19/03/2026
नूतनवर्षाभिनंदन
Maharashtra Aikyavardhak Mandal has been a people-focused platform dedicated to social, cultural, and educational development for over seven decades.
Our core values are unity in society, preservation of culture, and commitment to eco-friendly initiatives Our core values are unity in society, preservation of culture, and commitment to eco-friendly initiatives.
19/03/2026
नूतनवर्षाभिनंदन
08/03/2026
धैर्य, कर्तृत्व आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या प्रत्येक स्त्रीशक्तीस
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
❤️
07/03/2026
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ (रजि.) आयोजित 'जागतिक महिला दिन' निमित्त खास महिलांसाठी दोन दिवसीय महासोहळा! 🎊
🏃♀️ शनिवार, १४ मार्च २०२६: मैदानी खेळांची धम्माल (दुपारी ३ वाजल्यापासून)
💃 रविवार, १५ मार्च २०२६: सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांच्या आवडीचा 'पैठणी लकी ड्रॉ' (सायंकाळी ५ वाजल्यापासून)
📍 स्थळ: गणेश नाट्य मंदिर, इमारत क्रमांक ५४ जवळ, टिळक नगर, चेंबूर, मुंबई-८९
या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि सखींसोबत आनंदाचे क्षण अनुभवा!
03/03/2026
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ आयोजित 'पारंपरिक सामुदायिक होळी महोत्सव' मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. होलिका मातेची शास्त्रोक्त पूजा, मान्यवरांच्या हस्ते झालेलं होळी प्रज्वलन आणि 'सिद्धेश्वर बँजो पथका'ची ती खास साथ... यामुळे वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. आपल्या माणसांना एकत्र आणणारा आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा हा सोहळा कायम स्मरणात राहील. अशाच उत्साहात आणि ऐक्याच्या भावनेने आपण नेहमीच एकत्र येत राहूया!
03/02/2026
01/02/2026
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, टिळक नगर-चेंबूर आयोजित " आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२६ (वर्ष ८ वे)"
सहआयोजक: महाराष्ट्र चेस असोशिएशन
स्पर्ध्येतील विजेते
गट १ : इयत्ता पहिली ते चौथी
प्रथम - क्रिशांग गोळे
द्वितीय - राम शेडगे
तृतीय - अयांश जव्हेरी
बेस्ट गर्ल - गौरजा नागवडे
गट २ : इयत्ता पाचवी ते सातवी
प्रथम - अलंकृता बेलेकर
द्वितीय - कमल चौघुले
तृतीय - तेजस भोसले
बेस्ट गर्ल - येशा तयाल
गट ३ : इयत्ता आठवी ते दहावी
प्रथम - आयुष्यमान पाल
द्वितीय - शौनक हर्डीकर
तृतीय - सम्राट विश्वकर्मा
बेस्ट गर्ल - आराध्या माने
गट ४ : खुला गट
प्रथम - नितीन चंदन
द्वितीय - कबीर शेख
तृतीय - निधीश गोवेकर
बेस्ट गर्ल - श्रद्धा चव्हाण
30/01/2026
Remembering the Father of the Nation with pride and gratitude.
27/01/2026
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, टिळक नगर-चेंबूर आयोजित ५६ वी 'चेंबूर श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. यंदाच्या स्पर्धेने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडले असून, २०० हून अधिक पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी स्पर्ध्येत आपला दमखम दाखवला.
यंदाचे मानकरी:
🥇 चेंबूर श्री २०२६: निलेश दगडे (परब फिटनेस)
🥇 ज्युनिअर चेंबूर श्री २०२६: आयुष तांडेल (परब फिटनेस)
🥇 महिला शरीरसौष्ठव २०२६: लवीना नोऱ्होना (टी९ फिटनेस)
कठोर मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर या खेळाडूंनी मानाचे किताब पटकावून चेंबूर श्रीच्या क्रीडा परंपरेचा मान वाढवला. सहभागी सर्व खेळाडूंचे आणि विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
५६ वर्षांची ही अखंड परंपरा अशीच तेवत ठेवण्यासाठी सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते, परीक्षक, प्रेक्षक आणि फिटनेस प्रेमींचे आभार! ✨
26/01/2026
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ, टिळक नगर - चेंबूर आयोजित
"चेंबूर श्री २०२६ (वर्ष ५६ वे)"
"महिला शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ (वर्ष २ रे)"
"ज्युनिअर चेंबूर श्री २०२६ (वर्ष ७ वे)"
WATCH LIVE ON YOUTUBE
https://www.youtube.com/live/bD9PMMqjxms?si=31gAsZ27cu5VHxwY
महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ यांच्या विद्यमाने खुली जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा-२०२६ महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ यांच्या विद्यमाने खुली जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा-२०२६