Nagpur Municipal Corporation

Directions Website Contact the organization

Nagpur Municipal Corporation नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे!

स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर साकारण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुविधेसाठी महानगरपालिका नागपूरतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच शेकडो लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. याची माहिती नागरिकांना मिळावी तसेच मनपा आणि नागरिकांमधील संवाद वाढावा या उद्देशाने या अधिकृत फेसबुक पेजची निर्मिती कऱण्यात आली आहे.

नवीन ‘श्रीमंत रघुजीराजे भोसले नगर भवन’ (टाऊन हॉल) इमारतीच्या बांधकामाची मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पाहणी केली.य...
05/11/2026

नवीन ‘श्रीमंत रघुजीराजे भोसले नगर भवन’ (टाऊन हॉल) इमारतीच्या बांधकामाची मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी पाहणी केली.
याविषयी विविध वृत्तपत्रांनी घेतलेली दखल..


नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत परिसरात स्वच्छता कारवाई करण्यात आली. या संदर्भात नागपूर श...
05/11/2026

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत परिसरात स्वच्छता कारवाई करण्यात आली. या संदर्भात नागपूर शहरातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध बातम्यांची दखल घेत कारवाई करण्यात आली.

उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. अंबाझरी तलाव घाटावर मोठ्या संख...
05/11/2026

उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. अंबाझरी तलाव घाटावर मोठ्या संख्येत भाविक सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात. या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्याचे भूमिपूजन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता.०५) करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, माजी महापौर श्री दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, नगरसेवक श्री अभिजीत झा, उपायुक्त श्री राजेश भगत, सहायक आयुक्त श्री राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ गजेंद्र महल्ले यांच्यासह प्रसंगी सर्वश्री आशिष पांडे, सत्येंद्र प्रसाद सिंह, प्रा. बच्चू पांडे, राजेंद्र कुमार पांडेय, संत लाला यादव, नितीश सिंह, केशव निखार , सौरभ झा आणि इतर उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत परिसरात स्वच्छता कारवाई करण्यात आली.
05/11/2026

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत परिसरात स्वच्छता कारवाई करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या ऐतिहासिक महाल परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन ‘श्रीमंत रघुजीराजे भोसले नगर भवन’ (ट...
04/11/2026

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहराच्या ऐतिहासिक महाल परिसरात उभारण्यात येत असलेल्या नवीन ‘श्रीमंत रघुजीराजे भोसले नगर भवन’ (टाऊन हॉल) इमारतीच्या बांधकामाची मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी बुधवार (दि. ४ ) रोजी पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा तसेच प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला.

यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, नगरसेवक श्री. सचिन नाईक, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, मनपाचे कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राठोड, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार, उपअभियंता राजीव गौतम, श्री दिलीप वंजारी, क्रीडा अधिकारी डॉ.पियुष आंबुलकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेचे सभासद तसेच अधिकारी यांच्या बैठकींसाठी करण्यात येणारी बैठक व्यवस्था, सभागृहातील आवश्यक सुविधा आणि उर्वरित कामांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. टाऊन हॉलच्या इमारतीचे उर्वरित बांधकाम व अनुषंगिक कामे आवश्यक दर्जा आणि गुणवत्तेचे निकष राखून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मनपाचा टाऊन हॉलसह शहरातील निर्माणाधीन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना...
04/11/2026

मनपाचा टाऊन हॉलसह शहरातील निर्माणाधीन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात मनपाच्या टाऊन हॉल सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच ज्या कामांना राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे. त्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

शहरातील विकास प्रकल्पांच्या स्थितीची माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून आज (ता. 4) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके, मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. नरेश बोरकर, श्री. विजय गुरुबक्षानी, उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी श्री. अमित भदाने, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मि...
04/11/2026

नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज शहरातील विविध दिवाळी वेस्ट डोनेशन सेंटर्सवर नागरिकांनी आपल्या घरातील जुन्या, निरुपयोगी व वापरात नसलेल्या वस्तू आणून जमा केल्या.

या उपक्रमातून वस्तूंचा पुनर्वापर व पुनर्चक्रणाला प्रोत्साहन मिळत असून, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला जात आहे.

#स्वच्छदिवाळीशुभदिवाळी

नागपूर महानगरपालिकातर्फे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात...
04/11/2026

नागपूर महानगरपालिकातर्फे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांच्या सह मनपाचे इतर उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

फटाक्यांची दुकाने लावतांना आवश्यक खबरदारी घ्या
04/11/2026

फटाक्यांची दुकाने लावतांना आवश्यक खबरदारी घ्या

Address

Mahanagar Palika Marg, Near Vidhan Bhavan, Civil Lines
Nagpur
440001

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nagpur Municipal Corporation:

Shortcuts

Share