02/07/2020
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
The Maratha Vidya Prasarak Samaj is one of the most prestigious centers of learning in the State of Maharashtra.
It manages 485 educational units & is one of the premier educational hub in the jurisdiction of Savitribai Phule Pune University.
02/07/2020
01/07/2020
Sakal Media Group Sakal Media Group
मविप्र कृषी बास्केट उपक्रमाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया
30/06/2020
लॉकडाऊन च्या कालावधीत नाशिककरांना मविप्र कृषी बास्केट मार्फत घरपोच भाजीपाला
मविप्र संचलित कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने गेल्या २ वर्षापासून विषमुक्त शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला जात आहे. ह्याच प्रात्यक्षिक प्रयोगाच्या माध्यमातून नाशिकमध्ये विषमुक्त शेतीविषयी सामाजिक जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रमांतर्गत कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी कृषीदूत म्हणून व शिक्षक, सेवकवृंद यांच्या मार्फत उत्पादित केलेला विषमुक्त भाजीपाला व फळे लॉकडाऊन च्या कालावधीत नाशिककरांना घरपोच पोहचविली जात आहे. नाशिककरांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून मविप्र कृषी बास्केट संकल्पनेचे कौतुक केले आहे.
27/06/2020
खेडगाव येथील मविप्र संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालयाकडून मास्क निर्मिती करून सरकारी नियमांचे पालन करत विविध सार्वजनिक ठिकाणी मास्कचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाकडून ३५७० मास्कचे वाटप व कोरोना बद्दल जनजागृती करण्यात आली
27/06/2020
मविप्र संचलित राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी ३०० मास्क बनवून वसाहतीमध्ये वाटप केले. तसेच सॅनिटायजरचे देखील वाटप केले. तसेच जनशिक्षण संस्थेतर्फे मुलभूत सेवा पुरविणाऱ्या सेवकांना ६२०० मास्क चे वाटप केले.
27/06/2020
कोरोना नावाच्या छोट्याशा विषाणूने संपूर्ण जगाला हादरुन सोडले असतांना समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या संकल्पनेतून व मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा मविप्र समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषयीचे समाजामध्ये असणारे गैरसमज व समाजामध्ये या रोगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मविप्र संस्थेतील चित्रकला शिक्षक राजेंद्र सोनवणे, दत्तात्रय पवार, जगदीश डिंगे, सोमेश्वर मुळाणे, राहुल भामरे, देवदत्त राऊत यांनी गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकात कोरोना विषाणू संबंधीचे जनजागृतीचे चित्र साकार केले.
27/06/2020
संस्थेच्या डॉ वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या वतीने मविप्रच्या शाळांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले. डॉ के एन पाटील यांनी ३ मार्च ते १४ मार्च २०२० या कालावधीत मविप्र संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर,गांधीनगर,अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड,वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर,अभिनव गोरेराम लेन,अभिनव उत्तमनगर,मराठा हायस्कूल,न्यू मराठा हायस्कूल,जनता विद्यालय पवननगर,जनता विद्यालय मातोरी व गिरणारे हायस्कूल या शाळांमध्ये जाऊन कोरोना बाबत प्रबोधन व जनजागृती केली.
27/06/2020
कोरोना च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून मविप्र संस्थेने मार्च महिन्यात शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळेतील वर्गखोल्या तसेच प्रांगणाची स्वच्छता करण्यात आली. संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, यांनी कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी स्वतः भेट देऊन परिसराची पाहणी केली.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Central Office, Shivaji Nagar, Gangapur Road
Nashik
422002
