Chaitanyabapu Deshmukh

Call Directions Contact the organization

Chaitanyabapu Deshmukh महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी

08/10/2026
महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज नवी दिल्ली ये...
07/10/2026

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थिती व संकल्पित उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी मा. देवेंद्रजींनी NDRF अंतर्गत महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी केली.

केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास मा. केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

Amit Shah Devendra Fadnavis Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra

#दुष्काळ_परिस्थिती #महाराष्ट्र

🇮🇳 सेवा ज्योत यात्रा… विकसित भारताचा संकल्प! 🇮🇳भारतीय जनता युवा मोर्चा, नांदेड शहराच्या वतीने आयोजित भव्य ‘सेवा ज्योत या...
07/10/2026

🇮🇳 सेवा ज्योत यात्रा… विकसित भारताचा संकल्प! 🇮🇳

भारतीय जनता युवा मोर्चा, नांदेड शहराच्या वतीने आयोजित भव्य ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅलीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात सहभागी होण्याचा अनुभव मिळाला.

पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देत सेवा, सुशासन आणि विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कार्यकर्त्यांचा जोश हे या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.

यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.चैतन्य बापू देशमुख, महानगराध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर सौ. कविता संतोष मूळे, भाजयुमो शहराध्यक्ष शशिकांत शिरसागर नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती नगरसेवक वीरेंद्रसिंह गाडीवाले, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. कल्याणकर ताई, सभागृह नेते ॲ.महेश कनकदंडे, आशुतोष राजूरकर, भाजयुमो शहर उपाध्यक्ष पार्थ देशमुख, तसेच भाजयुमो मराठवाडा प्रदेश युवती प्रमुख तथा नगरसेविका सौ. शांभवी अरुंधती प्रवीण साले यांच्यासह भाजयुमोचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

युवाशक्तीच्या सामर्थ्याने, सेवाभावाच्या ज्योतीने आणि विकासाच्या संकल्पाने नांदेडच्या वाटचालीला नवी ऊर्जा देऊया!

🚩 सेवा ज्योत… विकसित भारताची ज्योत!
🇮🇳 विकसित भारत २०४७ — आपला संकल्प, आपली जबाबदारी!

#सेवा_ज्योत_यात्रा #विकसितभारत२०४७ #भाजयुमो #नांदेड #युवाशक्ती #सेवा_संकल्प_अभियान

07/10/2026

नांदेड येथील श्री गोदा लक्ष्मी नृशिह मंदिरातील माहिती माझा पुतण्या चि पार्थ आनंदीदास देशमुख यांनी तयार केलेल्या ….

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका सौ. शैलजा किशोर स्वामी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभे...
06/10/2026

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका सौ. शैलजा किशोर स्वामी यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

सामाजिक व सार्वजनिक जीवनातील आपल्या कार्याला निरंतर यश लाभो, उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹

जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश युवती प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कु. शांभवी अरुंधती प्रवीण साले यांनी आज बाबा...
06/10/2026

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश युवती प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल कु. शांभवी अरुंधती प्रवीण साले यांनी आज बाबा पेट्रोल पंप येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी त्यांचे शाल व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट देऊन मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले.

त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या नेतृत्वातून युवा शक्तीला नवी दिशा मिळो आणि संघटनात्मक कार्य अधिक बळकट होवो, हीच सदिच्छा.

🚩 जय हिंद! जय महाराष्ट्र! 🚩

सरस्वती गणेश मंडळ, कुंभार टेकडी, होळी, नांदेड यांच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून गणेश विसर्जनानंतर भंडाऱ्याचे आयोजन केल...
05/10/2026

सरस्वती गणेश मंडळ, कुंभार टेकडी, होळी, नांदेड यांच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून गणेश विसर्जनानंतर भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.

विशेष म्हणजे, गेल्या तीन दशकांपासून एकच मेनू, केळीच्या पानावर आणि बैठ्या पद्धतीने भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्याची सुंदर परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे.

आज या भंडाऱ्यास भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, श्रद्धा, सेवा आणि परंपरा यांचा सुंदर संगम असलेली ही ३२ वर्षांची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे.

ही सेवा परंपरा अखंडपणे जपणाऱ्या मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सेवेकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

गणरायाची सेवा आणि भक्तांची सेवा हीच खरी समाजसेवा! 🙏🚩

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या युवती प्रमुखपदी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नगरसेविका कु. शाम्भवी अरु...
05/10/2026

भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या युवती प्रमुखपदी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नगरसेविका कु. शाम्भवी अरुंधती प्रवीण साले यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🚩

आपल्या नेतृत्वातून युवती संघटनेला नवी ऊर्जा व दिशा मिळो, हीच सदिच्छा!

खूप खूप शुभेच्छा! 💐

🇮🇳 ‘वंदे मातरम्’च्या स्वरांनी निनादले नांदेड! 🇮🇳भारत सरकारच्या मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि सप्तरंग सेवाभावी ...
04/10/2026

🇮🇳 ‘वंदे मातरम्’च्या स्वरांनी निनादले नांदेड! 🇮🇳

भारत सरकारच्या मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘१५० वंदे मातरम्’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

दिनांक ३ व ४ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या नृत्य, संगीत व विविध कलागुणांचा अप्रतिम आविष्कार सादर केला. देशभक्तीची भावना आणि भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

सांगता समारंभास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲडवोकेट चैतन्य बापू देशमुख, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या नृत्य संचांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. सान्वी जेटवानी यांनी केले.

मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून ‘वंदे मातरम्’चा राष्ट्रभाव अधिक बळकट केला, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या सर्व गुणी कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

वंदे मातरम्! 🇮🇳
भारत माता की जय! 🚩

#वंदेमातरम् #सांस्कृतिककार्यक्रम #नांदेड #सप्तरंगसेवाभावीसंस्था #भारतीयसंस्कृती #देशभक्ती #मराठवाडा


Address

Sarafa Holi
Nanded
431604

Telephone

+919011001013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitanyabapu Deshmukh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chaitanyabapu Deshmukh:

Shortcuts

Share