Love Nashik - लव नाशिक

Love Nashik - लव नाशिक

Share

नाशिक च्या ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि पर्यटन स्थळ यांच्या अधिक माहिती साठी आपले हे पेज जरुर लाइक करा.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 05/08/2024

#दुतोंड्या_मारुती
नाशिकचा गंगेवरचा दुतोंड्या मारुती हे आमचे "यंदा गंगेला पूर किती आला..." हे सांगण्याचे परिमाण आहे.

26/09/2022

सप्तशृंगी देवी
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 01/03/2022

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात नाशिक मध्ये, जिथे महादेवासमोर नंदी नाही..!!

नाशिक : जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक शिवमंदिरात नंदी हा महादेवांच्या समोर असतोच. नंदी हा जरी महादेवांचे वाहन समजला जात असला, तरी नाशिकच्या एका मंदिरात मात्र महादेवांच्या पिंडीसमोर नंदीच नाही असं काय झालं की, महादेवांनी याठिकाणी नंदीला आपला गुरु मानलं…चला तर, जाणून घेऊया नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिराची महती…

• अशी आहे या मागची आख्यायिका…
जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील महादेव मंदिरात गेलात, तर शंकराच्या पिंडीजवळ तुम्हाला नंदी विराजमान दिसेलच. नंदी हा महादेवांच वाहन असल्याने महादेवांच्या प्रत्येक मंदिरात नंदीला महादेवांच्या पिंडीसमोरचं स्थान असतं. मात्र, नाशिकच्या ऐतिहासिक कपालेश्वर महादेव मंदिर याला अपवाद आहे. महादेवांचं हे एकमेव मंदिर आहे, ज्याठिकाणी नंदीच नाही. महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं, त्यावेळी महादेवांनी या पातकापासुन स्वताची मुक्ती करुन घेण्यासाठी त्रिभुवन पालथं घातलं. मात्र, त्यांचं पातक काही दूर होईना… आपण या पातकापासून कसं सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच, नंदीनं त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं. याठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणा संगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रम्हहत्येच्या दोषातुन मुक्त झाले. आपल्याला या पातकापासून नंदीनं मुक्ती दिली, यामुळेच या ठिकाणी महादेवांनी नंदीला आपला गुरु मानलंय.

• बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य..
एका कपालेश्वर महादेवाच्या दर्शनात बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ सापडतो. नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच, शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवांची पालखी काढली जाते. महादेवांच्या या कपालिक पिंडीचं दर्शन घेतल्यास सर्वपातकांचा नाश होतो, अशी धारणा आहे.

• महादेवाचा उत्सव..
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री याव्यतिरिक्त इतर दिवशी देखील या महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात शिव उपासक दूध, दही, मध, फळांचे रस याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. संकटनाशक, इच्छा पूर्ण करणारे, महा पापांचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना गंभीर संकटातूनसुद्धा लीलया बाहेर काढणारे कपालेश्वर महादेव म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 14/05/2021

हरिहर किल्ला एकदा अवश्य भेट द्या...⛰️

सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे. इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.

गडाकडे जाण्याचे मार्ग -
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.

दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 14/05/2021

#छत्रपती_संभाजी_महाराज🙏🚩
#१४ मे १६५७ स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती...
वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक, नखशीख... असे ग्रंथ लिहिणारे महान साहित्तिक, विचारवंत, क्षाक्तवीर, देशाचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐🚩
िजाऊ_जय_शिवराय_जय_शंभूराजे🚩

21/04/2021

श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!🚩🚩 नाशिकच्या काळाराम मंदिरात जन्मोत्सवाची तयारी🚩🚩

28/03/2021

नाशिकच्या रंगपंचमीची ‘रहाड संस्कृती’

होळीनंतर पाच दिवसांनी येणारा रंगपंचमीचा सण नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नाशिकमध्ये असलेल्या रहाड संस्कृतीमुळे या रंगांच्या सणाची रंगत अधिकच खुलत असते. त्यातच विविध रहाड हे तर नाशिकचे भूषण म्हणून प्रसिद्ध आहेत.
हा सण साजरा करण्यात नाशिकचे खास वेगळेपण आहे आणि ते म्हणजे पेशवेकालीन परंपरा लाभलेली रहाड संस्कृती.
विविध नैसर्गिक रंगांनी युक्त असे रंगीत पाणी येथील काही ठरविक चौकात हौदात साठवले जाते. साधारणतः ८ ते ९ फूट खोल या हौदाची विधिवत पूजा केली जाते व त्यानंतर मानाची उडी पार पडते. यानंतर नाशिककर नागरिक या पाण्यात उडी घेऊन रंगपंचमीचा आनंद घेत असतात. होळीनंतर वातावरणात वाढणारा उष्मा सहन करण्याची क्षमता प्राप्त व्हावी व अंगाची होणारी लाहीलाही कमी व्हावी याकरिता शरीराला थंडावा देणारे नैसर्गिक रंग या रहाडीत वापरले जात असतात. याबाबत असादेखील समज आहे की, लहान बाळास या रहाडीत आंघोळ घातल्यास त्याचे उष्णतेच्या व त्वचा विकारांपासून रक्षण होते.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 13/03/2021

पराक्रमाची साक्ष, रामशेज किल्ला

नाशिक-पेठ रस्त्यावर पंचवटीपासून १० किलोमीटर अंतरावर रामशेज किल्ला आहे. रामशेज इतर किल्ल्यांप्रमाणे दऱ्याखोऱ्यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाही. एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर त्याने आपले बलदंड शरीर झोकून दिले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा तसा हा आवडता किल्ला. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला यायचे, म्हणून या डोंगराला रामशेज म्हटले जाते, अशी अख्यायिका आहे. रामशेजचे वैशिष्ट्य असे की, तो कोणत्याही बाजूने सहज चढता येतो अन्‌ तोही अगदी तासाभरात. किल्ल्याजवळच राम मंदिर आहे. तेथे राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती आहेत. पाण्याचे कुंड आणि एक बोगदाही आहे. सीतागुंफेतून रामशेजला जाण्यासाठी बोगदा असल्याचेही म्हटले जाते. मात्र, सध्या तो बंद आहे. रामशेज किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी राम मंदिरावरील एक शिलालेख नक्की पहा. रामशेजचा इतिहास अत्यंत रोचक आहे. शिवकाळानंतर महाराष्ट्रावर मोगलांची आक्रमणे वाढू लागली. मराठा साम्राज्य काबीज करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने आखलेल्या पहिल्या मोहिमेत रामशेज या छोट्याशा किल्ल्याचाही समावेश होता. यावरून हा किल्ला मोगलांसाठी किती महत्त्वाचा असेल हे लक्षात येते. औरंगजेबाचा सरदार शहाबुद्दीन खानाने १६८२ मध्ये रामशेज मिळविण्याचे जोरदार प्रयत्न केले, पण तो अपयशी ठरला. त्याने दहा हजार सैन्य घेऊन रामशेजला वेढा घातला होता. रामशेजवर यावेळी अवघ्या सहाशे मावळ्यांनी किल्ला लढवला. यावेळी शहाबुद्दीन खानाने हल्ल्यासाठी रामशेजच्या उंचीचा लाकडी बुरूज (धमधमा) तयार केला. महाराष्ट्रातील युद्धतंत्रात हा अजब प्रकार पहिल्यांदा पहायला मिळाला. धमधम्यावरून तोफांचा मारा करूनही रामशेज झुकेना. रामशेजवरून होणाऱ्या दगडांच्या वर्षावामुळे शहाबुद्दीनखानाचे मोगल अधिकारी मारले जात होते. दुसरीकडे छत्रपती संभाजी राजांनी रामशेजच्या मदतीसाठी सैन्य पाठवून किल्ल्याभोवतीचा वेढा तोडण्याचे तंत्र अवलंबले होते. औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी राजशेज मिळविण्यासाठी धडपड केली. पण रामशेज हलला नाही. अखेर रामशेजचा वेढा सुटला. संभाजी महाराजांनी रामशेजच्या किल्लेदाराला चिलखत पोषाख, रत्नजडित कडे आणि नगद देऊन कौतुक केले.

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 27/01/2021

अभिमानास्पद: नाशिकच्या वैनतेयच्या गिर्यारोहकांनी सर केला अस्पर्शित सुळका.!!

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा अस्पर्शित सुळका प्रथमतःच आरोहण करण्यात यश मिळवले आहे.

27/01/2021


Just awesome video, don't miss this video. After all its about my Nashik 👌👌👌

Photos from Love Nashik - लव नाशिक's post 27/01/2021


काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Nashik
422006