05/01/2026
🚩 नूतन नियुक्ती घोषणा! 🚩
अतिशय आनंदाची बातमी! सामाजिक कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या 'आपली आई फाउंडेशन' संस्थेच्या विस्तार आणि बळकटीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सिद्धार्थ मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली, असमा शेख यांची 'महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली आहे! 💐
४ जानेवारी रोजी सन्माननीय सिद्धार्थ मोकळ सर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली. असमा शेख यांचा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची तळमळ पाहता, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात फाउंडेशनचे कार्य घराघरांत पोहोचेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष असमा शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🚩✨
05/01/2026
आपली आई फॉउंडेशन संस्थेच्या नवनिर्वाचित महाराष्ट्र कार्यअध्यक्षा असमा शेख यांना हार्दिक शुभेच्छा आपली आई Aapli Aai Siddharth Mokal: Voice of the Youth सिद्धार्थ मोकळ Asma Shaikh Mustak Shaikh
12/10/2025
आपली आई संस्था चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आसमा शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Asma Shaikh
16/09/2025
🙏सर्व उपस्थित मान्यवरांचे अनपूर्वक आभार🙏
आजचा दिवस आई फाउंडेशनसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक ठरला. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते झालेल्या या अनावरण सोहळ्यात आपल्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक मंगलमय केला.मनःपूर्वक आभार त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे ज्यांनी वेळ काढून या सोहळ्यात सहभागी होऊन आमच्या कार्याला प्रोत्साहन दिले. आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादांमुळे आई फाउंडेशनचा प्रवास अधिक दृढ आणि समर्पित पद्धतीने पुढे जाईल.आपल्या प्रेम, सहकार्य आणि आशीर्वादामुळेच हा उपक्रम समाजासाठी प्रकाशकिरण ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.
आपली आई Aapli Aai #आपलेआई #आपलीआई
सिद्धार्थ मोकळ Siddharth Mokal: Voice of the Youth
16/09/2025
आई फाउंडेशनच्या अनावरणाचा सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर ती मातृत्वाच्या ममतेचा, आशेचा आणि सेवाभावाचा प्रसंग होता. प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण संपन्न झाल्याने संस्थेच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली आहे.आई म्हणजे माया, प्रेम आणि त्यागाचं प्रतीक. या फाउंडेशनच्या माध्यमातून अशा अनेक हातांना आधार मिळणार आहे ज्यांना आधाराची सर्वात जास्त गरज आहे. मान्यवरांच्या उपस्थितीने हा क्षण अधिक मंगल व संस्मरणीय झाला.आई फाउंडेशनचा हा प्रवास निश्चितच समाजातील वंचितांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे.
आपली आई Aapli Aai सिद्धार्थ मोकळ Siddharth Mokal: Voice of the Youth
15/09/2025
🙏✨ *आपली आई फौंडेशन तर्फे अन्नदान* ✨🙏
उपाशीपोटी राहणाऱ्यांसाठी एक छोटीशी मदत म्हणजेच मोठं समाधान. 🍲💝
आपली आई फौंडेशनतर्फे विशेष *अन्नदान कार्यक्रम* आयोजित करण्यात आला आहे.
➡️ समाजातील गरजूंपर्यंत प्रेमाने अन्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.
आपले सहकार्य आणि सहभाग हाच आमच्यासाठी मोठा आशीर्वाद असेल. 🌸🙏
*आईची माया देणारी आपली आई सामाजिक संस्था*
#अन्नदान #आपलीआईफौंडेशन #सेवाभाव #मानवतेचीसेवा