MyNmc

Call Directions Website Contact the organization

MyNmc Official Page for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram and Twitter for daily updates.

For Any queries please call on Nmc helplines +917030300300

नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासात आणि भावी पिढीच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे आहे. याच पार्श्वभूमीवर पालक...
03/10/2026

नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासात आणि भावी पिढीच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे आहे.

याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मायेची साडी देण्यात आली. महापौर मा. हिमगौरी आहेर- आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री ज्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे,नगरसेवक दिनकर पाटील आणि रिद्धीश निमसे आदिजण उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियान' अंतर्गत नाशिक मनपाच्या 100 शाळांमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' उत्साहात पार पडले.शिक्षक, वॉटर ग्रेस कर्म...
03/10/2026

सेवा संकल्प अभियान' अंतर्गत नाशिक मनपाच्या 100 शाळांमध्ये 'डीप क्लीन ड्राईव्ह' उत्साहात पार पडले.शिक्षक, वॉटर ग्रेस कर्मचारी व पालकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

महापौर मा. हिमगौरी आहेर- आडके यांच्या प्रेरणेने, मनपा आयुक्त मनिषा खत्री यांच्या संकल्पनेतून तसेच उपमहापौर मा. विलास अण्णा शिंदे, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरीत्या राबवण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेमुळे नाशिक मनपाच्या शाळांचा संपूर्ण परिसर स्वच्छ झाला असून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व प्रसन्न शैक्षणिक वातावरण मिळाले आहे.

03/10/2026

सेवा, संकल्प अन् स्वच्छतेचा ध्यास!

सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नाशिक मनपाच्या १०० शाळांमध्ये राबवला विशेष 'डीप क्लीन ड्राईव्ह'! विद्यार्थी राहिले सुरक्षित, शिक्षक अन् पालकांनी केले उत्स्फूर्त श्रमदान.

आरोग्यदायी अन् प्रसन्न वातावरणात घडणार आता उद्याची पिढी!

जागृत नाशिककर, सुरक्षित नाशिककर!रेबीजवर एकमेव उपाय म्हणजे  वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेणे.  चला, जागरूक नाशिककर बनूया...
02/10/2026

जागृत नाशिककर, सुरक्षित नाशिककर!

रेबीजवर एकमेव उपाय म्हणजे वेळेवर उपचार आणि योग्य काळजी घेणे. चला, जागरूक नाशिककर बनूया आणि रेबीजमुक्त समाज घडवूया.

नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरभरात 'FOOTPATH FIRST' ही विशेष मोहीम राबवली जात आहे.   सुरक्षित, मोकळे आण...
02/10/2026

नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरभरात 'FOOTPATH FIRST' ही विशेष मोहीम राबवली जात आहे.
सुरक्षित, मोकळे आणि अडथळामुक्त रस्ते हेच एका सुंदर व शिस्तबद्ध शहराचे लक्षण आहे. या मोहिमेला पाठिंबा देऊया आणि आपल्या नाशिक शहराला अधिक सुरक्षित व सुंदर बनवूया!

महात्मा गांधी जयंती आणि सेवा संकल्प अभियान निमित्ताने 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत शहरातील कन्नमवार पूल, पंचवटी येथे विश...
02/10/2026

महात्मा गांधी जयंती आणि सेवा संकल्प अभियान निमित्ताने 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत शहरातील कन्नमवार पूल, पंचवटी येथे विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.

पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आहेर- आडके यांच्या मार्गदर्शखाली आणि सर्व नाशिककरांच्या उस्फूर्त सहभागाने स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली.

यावेळी भाजपा गटनेते श्याम बडोदे,पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, नगरसेविका प्रियंका माने, जुई शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, गौरव गोवर्धने, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संदीप जाधव,राजेश पंडित, नाशिक सायकलिस्टच्या डॉ.मनीषा रौंदळ व टीम, राजेश पंडित, मनोज पाटील, all india institute of local self - government चे विद्यार्थी, संचालक घनकचरा विभाग आवेश पलोड, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ शाळा, निरोगी शाळा, सुंदर भविष्य!सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आणि २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने न...
02/10/2026

स्वच्छ शाळा, निरोगी शाळा, सुंदर भविष्य!

सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आणि २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचा एक सुंदर उपक्रम!

आपल्या शाळा १००% स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी
चला, एकत्र येऊया आणि 'Deep Clean Drive' अभियानात सक्रिय सहभाग घेऊया.

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित यात्रोत्सवातील व्यावसायिक गाळ्यांबाबत हिंदू हित र...
01/10/2026

नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित यात्रोत्सवातील व्यावसायिक गाळ्यांबाबत हिंदू हित रक्षा समिती, विश्व देवस्थान समिती, अखिल भारत हिंदू महासभा, बजरंग दल, हिंदू राष्ट्र समन्वय समिती व जीवाधार सेवक संस्था यांच्या प्रतिनिधींनी महापौर हिमगौरी आहेर- आडके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी विषयाची नोंद घेतली असून संबंधित प्रशासनाकडून नियम व उपलब्ध तरतुदींनुसार आवश्यक कार्यवाहीबाबत पाहणी करण्यात येईल असे सांगण्यात आले. याप्रसंगी हिंदू हित रक्षा- प्रविण जोशी, हिंदू महासभा- ऋषिकेश डापसे, विश्व देवस्थान समिती-नंदकिशोर भावसार, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल जिवाधार सेवक संस्था, हिंदू राष्ट्र समन्वय समिती- सुमंत वैद्य , मंजुशा जोशी, उन्मेश कुमठेकर, सौ राजश्री कुमठेकर, गौरी गायकवाड, प्रिती बरे, वैभव बरे, बापू शिंदे, रणजीत साळी, प्रशांत पाठक, महेश संत, सुरेश बोडके, अमित कुलथे, पुष्कर भंडारी आदीजण उपस्थित होते.

# CommunityFirst

दत्तनगर, अंबड परिसरातील बोरवेलच्या दूषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत आज महापौर हिमगौरी आहेर- आडके य...
01/10/2026

दत्तनगर, अंबड परिसरातील बोरवेलच्या दूषित पाण्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत आज महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यासंबंधी तातडीने उपाययोजना करण्याचे आणि सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

यावेळी सिडको प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक नितीन दातीर, अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा व मलनिस्सारण रवींद्र धारणकर, सातपूर विभागीय अधिकारी नाना साळवे, राजेश पंडित, मनोज साठे, चंदू पाटील, प्रवीण शिलावत, रोशन केदार, रवी वाघ यांच्यासह मनपा अधिकारी-कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

01/10/2026

पावसाळ्यात दूषित पाणी नदीत मिसळण्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि RCC Box Drain चा वापर करून सांडपाणी व पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या जात आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि पुढील अनेक दशकांचा विचार करून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुढील पिढीला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त नाशिक देण्यासाठी NMC कटिबद्ध आहे.

Address

Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road
Nashik
422002

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+917030300300

Alerts

Be the first to know and let us send you an email when MyNmc posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MyNmc:

Shortcuts

Share