Virar shahar

Directions

Virar shahar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Virar shahar, Mumbai.

28/08/2026
21/07/2026

जंतर मंतर अभिजित दीपकेच्या झुरळ पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला काही प्रश्न..

१) सोनम वांगचुक ह्यांच्या उपोषणा दरम्यान NEET २०२६ फेर परीक्षा देऊन झालेल्या विद्यार्थ्यांना जंतरमंतरच्या मंचावर बोलावण्यात का आले नाही? त्रास फक्त आत्महत्या केलेल्या त्या १२ विद्यार्थ्यांनाच झाला होता का? इतरांनी झाला असेलच. अशा विद्यार्थ्यांना आवाहन करून मंचावर पाचारण का करण्यात नाही आले?

""आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होते ना?""

२) सोनम वांगचुक २० दिवस मंचावर उपोषणकर्ते सेलिब्रिटी म्हणून मिरवत असताना ज्या १२ विद्यार्थ्यांनी पेपरफुटीमुळे आत्महत्या केली त्यांच्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना, मित्र मैत्रिणींना मंचावर पाचारण का करण्यात नाही आले.? निदान रोज एक तरी?

""आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होते ना?""

३) पुढच्यावर्षी २०२७ ज्यांनी NEET परीक्षा देण्याचे ठरवले आहे त्या विद्यार्थ्यांना पालकांसह मंचावर पाचारण का करण्यात नाही आले? त्यांना एकूणच अशा प्रकारावर कशा सुधारणा झाल्या पाहिजेत? काय अपेक्षा आहेत? ह्यावर चर्चा करण्यासाठी का बोलावण्यात नाही आले?

""आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होते ना?""

४) ज्यांनी ज्यांनी NEET परीक्षा देऊन वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे, व्यावसायिक यश मिळवले आहे अशा MBBS, BDS, BAMS इत्यादी डॉक्टरांना पाचारण करून त्यांना त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन जसे की आव्हाने, त्रुटी आणि पर्यायी सुधारणा सांगण्यासाठी पाचारण का नाही केले गेले?

""आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होते ना?""

५) सर्व उपाय योजना करूनसुद्धा भविष्यात दुर्दैवाने अशा परीक्षांची पेपर फुटी झालीच तर विद्यार्थ्यांनी मानसिक अवस्था ढासळून न देता, गोंधळून न जाता फेर परीक्षेला कसे सामोरे जावे? काय काळजी घ्यावी? जेणेकरून आत्महत्ये सारखे प्रकार घडणार नाहीत. ह्यासाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी नामांकित मानसोपचार तज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र जंतरमंतरच्या झुरळांच्या मंचावरून का आयोजित केले गेले नाही?

""आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होते ना?""

मग झुरळांनी जंतरमंतरवर कोणाला बोलावले? किंवा कोणाला मंच उपलब्ध करून दिला?

हा मंच 'इस्लामो-लेफ्ट' इकोसिस्टमला देण्यात आला.

१) पहिल्याच दिवसापासून LGBTQ+ गँगचा समावेश कशासाठी? 'मेरा लिंग मेरी मर्जी' ह्या घोषणा विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनात कशासाठी?
२) अरुंधती रॉय - जिचे असे मानणे आहे की काश्मीर हा भारताचा भाग नाही. तिचा सहभाग आंदोलनात कशासाठी?
३) कॉलिन गोन्साल्विस - ज्याने २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब याच्यासाठी दया याचिका दाखल केली होती. ह्याला कोणत्या विषयावर बोलायला पाचारण केले होते?
४) प्रशांत भूषण - ज्यांने दहशतवादी याकुब मेमनची फाशी रोखण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ह्याचा विद्यार्थ्यांशी संबंधच काय?
५) नंदिता नारायण - जिने सीजेपीच्या मंचावरून पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची "बस नाम रहेगा अल्लाह का" ही कविता गायली. हिला ही कविता बोलायला पाचारण का केले? अल्लाह हाच सर्वशक्तिमान आहे विद्यार्थ्यांना हा संदेश देण्यासाठी?
६) कुणाल कामरा - जो नेहमीच हिंदूंच्या देवदेवतांवर टीका करतो. विडंबन करतो. झुरळाच्या मंचावरून त्याने "हे लोक सीता के पतीचे नाव घेऊन, नीता के पतीचे काम करत आहेत. ह्याचा आणि विद्यार्थांच्या भविष्याचा काय संबंध?
७) प्रकाश राज - ज्याने झुरळांच्या मंचावरून म्हटले - "ते 'जय श्री राम'चा नारा देतात, पण मी 'जय संविधान' म्हणेन. ह्याचाही NEET पेपरफुटीशी काय संबंध?
८) आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी - जेकेएनसी (JKNC) नेता आणि श्रीनगर, जम्मू-काश्मीरचा खासदार. 'नीट' (NEET) पेपर फुटीविरोधातील आंदोलनात त्याने आपल्या भाषणाची सुरुवात जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, या मागणीने केली. कलम ३७० चा NEET शी काय संबंध आहे?

हे कोणत्याही बाजूने 'NEET' पेपर फुटीविरुद्धचे आंदोलन वाटलेच नाही.

झुरळांचे आंदोलन NEET पेपर फुटीशिवाय इतर सर्व गोष्टींसाठीचे एक रंगमंच बनले होते. पेपर फुटीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ कधीच दिले गेले नाही. किंवा ज्या पालकांच्या मुलांनी या पेपर फुटीमुळे आपले प्राण गमावले त्यांनाही कधी व्यासपीठ दिले गेले नाही.

हे पूर्णतः स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोदी सरकार विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या नावाने चालवलेले पूर्णतः राजकीय हेतू प्रेरित आंदोलन होते. शाहिनबाग, किसान आंदोलन, भारत जोडो यात्रा नंतरची पुढची स्टेप.

आणि

ह्याला पूर्णतः जबाबदार झुरळ पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके हा आहे.

ह्याला लवकरात लवकर अटक व्हावी.

पेपरफुटीचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या खोट्या नावाखाली देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न हा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात यावा. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. त्याचे कॉल रेकॉर्डस तपासण्यात यावेत. त्याच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे तपासण्यात यावे. त्याचे बँक व्यवहार तपासण्यात यावेत.

तसेच

त्याच्या समर्थनात येणाऱ्या सेलिब्रिटीवर, नेत्यांवर, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

तसेही मोदीजी हुकुमशाह नाहीयेत तरीही त्यांना ही लोकं हुकमशाह म्हणत असतील तर मोदीजींनी अशा लोकांविरोधात हुकुमशाहीच राबवावी. ह्यांना इथेच चिरडणे ही फाळणीनंतर उरलेल्या भारताला अखंड ठेवण्यासाठीची नितांत गरज आहे.

आणि

हे सर्व सोनम वांगचुक निमूटपणे पाहत होता. त्याने एकदाही ह्यावर आक्षेप घेतला नाही. त्याने एकदाही ह्या पैकी एकाला थांबवले नाही. ह्याच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात यावी.

|| जय हिंदुराष्ट्र ||
🔱KJWrites

21/07/2026

झुरळांचे पोस्टमॉर्टम !!

चॅप्टर 1- झुरळ जनता पार्टीचा जन्म

12 मे 2026 रोजी होणारी NEET परीक्षा पेपर फुटीमुळे सरकारने ऐनवेळी रद्द केली आणि त्यामुळे देशभरातली लक्षावधी परिक्षार्थी नाराज झाले अनेक कमकुवत मनाच्या तरुण तरुणींनी यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केली आणि त्यामुळे देशभर यावर टीका झाली.

15 मे रोजी सुप्रीम कोर्टात वकिलांच्या एका खोट्या पदव्यांशी (Fake Degrees) संबंधित खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यावेळी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी हे वक्तव्य केले. "काही तरुणांची अवस्था झुरळांसारखी झाली आहे, ज्यांना ना रोजगार मिळतो, ना कोणत्याही व्यवसायात जागा मिळते. ते मग सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्त्यांचे रूप घेऊन व्यवस्थेवर हल्ले करू लागतात आणि ते समाजाला लागलेले परजीवी आहेत."

या वक्तव्यामुळे संतप्त होऊन अभिजीत दीपके यांनी cockroach जनता पार्टीची घोषणा केली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील दलित कुटुंबात जन्मलेले अभिजीत दीपके (वय ३०) यांनी पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली. ते डिजिटल मीडिया, नॅरेटिव्ह बिल्डिंग आणि सोशल मीडिया याद्वारे राजकीय मते बदलण्याच्या प्रक्रियेतील तज्ज्ञ (पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट) आहेत. त्यांनी २०२० च्या दिल्ली निवडणुकीत 'आप' (AAP) पक्षासाठी मीम्स आधारित डिजिटल प्रचाराचे काम केले होते. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले, जिथे त्यांनी नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमधून 'पब्लिक रिलेशन्स' (जनसंपर्क) विषयात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) पूर्ण केली. पदवी मिळवल्यानंतर ते तिथे नोकरीच्या शोधात होते आणि वर्कआउट व फिफा गेम खेळण्यात व्यस्त होते.

लोकपाल आंदोलन आणि आम आदमी पार्टी ही मुळातून RTI कार्यकर्ते आणि बेरोजगार स्वप्नाळू तरुणांनी लिप्त आहे. त्याचेच जुने कार्यकर्ते असणार्‍या अभिजीत दीपके यांना सरन्यायाधीशांची टिपण्णी व्यथित करून गेली आणि म्हणून उपरोधातून या पार्टीच्या नावाची घोषणा झाली. आरटीआय वाल्यांनीच एकत्र येऊन स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीने दिल्लीतील 10 वर्षाच्या राजवटीत आणि पंजाबातील 4 वर्षांच्या राजवटीत ना व्यवस्था बदल घडवला ना भ्रष्टाचाराचा शेवट केला. उलट या व्यवस्थेचा अधिकाधिक भोग घेण्यात ही मंडळी व्यस्त झाली. त्यामुळे अभिजीत दीपके पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते असूनही स्वतंत्र पक्षाची घोषणा करतात हा मुद्दा सरन्यायाधीशांचा टोमणा वर्मी लागला आणि तो सत्य होता हे सिद्धच करते.

सोशल साईटची हाताळणी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याची कला शिकलेला आणि आप मध्ये त्याचा वापर केलेला अभिजीत याचा प्रभावी वापर करून लवकरच आपल्या ऑनलाइन पक्षाला दोन कोटी सदस्य मिळवून देतो हा चमत्कार नसून अल्गोरीदम चा उत्तम अभ्यास दर्शवणारा होता. इथे त्याचा बोस्टन विद्यापीठातील अभ्यास कामाला आला आणि तो एक उत्तम विद्यार्थी असल्याचे सिद्ध झाले.

चॅप्टर 2 - NEET परीक्षा आणि कोचिंग क्लास माफिया

गेली काही दशके स्पर्धा परीक्षा आणि इंजिनियरिंग आणि मेडिकल च्या प्रवेश पूर्व परीक्षा यांच्या क्लासेसचा एक मोठा बाजार झाला आहे. या क्लासेस मध्ये अक्षरशः गळेकापू स्पर्धा असते. लक्षावधी रुपयांची फिज घेतली जाते आणि आपल्याकडेच ग्राहक / विद्यार्थी यावा म्हणून मग सर्व अनैतिक गोष्टी केल्या जातात. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे पेपर फोडून आपल्या क्लास च्या विद्यार्थ्यांना वाटणे. हे प्रकरण सुद्धा वर्षानुवर्षे सुखनैव सुरू होते यावर्षी बिंग उघडकीला आले आणि सरकारने संबंधितांना अटक करून परीक्षा ऐनवेळी रद्द केली. यापुढील टप्पा हे रॅकेट खणून काढणे आणि भविष्यात या परीक्षा पेपर फोडता येणार नाही अश्या बनवण्याची सरकारकडून तयारी सुरू झाली आणि ते आवश्यक होते.

आश्चर्यकारकरित्या यापैकी एकाही मुद्द्यावर भाष्य न करता cockroach जनता पार्टीने हा मुद्दा उचलला आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला.

थोडक्यात ज्याने चोरी होताना पकडली आणि आता तो गुन्हेगारांना शिक्षा देणार आहे त्यावरच तुम्ही राजीनामा द्या म्हणून दबाव आणता आहात. म्हणजे तुम्हाला परीक्षा प्रक्रिया निर्दोष व्हावी असे वाटत आहे का तुम्हाला या क्लासेस माफियांना वाचवायचे आहे ? परंतु हा मूलभूत प्रश्न कोणीही अभिजीत दीपके यांना किंवा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार्‍या एकालाही विचारला नाही. यातून आपल्या मीडियाची लायकी दिसून येते.

परीक्षा रद्द होऊन फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घोषित झाल्यावर देशभरातील 19-20 तरुण तरुणींनी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या केल्याची बातमी आली आणि कोक्क्रोच जनता पार्टी राजीनाम्यासाठी या मुद्द्यावर आक्रोश करत आहे. परंतु डॉक्टर होणार्‍या व्यक्तीचे मन इतके चंचल असेल. तो आयुष्यातील इतके छोटे आव्हान , इतके छोटे दडपण सहन करू शकत नसेल तर तो डॉक्टर होण्यास पात्र आहे का ? हा मूलभूत प्रश्न अजूनही कोणीच विचारला नाही. परदेशात प्रवेश पूर्व परीक्षेत मानसिक कणखरता सुद्धा तपासली जाते. या आत्महत्या प्रकरणांनी वास्तवात या मानसिक कणखरतेच्या परीक्षेची अनिवार्यता सिद्ध केली आहे.

थोडक्यात कोक्क्रोच जनता पार्टी आणि अन्य विरोधी पक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत हे विशुद्ध राजकारण आहे त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणे घेणे नाही. उलट ते कोचिंग क्लास माफीयांच्या हातचे बाहुले झाले आहेत का ? हा रास्त प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे.

चॅप्टर 3 – जंतर मंतर आंदोलन

अभिजीत दीपके यांच्या कोक्क्रोच जनता पार्टीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून भारतातील समस्त गर्भगळीत विरोधी पक्षांना प्रेषित भेटल्याचा आनंद झाला आणि सरन्यायाधीशांनी यांचा उल्लेख झुरळ असा केला होता ते समस्त आंदोलनजीवी एक आंदोलन पेटवण्याच्या तयारीला लागले. अभिजीत दीपके भारतात येऊन NEET प्रश्नावर आंदोलन करतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतीलच अशी घोषणा झाली आणि गाजावाजा करून त्यांच्या आगमनाची तयारी झाली.

रोज आंदोलन करणार्‍यांना सर्व कायदेशीर प्रक्रिया ज्ञात असतात तरीही जाणीवपूर्वक अराजक माजवण्याच्या हेतूने दिल्ली पोलिसांच्या कडे आंदोलन करण्याची अधिकृत परवानगी मागितलीच गेली नाही. परंतु अमित शहा तेल लावलेले पैलवान आहेत आणि त्यांनी अभिजीत दीपके यांना विमानतळावरच आंदोलनाची परवानगी देणारा कागद हातात ठेवला. आणि इथे अराजक माजवण्याचा पहिला प्रयास अपयशी झाला.

६ जून २०२६ रोजी अमेरिकेतून भारतात परतल्यापासून आजपर्यंत अभिजीत दीपके किंवा त्यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) केंद्र सरकारसोबत कोणताही औपचारिक, टेबल-टॉक किंवा अधिकृत स्तरावर थेट संवाद साधलेला नाही. त्यांनी थेट आंदोलन सुरू केले आहे. कॉलेज मध्ये कॅंटीन मध्ये चांगले अन्न मिळावे म्हणून सुद्धा जर विद्यार्थी आंदोलन करणार असतील तर त्यांना ही प्रक्रिया माहिती असते की आपण आधी संबंधित विभागाशी संपर्क साधून आपल्या मागण्या मांडणे. त्याला त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर आणि तरच आंदोलन सुरू केले जाते. परंतु झुरळ हे parasites असल्यामुळे त्यांना असे काही करणे मान्यच नाही ही गोष्टच त्यांचा लोकशाही , संविधान यांच्यावर किती गाढ विश्वास आहे हे सिद्ध करणारी आहे.

20 जूनला जंतर मंतर वर आंदोलन सुरू तर झाले पण प्रतिसाद नगण्य होता. आठवडाभरानंतर आंदोलनजीवी मंडळींनी सीनियर आंदोलक सोनम वांगचूक यांना मैदानात उतरवले आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. लडाख मधील आंदोलनात चुकीची भाषा वापरल्याने देशद्रोहाचा आरोप झालेल्या वांगचूक यांना सुद्धा आपली प्रतिमा सुधारण्याची यात संधी दिसली आणि ते मैदानात उतरले.

6 जून ते 20 जून आणि 20 जून ते 18 जुलै झुरळ जनता पार्टी , त्यांचा प्रेषित आणि सोनम वांगचूक हे कोचिंग क्लास माफिया बद्दल एक शब्द बोललेले नाहीत. NEET परीक्षा पद्धतीत सुधार करा, आमचे हे प्रस्ताव आहेत असे बोललेले नाहीत. त्यांचे एकच टुमणे आहे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.

जून अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरोगामी, कम्युनिस्ट आणि तुकडे तुकडे गॅंग चे सगळे नामचीन चेहरे येऊन आंदोलनाला समर्थन देऊन गेले परंतु मिडिया कव्हरेज मिळाले नाही. त्यामुळे अभिजीत दीपके यांना पहिला धक्का बसला. अभिजीत दीपके यांनी सुरूवातीला आंदोलन अराजकीय असेल एकाही राजकीय पक्षाला प्रवेश देणार नाही या राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या होत्या.. परंतु प्रतिसाद झोपल्यामुळे आणि मीडियाने सुद्धा अंग काढून घेतल्यावर राजकारणी मंडळींना शरण जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. जुलै च्या 10 तारखेपासून भाजपाकडून धोबी पछाड खाल्लेले सगळे समदुःखी चेहरे सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपके यांना समर्थन द्यायला जंतर मंतर वर येऊ लागले. मिडियाला गयावया करून आणले गेले. परंतु गर्दी होत होती ती लंगर खाण्यासाठीच खरोखरचे समर्थक दिसून येतच नव्हते.

सोनम वांगचूक यांची तब्येत खालावू लागली. सरकारशी संवाद न साधता आंदोलन सुरू केल्याने सरकारकडून कोणीच फिरकत नव्हते. वांगचूक यांच्याच समर्थकाने कोर्टात अर्ज दाखल केला आणि त्यांच्या तब्येतीची अवस्था पाहून सरकार ने योग्यवेळी त्यांची उचलबांगडी करून त्यांचा जीव वाचवला. रागाच्या भरात आमरण उपोषणाची घोषणा करणारे दीपके आणि चार पैसे खर्च करून आलेले आम आदमी पार्टी चे समर्थक आणि फुकट पुख्खा झोडणारी मंडळी वगळता आता तिथे कोणी नाही. आणलेली गर्दी ही पैसे खर्च करून आणली आहे. हीच गर्दी कदाचित 20 तारखेच्या मोर्च्याला सुद्धा आणता येईल. अशी गर्दी जमा करण्याची क्षमता आपण शाहीन बाग आंदोलन आणि कृषि आंदोलनात पण पाहिली आहे. पण ती क्रांति घडवणारी गर्दी नसते. हे अराजकतावादी असतात आणि हे अराजकच निर्माण करतात.

20 तारखेला काही साहसवाद केला तर हे आंदोलन आणि झुरळांची पार्टी तुरुंगात जाऊन संपेल. जर सहसवाड केला नाही तर हे हा महिना तग धरतील त्यापुढे या आंदोलनाला भविष्य नाही. मुळातून झुरळ जनता पार्टी हे नावच प्रतिक्रियेतून जन्माला आले होते. आणि त्या प्रतिक्रियेचा आघात संपला की झुरळांचा शेवट नक्की होणार आहे. अणुयुद्धातून सुद्धा झुरळ वाचते असे शास्त्रज्ञ म्हणतात. परंतु तेच झुरळ चपलेचा फटका मारून नष्ट करता येते हे व्यावहारिक सत्य ते सांगायला विसरतात.

फक्त एक हिंट देतो त्यातून विषय समजून घ्या. अभिजीत दीपके यांनी बोस्टनला जाऊन जे शिक्षण घेतले आहे त्यासाठी वार्षिक एक कोटी रुपये किमान खर्च येतो. यात फीस , रहाणे , खाणे सगळा खर्च समाविष्ट आहे. त्याचे पालक इतके श्रीमंत नक्कीच नाहीत. म्हणजे एकतर तो सरकारी मदतीवर गेला आहे किंवा त्याचा कोणी फायनान्सर आहे. सरकार या बाजूने तपास करू लागली तर सगळ्यांनाच पळता भुई थोडी होईल यात संशय नाही.

झुरळे उकिरडा हुंगतात आणि खाण्याच्या नादात कचरा अधिक पसरतात. यापेक्षा झुरळांचे जगाला काहीही योगदान नाही. कोक्क्रोच जनता पार्टी सुद्धा असाच कचरा पसरवून गायब होणार यात संशय नाही.

08/07/2026

399 Followers, 1,628 Following, 0 Posts

08/03/2026

🌸 *महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!* 🌸
💐👑🫅🌏🙏
*यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।*
*यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रियाः॥*

ज्या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होतो, तिथे देवताही आनंदाने वास करतात.
आणि जिथे त्यांचा सन्मान होत नाही, तिथे केलेली सर्व कामे निष्फळ ठरतात.

भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वीच स्त्रीच्या सन्मानाचे महत्व सांगितले आहे.
आजच्या आधुनिक जगातही हे तितकेच सत्य आहे.

स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून
ती आई, पत्नी, मुलगी, बहीण, मैत्रीण, मार्गदर्शक, नेता, वैज्ञानिक, उद्योजिका आणि समाजघटक म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे.

घर असो, समाज असो किंवा राष्ट्र —
महिलांचा सन्मान, सहभाग आणि समान संधी हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

या महिला दिनानिमित्त
आपल्या आयुष्यातील सर्व माता, भगिनी, पत्नी, सहकारी आणि कन्या यांना मनःपूर्वक सलाम!

त्यांच्या स्वप्नांना बळ देऊया, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करूया
आणि अधिक समतोल, संवेदनशील आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करूया.

🌷 *आपण सर्वांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!* 🌷

17/01/2026

🚩 राम कृष्ण हरी...

कथा मतदार राजाची

एके दिवशी स्टॅलिन एक कोंबडं घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत आला. कोंबड्याचं मुंडकं स्टॅलिनने आपल्या बगलेत दाबून धरले होते. आणि तो चालत चालत त्या कोंबड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता. तो स्टॅलिनच्या बगलेतून सुटका करू पाहत होता. पण स्टॅलिन त्याला न सोडता त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता पंख उपसत होता. मत्रीमंडळातील सदस्य स्टॅलिनला म्हणत होते, "त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका. सोडा त्याला." पण स्टॅलिन कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. आणि खिशातून काही दाणे काढून, तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा स्टॅलिनच्या हाताकडे बघू लागला.
स्टॅलिनदेखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला. आणि थोड्या वेळाने ते थोडे फार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा स्टॅलिनजवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा स्टॅलिनपासून सुटका करून घेत होता, तोच कोंबडा चार दाण्यासाठी स्टॅलिन च्या पुन्हा जवळ बसला. मंत्रीमंडळातील सर्व लोक त्याला म्हणाले की, "हा काय प्रकार आहे ?" त्यावर स्टॅलिन म्हणाला, "मतदार हे असेच असतात. साडेचार वर्ष आपण त्यांचे पंख उपसायचे असतात. आणि शेवटी सहा महिन्यांत त्यांना चार दाणे टाकायचे असतात. या चार दाण्याच्या नादात हे मतदार, साडेचार वर्षांत आपण केलेले सर्व अन्याय विसरून जातात. आणि आपल्यालाच मतदान करतात."

16/01/2026

श्री वाराही कवचम् 🌹

( वाराही कवच पठण केल्याने शत्रूंचा नाश होतो, धन-समृद्धी प्राप्त होते, भय आणि नकारात्मक शक्तींपासून रक्षण मिळते, मानसिक शांती व आत्मविश्वास वाढतो, तसेच शारीरिक व मानसिक रोग दूर होतात, ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि संरक्षण मिळते.)

---------------------------------------------------
संकलन :- अशोककाका कुलकर्णी
---------------------------------------------------

अस्य श्रीवाराहीकवचस्य त्रिलोचन ऋषीः । अनुष्टुप्छन्दः ।श्रीवाराही देवता । ॐ बीजं । ग्लौं शक्तिः । स्वाहेति कीलकं ।मम सर्वशत्रुनाशनार्थे जपे विनियोगः ॥

ध्यानम्

ध्यात्वेन्द्र नीलवर्णाभां चन्द्रसूर्याग्नि लोचनां ।विधिविष्णुहरेन्द्रादि मातृभैरवसेविताम् ॥ १॥
ज्वलन्मणिगणप्रोक्त मकुटामाविलम्बितां ।अस्त्रशस्त्राणि सर्वाणि तत्तत्कार्योचितानि च ॥ २॥
एतैस्समस्तैर्विविधं बिभ्रतीं मुसलं हलं ।पात्वा हिंस्रान् हि कवचं भुक्तिमुक्ति फलप्रदम् ॥ ३॥
पठेत्त्रिसन्ध्यं रक्षार्थं घोरशत्रुनिवृत्तिदं ।वार्ताली मे शिरः पातु घोराही फालमुत्तमम् ॥ ४॥
नेत्रे वराहवदना पातु कर्णौ तथाञ्जनी ।घ्राणं मे रुन्धिनी पातु मुखं मे पातु जन्धिन् ॥ ५॥
पातु मे मोहिनी जिह्वां स्तम्भिनी कन्थमादरात् ।स्कन्धौ मे पञ्चमी पातु भुजौ महिषवाहना ॥ ६॥
सिंहारूढा करौ पातु कुचौ कृष्णमृगाञ्चिता ।नाभिं च शङ्खिनी पातु पृष्ठदेशे तु चक्रिणि ॥ ७॥
खड्गं पातु च कट्यां मे मेढ्रं पातु च खेदिनी ।गुदं मे क्रोधिनी पातु जघनं स्तम्भिनी तथा ॥ ८॥
चण्डोच्चण्डश्चोरुयुगं जानुनी शत्रुमर्दिनी ।जङ्घाद्वयं भद्रकाली महाकाली च गुल्फयो ॥ ९॥
पादाद्यङ्गुलिपर्यन्तं पातु चोन्मत्तभैरवी ।सर्वाङ्गं मे सदा पातु कालसङ्कर्षणी तथा ॥ १०॥
युक्तायुक्ता स्थितं नित्यं सर्वपापात्प्रमुच्यते ।सर्वे समर्थ्य संयुक्तं भक्तरक्षणतत्परम् ॥ ११॥
समस्तदेवता सर्वं सव्यं विष्णोः पुरार्धने ।सर्वशत्रुविनाशाय शूलिना निर्मितं पुरा ॥ १२॥
सर्वभक्तजनाश्रित्य सर्वविद्वेष संहतिः ।वाराही कवचं नित्यं त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ॥ १३॥
तथाविधं भूतगणा न स्पृशन्ति कदाचन ।आपदश्शत्रुचोरादि ग्रहदोषाश्च सम्भवाः ॥ १४॥
मातापुत्रं यथा वत्सं धेनुः पक्ष्मेव लोचनं ।तथाङ्गमेव वाराही रक्षा रक्षाति सर्वदा ॥ १५॥
इति श्री वाराही कवचम् सम्पूर्णम् ।

Address

Mumbai
401303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Virar shahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share