Zilla Parishad, Nanded

Directions

Zilla Parishad, Nanded Official Facebook Handle of Zilla Parishad Nanded, Maharashtra

03/09/2026
जागरूक मुलगी, सुरक्षित मुलगी! सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या वा...
27/08/2026

जागरूक मुलगी, सुरक्षित मुलगी!

सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीत प्रतिष्ठानच्या वतीने ‘जागरूक मुलगी, सुरक्षित मुलगी’ अभियानांतर्गत Good Touch–Bad Touch व बालसुरक्षा मार्गदर्शनासाठी दोन जनजागृती रथांचा शुभारंभ करण्यात आला.
कंधार व लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये फिरून मुलींमध्ये सुरक्षा व आत्मजागृती निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, महापौर कविता मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

#जागरूकमुलगीसुरक्षितमुलगी #बालसुरक्षा


#महिलासक्षमीकरण #मुलींचीसुरक्षा #जनजागृती #प्रणिताताईदेवरेचिखलीकर #शांतीतप्रतिष्ठान #कंधार #लोहा #नांदेड

27/08/2026
22/08/2026
जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आज नांदेड शहरात जलसंधारण दिनानिमित्त महा- वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी ...
21/08/2026

जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आज नांदेड शहरात जलसंधारण दिनानिमित्त महा- वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन, महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विभागप्रमुख, शालेय विद्यार्थी, युवक-युवती आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पाणी वाचवा, भविष्य वाचवा हा संदेश देत नांदेडकरांनी जलसंवर्धनाची सामूहिक बांधिलकी व्यक्त केली.

#जलसंधारणदिन२०२६ #महावॉकेथॉन #जलसंवर्धन #पाणीवाचवाभविष्यवाचवा #नांदेड

नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजार...
15/08/2026

नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. समारंभादरम्यान तंबाखूमुक्तीची शपथ, मृद व जलसंधारणाची शपथ तसेच पॉश कायद्याबाबतची शपथ घेण्यात आली.
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत उभारण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहायता गटांनी उभारलेल्या स्टॉलमधून स्थानिक उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध झाले.

#स्वातंत्र्यदिन #भारत #हरघरतिरंगा #उमेद

अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक...
13/08/2026

अर्धापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक व लोणी खुर्द येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील, भा.प्र.से. यांनी भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज करत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी नागेश भगवान बिर्‍हाडे यांनी पारंपरिक भाजलेल्या विट...
13/08/2026

अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी नागेश भगवान बिर्‍हाडे यांनी पारंपरिक भाजलेल्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वापर करून घरकुल उभारले. यामुळे वाळू, वाहतूक व एकूण बांधकाम खर्चात लक्षणीय बचत झाल्याची माहिती त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी संवादादरम्यान दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

Address

Railway Station Road, Zilla Parishad Nanded
Nanded
431601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad, Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share