Dipali Ganesh Gite

Dipali Ganesh Gite

Share

चेअरमन : दि. विजय अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नाशिक.
संचालक : सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक.
सचिव : स्व. हरि भाऊ गिते फाउंडेशन

26/02/2026

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....!

Photos from Dipali Ganesh Gite's post 05/02/2026

समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन
Icons of Excellence Awards 2026
या पुरस्काराने मला सन्मानित केल्या बद्दल दिव्य मराठी परिवाराचे मनःपूर्वक आभार. 🙏
हा सन्मान अभिमानाचा आहे,
पण त्याहून अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे .

सौ. दिपाली गणेश गिते
नगरसेविका, प्रभाग क्र. ०१
नाशिक महानगरपालिका, नाशिक

04/02/2026

कर्करोगाविषयी जागरूकता बाळगूया, जनजागृती वाढवूया आणि वेळेवर उपचारांना प्रोत्साहन देऊया.

जागतिक कर्करोग जागृती दिनानिमित्त कर्करोगमुक्त भारताचा संकल्प करूया.

सौ. दिपाली गणेश गिते
नगरसेविका, प्रभाग क्र. ०१
नाशिक महानगरपालिका, नाशिक

श्री. गणेश बबनराव गिते
मा. सभापती, स्थायी समिती
नाशिक महानगरपालिका, नाशिक

04/02/2026

नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

सौ. दिपाली गणेश गिते
नगरसेविका, प्रभाग क्र ०१
नाशिक महानगरपालिका, नाशिक

श्री. गणेश बबनराव गिते
मा. सभापती, स्थायी समिती
नाशिक महानगरपालिका, नाशिक

02/02/2026

जेव्हा एखादी आई आपल्या मुलाचे संगोपन करते, तेव्हा त्याला काय हवे, काय नको हे तिला आधीच समजते. मुलाने सांगण्याआधीच ती त्याला देत असते तसेच महिला नगरसेवकांचे देखील आहे, महिला महापौरांचे देखील आहे, त्यांनी आपल्या जनतेला काय हवं, काय नको हे आधीच जाणून घ्यायला पाहिजे असाच माझा प्रयत्न आहे. मी माझ्या कामातून ते नक्कीच सर्वांना दाखवून देईल.

सौ दिपाली गणेश गिते
नगरसेविका - प्रभाग क्रमांक १, मनपा, नाशिक

ganesh.gite


02/02/2026

नगरसेविकेचं काम फक्त रस्ते, गटारी आणि साफसफाईपुरतं मर्यादित नसतं. आज आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत — तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्यावर खर्चिक टेस्ट्स सांगितल्या जातात, पण त्या सर्वांना परवडतीलच असं नाही. म्हणूनच नफा-तोटा न पाहता, सर्वसामान्यांसाठी माफक दरात वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. कारण जनतेचं आरोग्य मजबूत असेल, तरच समाज खऱ्या अर्थाने पुढे जाईल.

सौ दिपाली गणेश गीते
नगरसेविका - प्रभाग क्रमांक १

.ganesh.gite


02/02/2026

कुंभमेळ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी. तो केवळ श्रद्धेचा मेळा नाही, तर संधींचा मोठा मंच आहे. नाशिकच्या महिला आणि तरुणांसाठी हा कुंभमेळा म्हणजे नव्या कल्पनांचा, नव्या उद्योगांचा आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग. भाविकांच्या गरजा ओळखून त्यातून स्थानिक व्यवसाय उभे राहावेत, स्टार्टअप्सना चालना मिळावी — यातूनच सर्वसामान्यांना सक्षम करण्याची खरी संधी आहे. विकास म्हणजे केवळ सुविधा नाही, तर प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी देणं.

सौ दिपाली गणेश गिते
नगरसेविका - प्रभाग क्रमांक १

.ganesh.gite


01/02/2026

नाशिकचं हवामान, नाशिकची हिरवळ — हीच आपल्या शहराची खरी ओळख. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर झाडं लावणं ही गरज आहे, पर्याय नाही. हिरवागार नाशिकसाठी आज घेतलेला प्रत्येक निर्णय उद्या आपल्या पुढच्या पिढीसाठी श्वास घेण्याची जागा तयार करतो. पंचवटी पुन्हा हिरवागार व्हावी, नाशिकचं नैसर्गिक सौंदर्य जपावं — यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सौ दिपाली गणेश गिते
नगरसेविका - प्रभाग क्रमांक १


01/02/2026

नाशिकमध्ये एक, दोन नव्हे तीन महिला आमदार आहेत. नाशिक महापालिकेतही आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त महिला आहेत आणि यावेळी 67 पेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे नाशिकचे संगोपन आता महिला करणार आहे. महिला म्हणजे मातृत्व… आम्ही सर्व महिला मिळून या शहराचे मातृत्व स्वीकारत आहोत…

दिपाली गणेश गिते
नगरसेविका, प्रभाग क्र.०१
नाशिक महानगरपालिका
चेअरमनः दि विजय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नाशिक


01/02/2026

प्रभाग एकचा आवाज… आता करणार संपूर्ण नाशिकच नेतृत्व.!

सौ दिपाली गणेश गीते - नगरसेविका, प्रभाग क्रमांक 1, नाशिक

#नाशिक #नाशिकमहानगरपालिका #दीपालीगीते #गणेशगीते

Want your business to be the top-listed Government Service?

Website