02/06/2026
रस्ता रिकामा असला तरी आपण दोन्ही बाजू बघतोच ना? मग आरोग्याच्या बाबतीत बेसावध का राहायचं?
अनेकदा रस्ता रिकामा दिसला की आपण बेसावधपणे पुढे जातो. पण धोका कधीही आणि कुठूनही येऊ शकतो. सुरक्षेचा हाच नियम आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही लागू होतो.
शारीरिक संबंधांच्या वेळी प्रत्येक वेळी कंडोम वापरणं ही सुद्धा आरोग्याची एक आवश्यक सवय असायला हवी. एका क्षणाची बेसावधगिरी पूर्ण आयुष्यावर महागात पडू शकते.
स्मार्ट बना, सुरक्षित राहा!
#सुरक्षितसंबंध #कंडोमवापरा #एचआयव्हीप्रतिबंध #सुरक्षितराहा #एचआयव्हीजागरूकता #एसटीआयजागरूकता #स्मार्टनिर्णय #आरोग्यजागरूकता #जबाबदारनिर्णय #सुरक्षितनिवड #निरोगीजीवन #योग्यमाहिती
01/06/2026
A question. A concern. A doubt.
Sometimes, all it takes is the right information at the right time.
BreakFree helps you access trusted HIV information, locate nearby health centres & book confidential appointments for free HIV testing.
Thousands across India are already taking charge of their health through BreakFree.
Are you ready to take the first step?
Visit https://breakfreeindia.org/
31/05/2026
जो धोका डोळ्यांना दिसत नाही तो सर्वात जास्त घातक असतो!
अनेकदा आपण केवळ माणसाचा चेहरा किंवा त्याचं वरवरचं आरोग्य पाहून अंदाज लावतो. पण सत्य हेच आहे की, HIV चा संसर्ग शरीरात असूनही व्यक्ती बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसू शकते. संसर्ग डोळ्यांना दिसत नसल्यामुळे बेसावध राहू नका. स्वतःच्या आरोग्यासाठी प्रत्येक वेळी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.
नेहमी सावध राहा, कंडोमचा वापर करा आणि वेळोवेळी HIV टेस्ट करून घ्या.
#एचआयव्हीजागरूकता #एचआयव्हीप्रतिबंध #सुरक्षितसंबंध #कंडोमवापरा #एचआयव्हीचाचणी #आपलीस्थितीजाणूनघ्या #सुरक्षितराहा #आरोग्यजागरूकता #एसटीआयजागरूकता #जागरूकनागरिक #जबाबदारनिर्णय #आरोग्यपहिले #योग्यमाहिती #निरोगीजीवन #सुरक्षितनिवड
30/05/2026
How can science strengthen HIV response systems?
Exploring the role of novel sequencing techniques in strengthening HIV drug resistance surveillance and public health response systems.
28/05/2026
स्वावलंबन फक्त करिअरमध्येच नाही तर आरोग्याच्या सुरक्षेतही हवं! 👜
आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्र आणि खंबीर आहे. मग स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी दुसऱ्यावर का अवलंबून राहायचे? तुमच्या पर्समध्ये कंडोम असणे हा लाजण्याचा विषय नाही तर तुमच्या जागरूकतेचे आणि आत्मविश्वासाचे लक्षण आहे.
मात्र सावध राहा HIV आणि STIs पासून स्वतःचा बचाव करा
#महिलासशक्तीकरण #सुरक्षितनिवड #कंडोमवापरा #एचआयव्हीजागरूकता #एसटीआयजागरूकता #सुरक्षितराहा #स्वावलंबीमहिला #आरोग्यपहिले #स्वतःचीरक्षा #जागरूकराहा
27/05/2026
घराबाहेर पडताना सुरक्षेची पूर्ण तयारी हवी! 🏍️
जसं रस्त्यावरच्या अपघातापासून वाचण्यासाठी डोक्यावर 'हेल्मेट' महत्त्वाचं असतं. तसंच आयुष्यातील गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी शारीरिक संबंधांच्या वेळी 'कंडोम' आवश्यक असते. सुरक्षा कोणतीही असो ती आपल्याला संकटांपासून दूर ठेवते.
लक्षात ठेवा, बेजबाबदारपणा नको. प्रत्येक वळणावर सुरक्षिततेला प्राधान्य द्या
#हेल्मेटआणिसुरक्षा #कंडोमवापरा #सुरक्षितसंबंध #एचआयव्हीप्रतिबंध #सुरक्षितराहा #रस्तेसुरक्षा #आरोग्यजागरूकता #जबाबदारनिर्णय #सुरक्षितनिवड #निरोगीजीवन