28/03/2022
दिनांक २९ मार्च २०२२ या तारखेचे जलशक्ति अभियान अंतर्गत Catch The Rain where It Falls मोहिमेच्या आयोजनाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून जनजागृती निर्माण करणेसाठी घ्यावयाची जलशपथ.
The objectives of the Village Book project include:
Provide a platform for the Department to com
28/03/2022
दिनांक २९ मार्च २०२२ या तारखेचे जलशक्ति अभियान अंतर्गत Catch The Rain where It Falls मोहिमेच्या आयोजनाच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून जनजागृती निर्माण करणेसाठी घ्यावयाची जलशपथ.
25/03/2022
दिनांक २९ मार्च २०२२ या तारखेचे जलशक्ति अभियान अंतर्गत Catch The Rain where It Falls मोहिमेच्या आयोजनाच्या अनुषंगाने दिनांक १.४. २०२२ ते ७.४.२०२२ या दरम्यान विशेष ग्रामसभेचे आयोजन करून जनजागृती निर्माण करणे बाबत.
30/12/2021
सन २०२०-२१ या कालावधीतील राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे १००% ऑनलाइन ऑडिटचे उद्दीष्ट मार्च २०२२ अखेर साध्य करण्यासंदर्भात अपर मुख्य सचिव श्री.राजेश कुमार यांचे सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र.
29/11/2021
#मंत्रिमंडळनिर्णय
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्या व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १२ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने काढण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे सदस्यांची संख्या २००० वरुन २२४८ इतकी होईल. तसेच पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील ४००० वरुन ४४९६ इतकी होईल.
महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून वंचित रहावे लागू नये यासाठी प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
#कोविड19 च्या #ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळावी जेणेकरून त्यांच्यावर लक्ष ठेवून संसर्गाला वेळीच रोखता येईल, अशा सूचना मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी दिल्या.
23/11/2021
'महाआवास'च्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता #महाआवास अभियान टप्पा-२ मध्ये ५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून ते पूर्ण करण्याचा संकल्प करूया. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राला अधिक सक्षमपणे आणि गतिमानतेने पुढे नेऊ, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
22/11/2021
राज्य #निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने #महाव्होटर चॅटबॉटद्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर (http://bit.ly/mahavoter) उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्या हस्ते झाला.
20/11/2021
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१ च्या पुरस्कारप्राप्त सर्व नगरपालिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राची ही स्वच्छता चळवळीतील कामगिरी अभिमानास्पद आहे. यातून राज्याची मान देशातच नाही तर जगातही गौरवाने उंचावली आहे – मुख्यमंत्री
20/11/2021
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविण्याच्या अनुदानात राज्य सरकारकडून वाढ. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ८० टक्के व इतर शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री दादाजी भुसे
17/11/2021
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१०वी) परीक्षेची आवेदनपत्रे १८ नोव्हेंबरपासून स्वीकारली जातील.विद्यार्थ्यांनी http://mahahsscboard.in वर आवेदनपत्र भरण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.
17/11/2021
माझी कन्या भाग्यश्री योजनेकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी दिली. यासंबंधीचा #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
17/11/2021
कामगार हितासाठी शासन कटिबद्ध असून सिमेंट व सिमेंटवर आधारित उद्योगांतील कामगारांना #किमानवेतन असावे यासाठी समिती गठित करून यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. ठेका श्रमिकांच्या वेतनवाढीबाबत शासनाच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
16/11/2021
नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयासाठी औषधे, साहित्य, आणि साधनसामग्री खरेदी करण्यासह रुग्णालयांच्या इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरण, दुरुस्ती व देखभाल, विद्युत जोडणीचे लेखापरीक्षण, रुग्णवाहिकांची खरेदी करता येणे शक्य होणार आहे.
| Monday | 9:45am - 5:30pm |
| Tuesday | 9:45am - 5:30pm |
| Wednesday | 9:45am - 5:30pm |
| Thursday | 9:45am - 5:30pm |
| Friday | 9:45am - 5:30pm |