30/05/2026
AISF Nashik
All India Students'Federation(AISF) was Established by 1936 now works for the betterment of students with its focus on Peace,Progress &Scientific Socialism
30/05/2026
होय, आमचा शिवाजी जनसामान्यांचा!
व्याख्याते: डॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र) . . . . .
ाशिक
28/05/2026
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) आणि (AITUC) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आशा कामगारांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अत्यंत खडतर आर्थिक व सामाजिक परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. आशा कामगार दिवसरात्र समाजाच्या आरोग्यासाठी कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे प्रेरणादायी असून कष्टकरी वर्गाच्या जिद्द आणि संघर्षाचे प्रतीक असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षणाचा हक्क, कष्टकरी कुटुंबांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी AISF व AITUC सातत्याने संघर्ष करत राहतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास आशा कामगार, विद्यार्थी, पालक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
26/05/2026
सरकारी शाळा बंद करून,शिक्षण भांडवलदारांच्या बाजारात विकलं जात आहे.गरीबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या या व्यवस्थेविरोधात संघर्ष उभा राहिलाच पाहिजे.
#सरकारीशाळावाचवा
#आम्हीसारेपानसरे #आम्ही_सारे_पानसरे #शिवाजी_कोण_होता
25/05/2026
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) नाशिक जिल्हा कौन्सिलच्या वतीने दि. 24 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला “शहीद कॉ. हेमू कलानी विद्यार्थी सन्मान सोहळा” उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कष्टकरी कुटुंबातील दहावी व बारावी उत्तीर्ण १०० विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून AISF माजी महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड प्रशांत आंबी, राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड तल्हा शेख तसेच महाराष्ट्र राज्य सहसचिव कॉम्रेड प्राजक्ता कापडणे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करत शिक्षण व संघर्षाचा संदेश देणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) नाशिक आयोजित “कोण शिवप्रेमी? कोण शिवद्रोही?” या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्याख्याते डॉ. दीपक पवार यांनी शिवरायांच्या विचारांचे सखोल विश्लेषण करत उपस्थितांना मार्गदर्शन केले..
#शिवाजी_कोण_होता
21/05/2026
घरची आर्थिक परिस्थिती कठीण असतानाही मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या बळावर यश संपादन करणाऱ्या १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी “शहीद कॉ. हेमू कलानी विद्यार्थी सन्मान सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.
🗓 २४ मे २०२६
🕔 सायंकाळी ५ वाजता
📍 आय.एम.आर.टी. महाविद्यालय (हॉल)
रावसाहेब थोरात सभागृहासमोर,
गंगापूर रोड, मॅरेथॉन चौक, नाशिक - ४२२ ००२
📞 संपर्क : 8600911239 / 9699554583
आयोजक : AISF नाशिक जिल्हा कौन्सिल
चला… संघर्षातून उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या यशाचा साक्षीदार होऊया! ✨
विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात. पालक कर्ज काढून फी भरतात. पण या व्यवस्थेत मेहनतीपेक्षा पेपर माफियांची किंमत जास्त झाली आहे. शिक्षण व्यवस्था सडवणारे आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे अजूनही मोकाट फिरत आहेत. जोपर्यंत या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा भ्रष्ट खेळ थांबणार नाही. त्यांच्या आर्थिक आणि राजकीय पायमोडे उलथून टाकण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचं मानसिक आणि आर्थिक छळ सहन केलं जाणार नाही. NEET (UG) 2026 रद्द झालीच पाहिजे,तसेच NTA बरखास्त झालीच पाहिजे..
15/05/2026
NEET (UG) 2026 घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच NEET रद्द करून NTA बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आज दि.१५ मे २०२६ रोजी AISF नाशिक जिल्हाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, नाशिक मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
25/A, Meghdoot Shopping Centre, Opp District Court, Old CBS
Nashik
422002
Opening Hours
| Monday | 11am - 5pm |
| Tuesday | 11am - 5pm |
| Wednesday | 11am - 5pm |
| Thursday | 11am - 5pm |
| Friday | 11am - 5pm |
| Saturday | 11am - 5pm |
