काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो.
एवढ्यात अंगावर सामान्य कपडे घातलेला, दाढीचे खुंट वाढलेला एक खेडूत वृद्ध
औषधांची चिठ्ठी घेवून तेथे आला.
दुकानदाराने प्रिस्क्रिपशन पाहून एक औषधी पावडरचा मोठा डबा काऊंटरवर ठेवला.
"350 रू....." तो म्हणाला.
वृद्ध व्यक्तीने सद-याच्या खिशातुन पैसे काढले.
ते जेमतेम 310 भरले.
" एव्हढेच आहेत....
बाकीचे नंतर देतो....
आम्ही
दवाखान्यातच आहोत !"...तो म्हणाला.
दुकानदाराने त्याच्याकडे कुत्सित नजरेने पहात
दणक्यात डबा उचलून कपाटात ठेवला.
बाबा अस्वस्थ झाला.
.काय करावे त्याला
समजेनां...
त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
जवळच उभ्या असलेल्या एक सदगृस्थाने तात्काळ
सांगितले....
" उरलेले पैसे माझ्या बिलातून घ्या....द्या त्यांना तो डबा !"
दुकानदाराने डबा पुढ्यात ठेवला, पैसे घेतले.
" दादा, बाळाला कसं द्यायचं हे पावडर....
तो तर अजून दोन दिवसांचाच आहे ? वृद्धाने चौकशी केली.
" बाबा, हे बाळासाठी नाही.....त्याच्या आईसाठी
आहे."
" असं होय,
मग वाईच राहू द्या...
मी नंतर घेतो."
म्हणत म्हतार्याने डबा परत केला.
दुकानदार पुन्हा चिडला.
.पैसे परत करत त्याने रागाने
म्हातार्याकडे पाहिले व डबा परत ठेवला.
वृद्धाने जास्तीचे पैसे त्या गृहस्थाला परत केले व
चालू लागला.
मी त्यांच्यासोबत चालत त्यांना विचारलं....
" कां परत केला बाबा डबा...?"
चेहर्यावरचा घाम पुसत ते म्हणाले...
"अहो, मले वाटलं तो लेकरासाठी आहे.....
म्हणून घेत होतो...
त्याच्या आईला काय ?....
ती आता बरी आहे...
उद्या बाळाला काही औषध लागलं म्हणजे कुणाकडे हात पसरायचे ?"
मी आवाक झालो......
माझ्या मनात प्रश्न फेरधरुन
नाचू लागले.
परीस्थीने माणूस किती हिशोबी होतो ?
त्याचे प्राधान्यक्रम कसे बदलतात ?
प्रेमाचा प्रवाह कसा झटक्यात दिशा बदलतो ?
लेकीवरचं
त्याचं प्रेम कमी होतं कां ?
गरीबीपुढे माया, ममता
कशी आगतीक होते ?
......या व अश्या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या.
हजारो, लाखोंची
उलाढाल करणार्यांसमोर सामान्य माणसांच्या गरजा
किती माफक असतात.
त्या बाबांची अडचण किती
गंभीर होती व नड किती शुल्लक होती.
त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला.
परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही,
व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही.
आहे ती परीस्थिती
स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते.
माय महत्वाचीच,
पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती.
तो डबा लेकरासाठी असता तर
कदाचित त्यांनी तो घेतलाही असता.
प्रसंगी दुसर्याकडून मदत मागितली असती.
याचनाही केली असती.
मात्र, आईला तूर्त गरज नाही हे त्यांनी
काढलेलं निदान.
कदाचित ते आगतिकतेतून आले
असेल.
माय, ममता आणि आगतिकता यांचा विचार करतच
मी एका वेगळ्याच तंद्रीत चालत होतो.
" ओ साब, रास्ता छोडो.....बीच रास्तेमे क्यो चल
रहे हो ?"
रिक्क्षावाल्याच्या उद्दाम सूचनेने मी भानावर आलो.
रस्त्याच्या डाव्या बाजूला होत माझी नजर त्या
म्हातार्या बाबांचा शोध घेवू लागली.
ते मात्र, हाॅस्पिटलच्या गर्दीत सहज मिसळून गेले.
काहीच घडलं नाही या अविर्भावात
मी स्वतःशीच म्हणालो....
"ह्याला जीवन ऐसे नाव !
.......अननोन पर्सन .....
टू हेल्प पुअर इज
टू सर्व्ह गॉड .......!.....
मित्रांनो प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळं इतरांना मदत करत चला ....
देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही.
#प्रकाशबोटे-पाटील
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवाज्ञा प्रतिष्ठान,महाराष्ट्र
शिवमावळा प्रतिष्ठान, महाराष्ट्र....
प्रतिक्षानगर/शास्त्रीनगरमध्ये शिवचरित्र वाचन शनिवार दिनांक: १२/१२/२०१५ रोजी पासून (प्रत्येक शनिवारी)
सायं ठीक: ७:०० वाजता सिद्धिविनायक मंदिरामध्ये (शास्त्रीनगर सी विभाग)आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व शिव भक्तांनी यांची नोंद घ्यावी...
हि नम्र विनंती
प्रकाश बोटे-पाटील : ९०२२२५४१५२
शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले .... लढाई सुरू झाली... एक छोटीशी घडी... मावळे लढतायेत...पण गढी काही मिळेना... एक दिवस गेला ...आठ दिवस गेले ... पंधरा दिवस....तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला... आणि जिंकली.... कोण होते त्या गढीत... कोण लढल एवढे चिवटपणे..... ती होती साविञी देसाई ....
ही लढवत होती ती गढी....
गढी ताब्यात आली... सावित्री कैद झाली .... राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले... आणि सावित्रीला समोर आणले गेले ... ती घाबरलेली.. गांगरलेली...आता माझ कस होणार .... तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली ...
महाराज मला मारा ...
ठार मारा... पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला... तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली ... बाळ आणले ... राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका........
आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई.............
ताई ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार ... या बाळाला मारणार ... मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...
ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..
ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.
हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे...
किती महान माझा शिवाजी राजा होता हो..
शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही .
एकवेळ स्ञीया मुलाच ऐकत नाहीत ...
नवर्याच ऐकत नाहीत ....
पण भावाच मात्र ऐकतात...
खरच काय नात आहे भावा बहिणीच..
भाऊ ऊनाडक्या करत. खोड्या करत फिरणार. आणि घरी तक्रार आली की बहिण भावाच्या बाजूने उभी राहणार..
दादा जेवल्याशिवाय नाही जेवनार...
भावाचा गृहपाठ ही पुर्ण करणार ..
दादा दादा म्हणून मागेपुढे फिरणार..
दादाची थट्टा करणार ....
पण दुसरे कोणी दादाला बोलल की माञ हिला सहन नाही होणार ...
रोज धिंगाणा घालणार ..
काही अडचण आली की दादा मागे दडणार..
लहानपणी भांडण झाले की दादाला बुक्या मारणार .....
आणि बहिणीचा कोमल हात लागत नाही म्हणून दादाही आनंदाने मार खाणार...
बहिणीच्या लग्नासाठी धावपळ करणार ...
कर्ज काढणार..
दुप्पट काम करणार ..
माझी ताई सुखात तर मी सुखात या भावनेने जगणार..
आणि ज्या दिवशी हि लाडकी सासरला निघणार तेव्हा माञ याच्या अश्रूचा बांध फुटणार...
दगडाच्या काळजाचा भाऊ लहान मुलासारखा रडणार..
लग्नानंतरही तीच्या ख्याली खुशालीसाठी फोन करणार
काय नात आहे हे भाऊ बहिणीचे...
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .
किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर...
वादाच्या पलिकडले शिवाजी ...
बहिणीचा भाऊ शिवाजी ...
माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर ...
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .
मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#प्रकाशबोटे
नमस्कार मित्रांनो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज्यांचा इतिहास आपल्याला व भावी पिढीला समजण्यासाठी आपण काही दिवसातच "शिवचरित्र वाचन" चालू करणार आहोत....तरी याची सर्वानी नोंद घ्यावी....
#प्रकाशबोटे
07/07/2015
#प्रकाशबोटे
26/06/2015
#प्रकाशबोटे
जय शिवराय
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🌱🐅🐅🌱🐅🐅🌱
नक्की वाचा
🌱🐅🐅🌱🐅🐅🌱
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघाले.
पालखीत बसले.
मागं-पुढं सैन्यं आहे.
अचानक...⚡⛳
महाराजांची पालखी थांबली.
महाराजांना काही कळेना,
पालखीचा पडदा सरकला.
बाहेरं बघितलं.
⛳
रखरखतं, रणरणतं वाळवंट.
म्हणजे,
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.
मग पालखी का थांबावी?
महाराजांनी शिलेदाराला विचारलं,
'पालखी थांबवायचं प्रयोजन'.
⛳
तसा शिलेदार धावत आला.
'महाराज, गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत.'
महाराजांना आश्चर्य वाटलं.
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.
मग, बादशहा इथं !⚡
महाराज पालखीतनं खाली उतरले.
समोर पाहिलं.
गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा.
महाराज नजदीक गेले.
गळाभेट घेतली.
महाराजांनी विचारलं, 'बादशहाजी, आपणं इथं?'
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,
👉'महाराज, महाराष्ट्राचा 'जाणता राजा' आमच्या मातीत येतोय.
त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पाऊलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपावेतो आलो महाराज.'
⛳
अरे, कोण गौरव माझ्या राजाचा.
एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजतगाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.
आगत-स्वागत, सत्कार-सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य, संपत्ती दाखवत निघाला.
'महाराज, हा आमचा खजाना.
हिरे, मोती, माणकं, सोनं, नाणं.
राशी राशी नुसत्या'.
बघत राहिले महाराज.
♨
अरे, कोण ऐश्वर्य!!! कोण संपत्ती!!!
⛳'महाराज, हि आमची अस्त्रंशाळा.
इथं नानाविध अस्त्रं तयार केली जातात.'
महाराज चकित झाले.
⛳'महाराज, हि आमची शस्त्रंशाळा.
इथं वेगवेगळी शस्त्रं बनवली जातात.'
महाराज बघत राहिले.
⛳'महाराज, हि आमची अश्वंशाळा.
इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते.'
महाराज पहातच राहिले.
आणि
⛳'महाराज, हि आमची हत्तीशाळा.'
हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरतं नव्हते.
अरे, कोण सामर्थ्य!!!
कोण सामर्थ्य!!!
महाराज भारावले.
पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर बघून
गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,
🚩'महाराज, आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे
हत्ती असतीलंच कि?'
महाराजांना काय सांगावं काही कळेना.
आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही.
सबब आमच्याकडं हत्ती नाहीयेत.
पण सांगावं कसं ?
तसे महाराज म्हणाले, 'बादशाहजी, आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्रं हत्तीसारखी 💪 'माणसं' जरूर आहेत.
मात्र गोवळकोंड्याचा बादशहा त्याच्याही पुढचा.
तो म्हणाला, 'महाराज, आपल्याकडं आमच्यासारखे हत्ती नाहीत,
मात्रं हत्तीसारखी माणसं आहेत.
मग !
'महाराज, त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा 💪माणूस येताना सोबत आणलायं का?'
महाराजांच्या शेजारी
⛳👊'येसाजी कंक👊⛳
उभा होता.
महाराजांनी येसाजीच्या पाठिवर थाप
टाकली आणि महाराज म्हटले, 'हा त्यातलाच आहे.'
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, हा येसाजी हत्तीसारखा-हत्तीच्या ताकदीचा.'
मग!
'महाराज, तुमचा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का?'
⛳
तसा येसाजी सर्रदिशी पुढं झाला.
'आज्ञा द्यावी महाराज.'
महाराजांची इशारत झाली.
येसाजी रणं मैदानात उतरला.
एक मात्र अत्याधुंद, बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला.
नजरं विकरं नेत्रं झाली.
⛳
त्याचा कर्णकर्कश्य चित्कार घुमला आणि माणसांच्या कानठळ्या बसल्या.
"अरे, एsss...एsss...ए..ए वेड्या,
येसाजी, नको करू
धाडस.
येsss येsss ये फिर माघारी. मरशील फुका.'
पण येसाजी पुढं झाला होता.
हत्तीच्या सामने खडा ठाकला होता.
⛳
हत्तीच्या शिखरापुढे तो घुमला.
सोंड फिरली. सोंडेत येसाजी अडकला.
गर्र..sss...गर्र...sss...
गर्र...sss...गर्र...sss...गर्र.
माणसांनी मिटले डोळे.
'संपला येसाजी.'
पण,
⛳
त्याचवेळी विद्युलता चमकावी तसा येसाजी फिरला होता.
आकाशातून उडाला होता.
समशेर तळपली होती.
चालली होती सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.
एक भयानक चित्कार घुमला होता आणि सोंड छाटला हत्ती ढासळला होता.
⛳
येसाजीच्या समशेरीतून रक्तं नितळत होतं.
महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता.
येसाजी जिंकला होता.
त्याचं ते आरस्पानी शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशहा भारावला.
अरे, कोण शौर्य! कोण बहादुरी!
त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला.
येसाजीच्या समोर धरला.
'हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस.'
तसा येसाजी सर्रदिशी मागं सरला आणि बादशहाला म्हणाला,
'आमचं कौतुक करायला आमचे 'महाराज'
समर्थ आहेत.'
दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली.
'निष्ठा' नाव याचं.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'अस्मिता' जिवंत असते.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'स्वाभिमान' जिवंत असतो.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'राष्ट्रं' जिवंत असतं.
गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा, तरच शेयर करा.
नाहीतर बसा हिरो-हिरोईनचे फोटो शेयर करत.
🚩🚩॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥🚩🚩
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
13/03/2015
"राजमुद्रा"
10/03/2015
नेत्र फुटले, पडले शिर, तड़फडली जबान, झुकला ना वाकला स्वधर्म स्वाभिमान
बलिदानी रक्ताने इतिहास पान माखले, अलौकिक पराक्रमानी शिवस्वराज राखले.....
शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आपले वर्तन
असे शुध्द ठेवा की भारता बाहेरील लोक
म्हणाले पाहिजेत की "कसा असेल तो महान
राजा की ज्याच्या मृत्यूच्या ४०० वर्षानंतर
जन्माला येणारे त्याचे इतके कट्टर भक्त होतात."
जय शिवराय...
05/03/2015
होळी च्या मनःपूर्वक शुभेच्या....
शिवमावळा प्रतिष्ठान,महाराष्ट्र
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Sion
Mumbai
400022
