03/06/2026
जागतिक सायकल दिवस
एका निरोगी आरोग्याकडे आणि प्रदूषणमुक्त निसर्गाकडे पाऊल टाकूया.
नियमित सायकलिंगचे फायदे ओळखून आजपासूनच एक नवी सुरुवात करुया..
Official Page for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram @my_nmc and Twitter @my_nmc for daily updates.
For Any queries please call on Nmc helplines +917030300300
03/06/2026
जागतिक सायकल दिवस
एका निरोगी आरोग्याकडे आणि प्रदूषणमुक्त निसर्गाकडे पाऊल टाकूया.
नियमित सायकलिंगचे फायदे ओळखून आजपासूनच एक नवी सुरुवात करुया..
03/06/2026
स्वच्छता ही केवळ मोहीम नाही, ती आपली जबाबदारी आहे!
नुकतीच टाळकुटेश्वर पूल आणि लक्ष्मीनारायण घाट परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. पण काही बेजबाबदार नागरिकांमुळे तिथे पुन्हा अस्वच्छता पसरवली जात असल्याचे समोर आले . यामुळेच गोदावरी संवर्धन कक्ष, सुरक्षा रक्षक आणि पोलीस दल यांच्याकडून संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली गेली.
जबाबदार नागरिक बना, प्रशासनाला सहकार्य करा.
02/06/2026
एक पाऊल नंदिनी नदी महास्वच्छता अभियानाकडे, एक पाऊल समृद्ध नाशिककडे!
नंदिनी नदी आपल्या नाशिकच्या पर्यावरणीय वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नदीला तिचे वैभव परत मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे!
५ जून 'जागतिक पर्यावरण दिन' निमित्त आयोजित महास्वच्छता अभियानात आपला सहभाग नोंदवा.
आपल्या जवळच्या १० ठिकाणांपैकी एका ठिकाणी उपस्थित राहा आणि नंदिनी नदी महास्वच्छता अभियानात सहभागी व्हा..
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आता आपल्या हातात आहे..
ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीतच टाका.
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून स्वच्छ नाशिक बनवण्यासाठी हातभार लावूया..
02/06/2026
आपली नदी, नाशिकची समृद्धी!
'कन्नमवार पूल ते कपिला संगम' स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.
यावेळी नदीतील घातक असलेले घटक हटवण्यात आले असून ही स्वच्छता जपणे आपले कर्तव्य आहे.
01/06/2026
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहरातील नदी संवर्धन व पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी उन्नत नाशिक अभियानांतर्गत “नंदिनी नदी स्वच्छता महाअभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनाबाबत कै. सदाशिव गंगाराम भोरे नाट्यगृह, पंचवटी येथे महापौर सौ.हिमगौरी आहेर-आडके यांच्या नेतृत्वात आढावा बैठक संपन्न झाली.
नाशिक महानगरपालिका, विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून हे महाअभियान राबविण्यात येणार असून नाशिककरांनी सहकुटुंब सहभागी होऊन स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक नाशिक
घडविण्याच्या या लोकचळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी महापौर सौ. हिमगौरी आहेर-आडके, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, कुंभमंत्री मा. गिरीशभाऊ महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, मंगला नन्नावरे, समाधान देवरे, बाळकृष्ण शिरसाठ,नगरसेविका रंजना भानसी, राजेश पंडित,मनोज साठे, तसेच इतर नगरसेवक, नगरसेविका, मनपा अधिकारी उपस्थित होते.
01/06/2026
नाशिकमधील पथविक्रेत्यांच्या प्रगतीला मिळणार नवी गती!
नाशिक महानगरपालिका आणि केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' योजनेच्या माध्यमातून आयोजित 'लोक कल्याण मेळावा'!
कालावधी: १ जून ते ३० जून २०२६
ठिकाण: नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध बाजारपेठ क्षेत्र
₹१५,००० ते ₹५०,००० पर्यंत सुलभ कर्ज
७% व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहारांवर आकर्षक कॅशबॅक मिळवण्याची हीच सुवर्णसंधी!
अधिक माहितीसाठी राजीव गांधी भवन, पीएम स्वनिधी विभाग, महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधा.
01/06/2026
बोलतेय गोदामाई..
ऐकताय ना नाशिककर..
आपली जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीला प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यासाठी आजच स्वतःशी एक प्रामाणिक वचन देऊया.
स्वच्छ गोदामाई, सुंदर नाशिक..
नाशिक कुंभ २०२७ च्या अनुषंगाने रामकुंड परिसरातील रामकालपथ विकास कामांची महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्याकडून पाहणी करण्यात आली. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
नाशिकच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाला साजेसा विकास घडवून आणण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून भाविकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे, स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्र भाऊ सानप, नगरसेवक शाहू महाराज खैरे, नगरसेविका सौ. मयुरी ताई पवार, ज्येष्ठ नेते श्री. विनायकजी पांडे, अधिक्षक अभियंता रवींद्र धारणकर, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, कार्यकारी अभियंता बांधकाम संदेश शिंदे, बांधकाम उप अभियंता निलेश साळी तसेच इतर मनपा अधिकारी, कंत्राटदार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
[Nashik Kumbh2027, Ramkund, Ramkal Path]
स्त्रीशक्ती, नेतृत्व आणि लोकसेवेचे प्रेरणास्थान लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
| Monday | 9:45am - 6:15pm |
| Tuesday | 9:45am - 6:15pm |
| Wednesday | 9:45am - 6:15pm |
| Thursday | 9:45am - 6:15pm |
| Friday | 9:45am - 6:15pm |