05/01/2026
उद्याची जनसंपर्क फेरी
दिनांक
०६/०१/२०२६
वार: मंगळवार
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी २ वाजेपर्यत
सुरवात : चिराग बिल्डींग - हुसैनी हाउस - आरीवाला बिल्डींग - जिंदाल मेंन्शन - छत्रीवाला कंपाउंड - २०१ ए बाटलीवाला बिल्डींग - ए, बी, सी रूकिया कॉटेज - नाईक - मातोश्री निवास - व्हीलेज व्हिला-म्हस्करंन्स रोड-२०१ बिल्डींग डॉ. म्हसकरन्स रोड व सभोवतालचा परीसर.
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Shivsena - शिवसेना Yashwant Jadhav - यशवंत जाधव सौ. यामिनी यशवंत जाधव
30/12/2025
शिवसेना,भारतीय जनता पार्टी, रिपाइंच्या सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांना कळविण्यात येते कि मंगळवार दिनांक ३०/१२/२०२५ रोजी शिवसेना -भा. ज. पा.- रिपाइं महायुतीचे महापालिका प्रभाग क्रमांक २०८ चे अधिकृत उमेदवार श्री. विजय (दाऊ) लिपारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक सकाळी १० : ३० वा. शिवसेना ताडवाडी शाखा येथून निघणार आहे. त्याचा मार्ग ताडवाडी शाखेतून नेसबीट मार्गाने सेंट मेरी पुलावरुन ( ऑल्वेट ब्रीज) इस्माईल पी. मर्चंट चौकावरून रिचर्डसन एन्ड कुड्रास कंपनी येथे निघणार आहे. तरी सर्व पदाधिका-यांनी वेळेवर उपस्थित राहावे हि नम्र विनंती.
आपले नम्र
शिवसेना शाखा क्रमांक २०८
Vijay Lipare Vijay Lipare
21/07/2025
"" यामिनिताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यसंवेदनशीलतेची जाणीव एक सुरक्षा कवच महिलांसाठी"
मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना अनेक आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. त्यातून निर्माण होणाऱ्या युटीआय (UTI) संसर्गाचे रूपांतर गंभीर स्थितीत पायलोनेफ्रायटिससारख्या किडनीच्या आजारात होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.
या समस्येच्या मुळाशी जाऊन उपाययोजना व्हाव्यात यासाठी सभागृहात आमदार असताना मा. यामिनी यशवंत जाधव यांनी ‘रेशनिंगवर सॅनिटरी पॅड मिळावेत’ अशी ठोस आणि धाडसी मागणी लावून धरली होती.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, या सामाजिक जाणिवेचा प्रभावी अन्वयार्थ करत,
शिवसेना उपनेते व विभागप्रमुख मा. यशवंत जाधव आणि
दक्षिण मुंबई युवासेना प्रमुख निखिल यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
महिला सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम शाखा क्रमांक २०९ च्या युवती शाखा संघटक कु. स्वरदा ओव्हाळ यांनी संयोजित केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना, तात्पुरत्या स्वरूपात का होईना,
किडनीसारख्या महाभयंकर आजारांपासून बचाव करण्यासाठी एक संरक्षणात्मक कवच मिळाले आहे.
यामिनीताईंच्या दूरदृष्टीला कृतीत उतरवणारा हा सामाजिक उपक्रम
महिला आरोग्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे आणि प्रेरणादायक पाऊल ठरतोय.
Shivsena - शिवसेना
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
Yamini Yashwant Jadhav
Vijay Lipare
Nikhil Yashwant Jadhav
09/06/2025
माझ्या प्रिय भायखळावासियांनो,
तुमच्या प्रत्येक प्रसंगात, सणवार, कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणारी तुमची हक्काची यामिनी हल्ली गेली कुठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, काही दिवसांपूर्वी माझा किरकोळ अपघात झाला ज्यात मी फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली, म्हणून घरी होते. अर्थात फोनवरून शक्य होईल तेवढी कामं करीत होतेच.
यामिनी मैदानात उतरणारी आहे. लोकांत मिसळणारी आहे. सक्तीच्या विश्रांतीमुळे माझीही घुसमट होत आहेच. तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी मीही आतुर आहे. लवकरच प्लास्टर काढणार आहे. त्यानंतर लगोलग तुमच्या सर्वांच्या सेवेत हजर होईन.
भेटूया... कामाला लागूया... आळस झटकून टाकूया... नव्या विकास पर्वासाठी सज्ज होऊया.
जय महाराष्ट्र!
.jadhav
21/05/2025
११वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
शिवसेना भायखळा विधानसभेतर्फे विद्यार्थ्यांना सूचना
सध्या महाराष्ट्र राज्यात ११वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यंदा संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया केवळ mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच होत आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, २८ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतात
आधार कार्ड
शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
१०वी च्या परीक्षेचा बैठक क्रमांक व गुणपत्रिका
जात प्रमाणपत्र (आरक्षणासाठी)
ईमेल आयडी
मोबाईल नंबर
“११वी प्रवेशासाठी वेळेत ऑनलाईन अर्ज करा, तुमचे भविष्य घडवा!”
शिवसेना भायखळा विधानसभा विद्यार्थ्यांच्या सोबत आहे.
अर्ज वेळेत भरा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!
Shivsena - शिवसेना
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Rrahul Narain Kanal
Yashwant Jadhav - यशवंत जाधव
Yamini Yashwant Jadhav
Nikhil Yashwant Jadhav
Vijay Lipare
19/09/2024
खेळ पैठणीचा, भायखळाच्या रणरागिणींचा!!!
कोण होणार भायखळ्याची होम मिनिस्टर???
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी आपल्या नजिकच्या शिवसेना शाखेत संपर्क करा.
Shivsena - शिवसेना Shivsena Byculla शिवसेना भायखळा YuvaSena Byculla युवासेना भायखळा Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Yashwant Jadhav - यशवंत जाधव Yamini Yashwant Jadhav Nikhil Yashwant Jadhav Vijay Lipare Ganesh Vitthal Kalambe
14/09/2024
परदेशात जाऊन रचता भारतातील आरक्षण हटवण्याचा डाव,
भारतात मतदानावेळी का आणता दलितांवर आव??
राहुल गांधी आणि कॉंग्रेस फक्त आणि फक्त राजकारण करण्यासाठी जाती धर्माचा वापर मागील अनेक वर्षांपासून करत आलीय. इटालियन राहुल बाबूला दलितांची बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे होणारी प्रगती पाहवत नसल्यामुळे महाविकास आघाडीतील परदेशी नेते राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतातील दलितांबरोबरच मुस्लमांनाचे देखील आरक्षण हटवण्याचे अन्यायकारक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले. समाजरक्षक, शिवसेना उपनेते, विभाग क्रमांक १३ चे विभागप्रमुख यशवंत जाधव साहेब यांच्या आदेशाने, भायखळा विधानसभेच्या आमदार सौ.यामिनीताई यशवंत जाधव व विभाग क्रमांक १३ च्या महिला विभागप्रमुख श्रध्दा हूले यांच्या उपस्थितीत दलितांसोबतच मुस्लिम समाजाचा देखील हक्क हिरावून घेऊ पाहणाऱ्या परदेशी राहुल गांधीची निषेध यात्रा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन ते जांबोरी मैदान काढून शेवटला जोडे हाणून भीमानदीचे पाणी पाजले..यात्रेदरम्यान हक्क हिरावून घेऊ पाहणार्या राहुल गांधीच्या फोटोचे पायदळी तुडवून समाजप्रती कळवळा दाखवल्याबद्दल काही पदाधिकाऱ्यांना पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले . सदर यात्रेत विभाग क्रमांक १३ मधील शिवडी, भायखळा आणि वरळी विधानसभेतील शिवसेना-युवासेनेचे, अंगीकृत संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.