याला म्हणतात चुकून चाटणे...
Voice of Raj Thackeray
"राजसाहेबांच्या विचारांचा बुलंद आवाज! 🚩
आज आहे मोदींचा विकास, मोदी है तो मुमकिन है...
#विकास
एक आठवण.
अजित दादा पवार, राज साहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे.
राज ठाकरे यांच्याकडे असं काय आहे...?
#मराठी
इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला...
#मराठी
राज साहेब ठाकरे...
#मनसे #मराठी
सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 🇮🇳
#प्रजासत्ताकदिन
सत्ता असली काय आणि नसली काय मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा श्री.राज साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील.
#राजठाकरे #मनसे #मराठी
14/10/2024
धन्यवाद राज साहेब .....
10/10/2024
प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,
सस्नेह जय महाराष्ट्र,
ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच 'भारतरत्न'सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !
काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली , मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या 'भारतरत्न'च नाहीत तर काय मग अजून ?
त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे.
तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला.
आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे.
राज ठाकरे ।
To -
The Honourable Prime Minister, Shri. Narendra Modiji,
Jai Maharashtra,
Veteran industrialist Ratan Tata, who shaped the Indian industry for the last three decades, passed away. You knew Shri Ratan Tata closely and would have gathered that he was a person least interested in honours and accolades. But his contributions to the Indian industry and our economy was immense. More importantly, his humanity was his true greatness. Such a person should have received ‘Bharat Ratna’, our highest civilian honour, during his lifetime. But now me and my party request and hope that he be declared ‘Bharat Ratna’ posthumously. I am sure all Indians have the same expectation.
When the news of Ratan Tata's death came out yesterday, people voluntarily paused their programs and paid their tribute. At some venues in Mumbai even Dandiya was stopped midway, and a two minute’s silence was observed. Since this morning, everyone in India have been pouring out their tributes on social media. As if someone from their own home has departed. If such personalities aren’t 'Bharat Ratna' then who is?
Therefore, I am sure that you will take some decision in this regard and instruct those concerned.
India is a veritable mine of such gems. But bestowing them with any civil honour should take place at an appropriate stage of their lives. Never again should anyone request a posthumous honour for anyone. Honouring someone during their life, and when they are hale and hearty, is better. We often see such eminent people receiving their honour in a state of physical disrepair, and that’s not right.
I am sure you will institute a definite policy in this regard.
Raj Thackeray.
Narendra Modi Amit Shah
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
400014
