देश का 12 अरब डॉलर का सोना मोदी सरकार ने बेच दिया !

पहले अंग्रेजों ने भारत को लूटा अब वाले हिंदुस्तान को कंगाल कर रहे हैं !

Photos from Indian National Congress - Mumbai's post 02/06/2026

पंतप्रधान कमकुवत असल्यानेच पेपरफुटी; Dharmendra Pradhan यांनी राजीनामा द्यावा : उदय भानु चिब .

आणि परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा

मुंबई, दि. २ जून २०२६

National Testing Agency आणि CBSE HQ परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आज दादर येथे भव्य “युवा आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा Zeenat Shabrin Inc यांनी आयोजित केलेल्या या मोर्चाचे नेतृत्व Indian Youth Congress चे राष्ट्रीय अध्यक्ष Uday Bhanu Chib यांनी केले.

चैत्यभूमी, दादर येथून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेला हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री Arif Naseem Khan , आ. Bhai Jagtap , अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव Sachin Sawant यांच्यासह शेकडो विद्यार्थी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. �यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आज धोक्यात आले असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांच्या अपेक्षा धुळीस मिळत आहेत. केंद्र सरकार या गंभीर प्रश्नावर अपयशी ठरले असून पंतप्रधान कमकुवत असल्यानेच देशभरात पेपरफुटीचे रॅकेट फोफावत आहेत. शिक्षण व्यवस्थेतील या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पेपरफुटीच्या घटना हा केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय नसून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. देशातील युवकांमध्ये प्रचंड असंतोष असून सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

आ. भाई जगताप सरकारवर टीका करताना म्हणाले की, एकीकडे सरकार युवकांना मोठमोठी स्वप्ने दाखवत आहे, तर दुसरीकडे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घोटाळ्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. पेपरफुटी करणाऱ्या टोळ्यांना राजकीय संरक्षण मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की देशातील परीक्षा व्यवस्था ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित असली पाहिजे. मात्र आज पैशांच्या आणि गैरव्यवहारांच्या जोरावर काही जण विद्यार्थ्यांचे भविष्य हिरावून घेत आहेत. सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल कोणतीही संवेदनशीलता राहिलेली नसून युवकांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.

या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पेपरफुटी बंद करा”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी करून मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

Photos from Indian National Congress - Mumbai's post 02/06/2026

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार Varsha Gaikwad यांच्या नेतृत्वाखाली आज उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आमदार Aslam Shaikh , जिल्हा अध्यक्ष Rajpati Yadav यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

Photos from Indian National Congress - Mumbai's post 02/06/2026

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार Varsha Gaikwad यांच्या नेतृत्वाखाली आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष Arshad Azmi II यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

02/06/2026

महागाईचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे!
आता CNG आणि PNG दरवाढीने सर्वसामान्यांच्या जगण्याचा खर्च आणखी वाढणार.
जनतेच्या खिशाला कात्री, आणि सरकार मात्र शांत!



02/06/2026

India deserves leadership that values education, critical thinking, and informed decision-making. In a rapidly changing world, progress depends on knowledge, vision, and the ability to understand the challenges of every citizen.

An educated Prime Minister is not just about degrees—it's about respecting facts, encouraging innovation, and building a stronger future for the nation.

India Needs an Educated Prime Minister.

02/06/2026

"Long queues, lost livelihoods, and years later counterfeit currency is still growing. The promise was one thing, the reality another."




02/06/2026

के कार्यालय में आग लगी या लगाई गई?

युवाओं के भविष्य को बर्बाद करने वाले काले चिट्ठे भाजपा फूंक रही है?



02/06/2026

न कोई चिंता - न कोई जिम्मेदार
यही है मोदी की 'वोट चोर' सरकार

Want your business to be the top-listed Government Service in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Mahapalika Marg
Mumbai
400001

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm