BJP 4 Navi Mumbai

BJP 4 Navi Mumbai

Share

Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ

Official page of Bharatiya Janata Party – Navi Mumbai Sanghatan District. Working towards public service, development, and organizational unity under the vision of Nation First, Party Next, Self Last.

03/06/2026

LIVE - महायुतीची पत्रकार परिषद - ३ जून २०२६ - गरवारे क्लब, चर्चगेट,मुंबई !

03/06/2026

सामान्य माणसाचा नेता, कार्यकर्त्यांचा आधार आणि गुन्हेगारीविरोधातील बुलंद आवाज !


#गोपीनाथ_मुंडे

02/06/2026

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या सन्मान, स्वावलंबन आणि आत्मविश्वासाची नवी दिशा आहे.

या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची ताकद मिळाली असून, १ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प महिला सक्षमीकरणाला नवी उंची देणारा आहे.

महिलांचा सन्मान, स्वावलंबनाचा मार्ग आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प!



01/06/2026

मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली. भरपूर पाणी प्या, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या असे सांगत नागरिकांना विविध प्रांतातील उन्हाळी पेय यांचे महत्त्व सांगितले व उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन केले..





[ Mann Ki Baat, Narendra Modi, PM Modi, BJP4Maharashtra ]

01/06/2026

मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत!

​'निंबोणीच्या झाडामागे...', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर' आणि 'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात' यांसारखी एकापेक्षा एक अजरामर गाणी ज्यांच्या सुमधुर आवाजाने सजली, त्या अजरामर पार्श्वगायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

​मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही. मराठी व हिंदीसोबतच बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.

ज्येष्ठ नागरिकांपासून ते आजच्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने रेंगाळतात.

​त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.

​भावपूर्ण श्रद्धांजली!

31/05/2026

राजकारण, धर्मकारण आणि राज्य व्यवस्थापनात अमीट ठसा उमटावणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीस त्रिवार अभिनंदन!



27/05/2026

पत्रांपासून डिजिटल सेवांपर्यंत 'इंडिया पोस्ट' आज नव्या भारताच्या विकासयात्रेचा आधार बनले आहे. जनतेपर्यंत पोहचलेला थेट लाभ देशात विश्वासाचे जाळे विणतोय..


27/05/2026

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय श्री. नितीन गडकरीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या व्हिजनमधून देशातील राष्ट्रीय महामार्गांचा खऱ्या अर्थाने कायापालट होत आहे.

आपल्या दूरदर्शी मार्गदर्शन आणि खंबीर पाठबळाच्या आधारेच आजवरची राजकीय आणि सामाजिक वाटचाल करू शकलो. आपला हा जिव्हाळ्याचा स्नेहबंध निरंतर वाढत राहो.

प्रभू श्रीरामांच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत, तसेच जनसेवेच्या मार्गावरील आपली ही वाटचाल सदैव सुरु राहो, हीच सदिच्छा !

[ Nitin Gadkari, Happy Birthday, BJP National Leader, BJP Parivar, BJP4India ]


Nitin Gadkari

Want your business to be the top-listed Government Service in Navi Mumbai (New Mumbai)?

Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Navi Mumbai (New Mumbai)