22/04/2026
🚩 छत्रपतींचा इतिहास पुन्हा जिवंत होतोय… 🚩
“राजा शिवाजी” या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर पाहून अंगावर रोमांच उभे राहिले! 🔥
शौर्य, पराक्रम, आणि स्वराज्याची जाज्वल्य भावना यांचा अद्भुत संगम या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची झलक पाहताना अभिमानाने छाती भरून येते.
प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट नक्की पाहावा, अशी उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.
🚩 स्वराज्याची गाथा, पुन्हा एकदा… मोठ्या पडद्यावर! 🚩
Raja Shivaji Anthem ‘Chhatrapati’ | Hindi | Riteish D | Ajay – Atul | In Cinemas 1 May
The sound of our pride is officially out. Experience the Raja Shivaji Anthem ‘Chhatrapati’ (Hindi) now. 🚩Music by Ajay-AtulChoreographed by Remo DsouzaThe F...
21/04/2026
📍नाशिक | २१ एप्रिल २०२६
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १ म्हसरूळ येथील मनपा प्राथमिक शाळा क्रमांक १ व माध्यमिक विद्यालय तसेच म्हसोबावाडी येथील मनपा शाळा क्रमांक २ या शाळांमध्ये अनेक मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत. या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत असून बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असूनही आवश्यक सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
सदर शाळांमध्ये खालील प्रमुख समस्या आहेत..
१) शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने धोकादायक अवस्थेत असून नवीन इमारतीची तातडीने आवश्यकता आहे.
२) अतिरिक्त खोल्या नसल्यामुळे ICT लॅब, प्रयोगशाळा, वाचनालय, व्यावसायिक शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम या सुविधा विद्यार्थ्यांना देता येत नाही.
३) शाळेच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतीचा अभाव असल्याने धोका निर्माण होतो. शाळेच्या आसपास अपराधी आणि गांजा पिणारे अपप्रवृत्ती फिरत असल्याने शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामूळे शाळेला सुरक्षारक्षक यांची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे.
४) विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची अपुरी व निकृष्ट व्यवस्था असल्याने स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नवीन बांधकाम आवश्यक आहे.
५) पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.
६) ICT लॅब, प्रयोगशाळा, वाचनालय, व्यावसायिक शिक्षण, संगणक कक्ष, ई-लर्निंग साधने व आधुनिक शिक्षण सुविधांचा अभाव आहे.
७) विद्यार्थ्यांसाठी खेळाचे व इतर उपक्रमांचे साधनांचा अभाव स्वच्छता व देखभाल व्यवस्थेची कमतरता
वरील सर्व समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार शिक्षणासाठी तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
यासंदर्भात आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. Dada Bhuse साहेब यांची आढावा बैठकी दरम्यान भेट घेऊन त्यांना प्रभाग क्रमांक १ मधील शाळांना या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे साकडे घातले.
यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या बैठकीत त्यांनी येणाऱ्या काळात शाळांच्या पटसंख्येत वाढ कशी होईल आणि अधिकाधिक विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित कसे होतील, यासाठी प्रत्येक शाळेचा सुस्पष्ट आणि दर्जेदार आराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा केवळ इमारतीपुरत्या मर्यादित न राहता त्या सुरक्षित, सुसज्ज आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त असाव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत.
यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया असल्याने, या शाळांच्या बळकटीकरणासाठी सर्व मनपा नगरसेवकांनी पुढाकार घेऊन नियोजनबद्ध काम करावे, अशी देखील सूचना केली.
यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना, “एकही शाळा बंद पडू नये” यावर त्यांनी ठाम भूमिका मांडली. उलटपक्षी, जास्तीत जास्त नवीन शाळा उभारल्या जाव्यात आणि विद्यमान शाळांचा दर्जा उंचावला जावा, यासाठी महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देऊन शाळेसाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन देखील दिले.
या आढावा बैठकीला महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
#प्रभाग_१
19/04/2026
भगवान परशुराम जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान परशुराम यांच्या आदर्शांनी आपल्याला सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळो.
आपल्या जीवनात धैर्य, शौर्य आणि सदाचाराची अक्षय ऊर्जा निर्माण होवो.
19/04/2026
अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची अक्षय भरभराट होवो. या पवित्र दिवशी सुरु केलेले प्रत्येक शुभ कार्य आपल्याला यश, समाधान आणि नवचैतन्य घेऊन येवो.
17/04/2026
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या प्रभाग क्र. १ च्या सर्वांगीण विकासासाठी आज पुन्हा कुंभमेळा आयुक्त मा. शेखर सिंग साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे खालील महत्त्वाच्या कामांसाठी मंजुरीची पुन्हा एकदा मागणी केली.
🔸 सीता सरोवर परिसराचा विकास, स्वच्छता व सौंदर्यीकरण
🔸 म्हसरूळ – वरवंडी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण
🔸 किशोर सूर्यवंशी मार्गाचे रुंदीकरण व सर्वांगीण विकास
🔸 म्हसरूळ – आडगाव रस्ता रुंदीकरण
सिंहस्थ काळात लाखो भाविक नाशिकमध्ये येणार आहेत. त्या दृष्टीने आपल्या भागात उत्तम रस्ते, स्वच्छता व सुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी मा. कुंभमेळा आयुक्त यांनी सर्व कामांबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू.
आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. 🙏
16/04/2026
प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभागात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वसाहती वाढत असताना जुनी जलवाहिनी व्यवस्था अपुरी पडत आहे, परिणामी अनेक भागांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडे पाण्याचे टँकर वाढवून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
👉 प्रशासनाने तातडीने पुढील उपाययोजना कराव्यात:
✔️ पाणी टँकरची संख्या वाढवणे
✔️ जलवाहिनी दुरुस्ती व सुधारणा करणे
✔️ नवीन वाढत्या वसाहतींसाठी योग्य नियोजन करणे
✔️ नवीन जलकुंभांची उभारणी करणे
नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. जर लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला गेला नाही, तर आगामी महासभेत या प्रश्नावर ठामपणे आवाज उठवला जाईल.
#पाणीप्रश्न #नाशिक #प्रभाग१ #जनतेचाआवाज
14/04/2026
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महान विचारवंत आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनीं विनम्र अभिवादन !
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रेरणा देणारा ठरो. तसेच समानता, बंधुता आणि न्याय या त्यांच्या विचारांवर आपण सर्व मार्गक्रमण करुयात.
जय भीम!
🙏🙏🌸🌸
11/04/2026
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि जातिभेद दूर करून शिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पसरवणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
त्यांच्या विचारांमधून समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणूया.
02/04/2026
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी |
अनादिनाथ पूर्ण तारावयासी ||
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला |
नमस्कार माझा तया मारुतीला ||
संकटमोचन, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत आणि सुख-समृद्धी नांदो.
🚩🚩🚩
26/03/2026
|| जय श्रीराम ||
धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारे
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो !
🚩 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
19/03/2026
गुढी पाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना !
#गुढी_पाडवा
13/03/2026
" #गार्डनमध्ये_टवाळखोरी_नाही,
#कुटुंबासाठी_सुरक्षित_वातावरण_हवे!”
#म्हसरूळ_पोलीस_स्टेशनचा_ठोस_निर्धार
#प्रभाग_१ मधील गार्डन व ओपन स्पेसमध्ये बसून दारू पिणे, गांजा सेवन करणे आणि टवाळखोरी करणाऱ्या काही प्रवृत्तींबाबत आम्ही म्हसरूळ पोलीस स्टेशनचे लक्ष वेधले होते.
या संदर्भात म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. अंकुश चिंतामण साहेब यांनी आमच्या विनंतीची सकारात्मक दखल घेत, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
"प्रभाग १ मधील गार्डन, ओपन स्पेस आणि सार्वजनिक ठिकाणे ही महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी सुरक्षित असली पाहिजेत, हा आपला सर्वांचा उद्देश आहे.
यापुढे अशा गैरप्रकार करणाऱ्यांना #कायद्याचा_बालेकिल्ला दाखवला जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने दिला आहे. आजपासून रोज रात्री म्हसरूळ पोलिस स्टेशनची स्वतंत्र टीम अशा टवाळखोरांच्या शोधात निघणार आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील ज्या ज्या उद्यानात किंवा ओपन स्पेस मध्ये टवाळखोरांचा किंवा मद्यपींचा त्रास आहे, त्या जागांबाबत स्थानिक रहिवास्यांनी कृपया आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरुन पोलिस प्रशासनाला काम करणे सोपे जाईल. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल.
सदर मोहीम राबवणाऱ्या म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. चिंतामण साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.
प्रभागातील सर्व नागरिकांनीही परिसर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
प्रविण रमेश जाधव
नगरसेवक,
प्रभाग १, मेरी-म्हसरूळ