Ambadas Waman Ahire

Ambadas Waman Ahire

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ambadas Waman Ahire, Social service, Nashik.

10/10/2024

"मातंग समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी साठी वस्तीगृहाची मागणी."

बहुजन रयत परिषद नाशिक* च्या वतीने आमदार सौ.देवयानी ताई फरांदे यांना निवेदन देऊन विद्यार्थी वसतिगृहाची मागणी करण्यात आली.

"वस्तीगृहाच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठे शैक्षणिक परिवर्तन होण्यास मदत होईल,पुढील कार्यकाळात प्राधान्याने वस्तीगृहाचा प्रश्न मार्गी लावू"
आमदार सौ.देवयानी ताई फरांदे

या प्रसंगी बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास अहिरे , महिला शहराध्यक्ष जान्हवी फाजगे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक साठे,प्रदेश पदाधिकारी साहेबराव शृंगार, अनिल बाविस्कर, दिलीप साठे,गजानन रणबावळे,किशोर शिरसाट,रवींद्र जगताप,शारदा भालेराव,सुमन खरात,अमोल गोरे,भगवान अस्वरे,शांताराम बक्षी या सह सहकारी उपस्थित होते.

*जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने jci न्यू गोदावरी नाशिकच्या* वतीने हिरडी ता.त्रंबकेश्वर (नाश 09/08/2024

आज जागतिक आदिवासी दिवस. हा दिवस जगभरातील आदिवासी समुदायांच्या हक्कांना आणि संस्कृतीला मान्यता देण्यासाठी साजरा केला जातो. आदिवासी समुदायांची विविधता, सांस्कृतिक वारसा, त्यांचे अधिकार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आदिवासींच्या परंपरा, त्यांची जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. म्हणूनच आदिवासी समुदायांचा सन्मान आणि त्यांचे हक्क जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांची संस्कृती आणि जीवनशैली जपून आपण अधिक समृद्ध आणि समावेशक समाजाची निर्मिती करू शकतो.
*जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!*

अंबादास अहिरे सर.
शहराध्यक्ष नाशिक शहर
बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य,

*जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने jci न्यू गोदावरी नाशिकच्या* वतीने हिरडी ता.त्रंबकेश्वर (नाश Video from अंबादास आहिरे सर भाजपाhttps://*जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने jci न्यू गोदावरी नाशिकच्या* वतीने हिरडी ता.त्रंब....

07/07/2024

तातडीची बैठक संपन्न..!
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र प्रदेश आयोजित कार्यकर्ता संवाद अभियाना अतंर्गत
रविवार दि. 28/07/2024 रोजी नाशिक शहरात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष , माजी मंत्री श्री.लक्ष्मणराव ढोबळे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष सौ.कोमल ताई साळुंखे(ढोबळे) प्रदेश सरचिटणीस श्री.ईश्वर क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या संवाद मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज पंचवटी विभागात संपन्न झाली , या वेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजू थोरात, नाशिक शहराध्यक्ष अंबादास अहिरे सर, प्रेदश कार्यकारिणी पदाधिकारी अनिल बाविस्कर ,रवींद्र पाटील ,साहेबराव शृंगार ,अमोल गोरे,आशोक जाधव यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2024 पंचवटी विभागाचे अध्यक्ष बापू सपकाळे ,कार्याध्यक्ष प्रमोद साठे यांचे अभिनंदन करण्यात आले.
संवाद मेळाव्याचे नियोजन ,नवीन पद नियुक्त्या सह जास्तीत जास्त कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी जिल्हा आणि शहर दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे स्थळ लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

05/04/2024

* #"देशाच्या #विकासासाठी #लोकसभा #निवडणुकीत #महायुतीला #साथ #देऊ..!"*

* #अंबादास #अहिरे #सर*
शहर अध्यक्ष बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक शहर.

बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य पदाधिकारी चिंतन बैठक पुणे येथे संपन्न झाली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा.लक्ष्मणराव ढोबळे,प्रदेश अध्यक्षा ऍड सौ. कोमलताई साळुंखे (ढोबळे) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून लोकसभा निवडणूक 2024 निमित्त आढावा घेण्यात आला.
नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा निवडणुकीत बहुजन रयत परिषद महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देऊन , प्रचारात मोठ्या ताकतीने उतरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
देशाचा विकास आणि सामाजिक सुरक्षा, आरोग्य,शिक्षण, अन्न सुरक्षा,महिला कल्याण,गरीब कल्याण,शेतकरी सन्मान ,कामगार,वंचित आणि मागास वर्गीय समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या मोदी सरकारच्या पाठीशी समाजाने निस्वार्थ पणे उभे रहावे ही काळाची गरज असल्याची ठाम भूमिका मांडण्यात आली.
भाजपा चे नेते , उप मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी * #अबकड* आरक्षण वर्गीकरण साठी समिती स्थापन करून मागासवर्गीय समाजात विश्वास निर्माण केला आहे, वर्षानुवर्ष आरक्षणा पासून वंचित समाजाला न्याय मिळणार आहे या साठी महायुती सोबत जाणे आवश्यक आहे.
श्री.देवेंद्रजी फडणवीस जे बोलतात ते करून दाखवितात असे प्रामाणिक राजकीय नेतृत्व आहे.
लवकरच नाशिक शहरात पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात बहुजन रयत परिषदेची निवडणूक भूमिका जाहीर करण्यात येईल.
आपला स्नेही,
* #अंबादास #अहिरे #सर*
शहर अध्यक्ष
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक शहर.
7385993515

Photos from Ambadas Waman Ahire's post 05/04/2024

#बहुजन #रयत #परिषद #महाराष्ट्र #प्रदेश
#राज्यस्तरीय #बैठक #पुणे #अंबादास_आहिरे

Photos from Ambadas Waman Ahire's post 01/03/2024

*आयुष्याचा टर्निंग पॉईंट ..!*

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी S.S.C.) परीक्षा सुरु होत आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्यास आकार देण्याचा हा अतिशय महत्वाचा टप्पा..!

या महत्वपूर्ण दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा..!

श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय परीक्षा केंद्र सातपूर कॉलनी येथे परीक्षार्थीनां गुलाब पुष्प आणि पेन देऊन शुभेच्छा देतांना भाजपा अनु.जाती मोर्चा नाशिक शहर उपाध्यक्ष तथा बहुजन रयत परिषद शहराध्यक्ष अंबादास आहिरे सर, सौ.जयश्री आहिरे, योगेश गोडे,अक्षय जाधव, अनिल पवार, सौ.खुशी आहिरे, श्री.छत्रपती विद्यालयाचे विद्यार्थी, कु.पूर्वा आहिरे,कु.हर्षवर्धन आहिरे , कु.स्वराज आहिरे उपस्थित होते.
या प्रसंगी शिक्षक पालक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते

Photos from Ambadas Waman Ahire's post 26/02/2024

नगरमध्ये बहुजन रयत परिषदेचा
संवाद मेळावा उत्साहात संपन्न
उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या बहुजन रयत परिषदेचा संवाद मेळावा अहमदनगर येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते झाले, संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांचा मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्रीमती मंदाताई ठोकळ यांची अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्षपदी, अबोली सकट जिल्हा युवती अध्यक्ष अहमदनगर, वैष्णवी ताकवणे जिल्हा विधी कायदे सल्लागार अहमदनगर, रवींद्र कनगरे जिल्हा युवक अध्यक्ष अहमदनगर, राजू थोरात जिल्हाध्यक्ष नाशिक, संजय भिसे जिल्हा कार्याध्यक्ष अहमदनगर, अशा निवडी करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ad. कोमलताई साळुंखे यांनी संघटनेची ध्येयधोरणे, महत्व आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शनपर भाषण केले. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे साहेब यांनी संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी दानाजोपयोगी उपक्रम राबवून संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन केले.
मेळाव्यास संघटनेचे प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर. प्रदेश संपर्कप्रमुख श्री दत्तात्रय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ना. म. साठे. प्रदेश कार्यकारणी सदस्य सिद्राम जावीर, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र साहेबराव शृंगार, संपर्कप्रमुख उत्तर महाराष्ट्र रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल बाविस्कर, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सुरेश आबा वाघमारे, सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू पवार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष चंदू चव्हाण, सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष योगेश येडाळे, नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे, तसेच संघटनेचे पुरुष व महिला पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ना. म. साठे सर यांनी केले. अहमदनगर जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे यांनी आभार मानले.

Photos from Ambadas Waman Ahire's post 12/01/2024

#योग्य_व्यक्ती, #सार्थ_निवड
#बहुजन #रयत #परिषद #महाराष्ट्र #राज्य संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री श्री. लक्ष्मणराव ढोबळे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष ॲड.कोमलताई साळुंखे ढोबळे यांच्या आदेशाने, नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी मा. राजू थोरात, शहर उपाध्यक्ष पदी मा. गोपाल रणशिंगे, जिल्हा संपर्कप्रमुख मा. किशोर शिरसाठ यांची निवड...!
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!

आपला स्नेही,
#अंबादास_आहिरे
शहर अध्यक्ष,
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक शहर.

04/12/2023

स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

#त्र्यंबकेश्वर #कीर्तन #पसायदान #नारायणी_वारकरी_शिक्षण_संस्था

30/11/2023

स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषद नाशिक शहर आणि श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर (मुलींची) वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न...!
स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा कीर्तनकार हभप कु.खुशाली महाराज उगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी केले होते. यावेळी त्यांनी स्व.सौ.अनुराधा ताई ढोबळे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देऊन आदरांजली अर्पण केली. शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.

#किर्तन #विठ्ठलरखुमाई #माऊली

Photos from Ambadas Waman Ahire's post 30/11/2023

स्व. सौ. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रयत परिषद नाशिक शहर आणि श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर (मुलींची) वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न...!
स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा कीर्तनकार हभप कु.खुशाली महाराज उगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी केले होते. यावेळी त्यांनी स्व.सौ.अनुराधा ताई ढोबळे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देऊन आदरांजली अर्पण केली. शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.

#किर्तन #विठ्ठलरखुमाई #माऊली

15/11/2023

#बहुजन_रयत_परिषदेच्या वतीने #नाशिक या ठिकाणी क्रांतीगुरु #लहुजी_वस्ताद_साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

शहराध्यक्ष, नाशिक
#अंबादास_आहिरे सर,

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Nashik