NCP SP - Navi Mumbai

NCP SP - Navi Mumbai

Share

Politics - Thoughts of our Leader Shri. Sharad Pawar Saheb. NCP

16/04/2026

महिला जिल्हाध्यक्ष पदासाठी सूचना

आदरणीय प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे साहेब व आदरणीय महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रोहीणीताई खडसे यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार,नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष या पदासाठी इच्छुक असलेल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, त्यांनी आपले अर्ज खालील विहित नमुन्यानुसार माझे ॲाफीस नं ५, तळमजला, नीलकंठ कॅार्नर,सेक्टर २, सानपाडा,नवी मुंबई सादर करावेत.

सदर अर्ज मंगळवार दिनांक २२/०४/२६ पर्यंत माझ्या वरील जनसंपर्क कार्यालयात, सीलबंद स्वरूपात श्री. अक्षय बोराडे यांच्याकडे जमा करावेत.

अर्जामध्ये खालील माहिती नमूद करावी:

1. अर्जदाराचे पूर्ण नाव
2. शैक्षणिक आहर्ता
3. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किती वर्षांपासून कार्यरत आहेत
4. सध्या व पूर्वीची पदे (असल्यास)
5. लढवलेल्या निवडणुकांचा तपशील
6. महिला जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर संघटन बांधणीसाठी काय काम करणार याबाबत सुमारे १०० ओळींचे विवेचन

सर्व इच्छुकांनी वरीलप्रमाणे अर्ज वेळेत सादर करावेत.

आपला,

डॉ. मंगेश आमले
जिल्हाध्यक्ष

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Jayant Patil - जयंत पाटील Rohit Rajendra Pawar Adv Rohini Eknathrao Khadse Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले

Photos from NCP SP - Navi Mumbai's post 07/04/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे ‘आगरी-कोळी समाज सेल’ची स्थापना; सीए निलेश पाटील साहेब यांची राज्यप्रमुखपदी नियुक्ती. आपल्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ‘आगरी व कोळी समाज सेल - महाराष्ट्र प्रदेश’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या नव्या सेलच्या राज्यप्रमुखपदी नवी मुंबईतील ‘आगरी कोळी युथ फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष सीए निलेश मिनाक्षी ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमवारी (६ एप्रिल) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते निलेश पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण पट्ट्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला गेल्या काही दशकांत अनेक प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. या प्रकल्पग्रस्त समाजाचे शैक्षणिक, रोजगाराचे आणि शासकीय स्तरावरील प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी या विशेष सेलची स्थापना करण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेल्या सीए निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या समस्यांना वाचा फोडली जाईल आणि शासन स्तरावर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Jayant Patil - जयंत पाटील Rohit Rajendra Pawar

22/02/2026

प्रदेशाध्यक्ष व आ.शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील पक्षाच्या व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व सहकाऱ्यांना काही जिल्हा किंवा शासकीय स्तरावर कोणत्याही अडचणी आल्यास,प्रश्न प्रलंबित असल्यास थेट प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयीन व्यवस्थेशी संपर्क साधा आपला प्रश्न आपला आर्जव अनुत्तरित राहणार नाही ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.!!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Tejas Phanse

21/02/2026

आढावा बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी व सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक, प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून सदर बैठकीस सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, ही विनंती.

दिनांक : सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६

वेळ : सायंकाळी ६.०० वाजता

स्थळ : केमिस्ट भवन, सानपाडा,नवी मुंबई.

आपला,

डॉ. मंगेश आमले
जिल्हाध्यक्ष

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Jayant Patil - जयंत पाटील Rohit Rajendra Pawar Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले

02/02/2026

सर्वपक्षीय शोकसभा,वाशी,नवी मुंबई.

आज छत्रपती शिवाजी महाराज चौक,वाशी येथील स्वर्गीय अजित दादांच्या सर्वपक्षीय शोकसभेस उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

01/02/2026

राजकारण लय वंगाळ हाय - अजित अनंतराव पवार !'

Photos from Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले's post 31/01/2026
31/01/2026

सर्वपक्षीय शोकसभा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेस आपण उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

दिनांक: शनिवार, ३१ जानेवारी २०२६

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: केमिस्ट भवन, सानपाडा, नवी मुंबई

डॉ. मंगेश आमले
जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Jayant Patil - जयंत पाटील Rohit Rajendra Pawar Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले

31/01/2026

सर्वपक्षीय शोकसभा

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकनेते स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेस आपण उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.

दिनांक: रविवार , 1 फेब्रुवारी २०२६

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी नवी मुंबई

शोकाकुल :नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबई.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Shashikant Shinde Rohit Rajendra Pawar Jayant Patil - जयंत पाटील Dr Mangesh Amale - डॉ मंगेश आमले

28/01/2026

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. प्रत्येक माणसाच्या प्रश्नांसाठी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहणारा नेता आज आपल्यातून निघून गेला, ही राज्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेला, कणखर आणि जनहितासाठी सतत कार्यरत असलेला नेता गमावला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे. त्यांचे कार्य आणि योगदान महाराष्ट्राच्या पटलावर कायम राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐🙏🏻

28/01/2026

निशब्द...!

असा नेता होणे नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐

Ajit Pawar

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Vashi
Navi Mumbai (New Mumbai)
400703

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm