MNS Adhikrut Nashik

MNS Adhikrut Nashik

Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक अधिकृत पेज. This Page Is Based on Maharastra Navnirman Sena, Which looks After Nashik City.

Photos from MNS Adhikrut Nashik's post 22/04/2026
21/04/2026
21/04/2026

नाशिक शहरातील गणेश चौक परिसरातील ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा लाभलेल्या नाशिक महानगरपालिका हायस्कूल बंद करण्याच्या हालचाली थांबवून सदरील शाळा आधुनिक सुविधांनी सुसज्ज करून सुरू ठेवण्यात यावी, तसेच प्रस्तावित १०० बेड हॉस्पिटलसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे शिक्षणमंत्री मा. दादा भुसे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

गणेश चौक येथील मनपा हायस्कूल ही गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. आज अनेक माजी विद्यार्थी विविध शासकीय पदांवर, उद्योग क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यामुळे ही शाळा परिसरासाठी अभिमानाची बाब असून ती बंद करणे अन्यायकारक ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच शाळेची जागा शैक्षणिक कार्यासाठी कायम ठेवून तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात, विद्यार्थ्यांना मूळ शाळेतच शिक्षण द्यावे आणि हॉस्पिटलसाठी पेलिकन पार्क येथील उपलब्ध जागेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, शहर उपाध्यक्ष तुषार जगताप, मिलिंद कांबळे, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, राहुल गोडे, अमित गांगुर्डे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

31/03/2026

मराठी माणसांची महाराष्ट्राची माफी मागण्यासाठी यावं लागेल

Photos from MNS Adhikrut Nashik's post 12/03/2026

विकास व्हायलाच हवा, पण तो निसर्गाचा बळी देऊन नको‼️

नाशिकच्या निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आज स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी काढलेल्या ‘शांततामय पायी मोर्चा’त सहभागी झालो. या पदयात्रेत नाशिककरांची आपल्या शहराप्रती असलेली तळमळ जवळून अनुभवता आली.

कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुनी झाडं तोडण्याचा हा घाट का घातला जातोय? ही झाडं नक्की कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणत्या उद्योगपतींसाठी तोडली जात आहेत, याचे उत्तर प्रशासनाने द्यायला हवे. प्रशासनाने जनतेच्या भावनेचा आदर करावा आणि आता तरी ‘योग्य’ पाऊले उचलावी, याकरिता मा. महापौर आणि मा. उपमहापौर यांची भेट घेतली.

पर्यावरण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिककरांच्या सोबत नेहमीच खंबीरपणे उभी आहे.

निसर्ग वाचला, तरचं भविष्य वाचेल! 🙌🏻

Want your business to be the top-listed Government Service in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Rajgad, Office
Nashik
422001