Samyak Economics

Samyak Economics

Share

Our aim is to provide Education to people for social reform and create awareness to society about Economics, Finance, taxation.

Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.
या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "सम्यक" सम्यक चा उपक्रम " FocusEconomics.com"

Photos 20/05/2020

Covid19 या रोगापासून संसर्ग टाळण्यासाठी आपल्या अपार्टमेंटमध्ये, दवाखान्यात, दुकानात, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस ने बनवलेल्या सॅनिटीझर स्टँड चा उपयोग करा.

संपर्क- अजय शिंदें 9833859985

Dispenser
Prevention

Photos 23/03/2020

I am safe from Corona because I am at Home.

What about you?

05/09/2019

शिक्षक कभी साधारण नही होता, निर्माण और प्रलय हमेशा उसकी गोद में खेलते हैं ।

कोहिनूर मशहूर है – MH +ve 22/08/2019

#नेशन_फर्स्ट


कोहिनूर मशहूर है

सध्या देशाचे वातावरण एका वेगळ्या विषयामुळे तापले आहे. राजकारण्यांना पाठवण्यात येणाऱ्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या नोटिसेस हा तो विषय.भारताचे माजी अर्थ/गृहमंत्री पी. चिदंबरम याचे प्रकरण अगदी ताजेच आहे.महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ईडीने नोटीसेस पाठवल्या आहेत.त्यामुळे खूप मोठा गदारोळ उठला आहे.विशेषतः राज यांना नोटीस बजावली आहे म्हणून.आज हजर होण्यास सांगितले आहे.

राजकीय सूडबुद्धीने या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत असे मनसेचे म्हणणे आहे. आणि त्याला मोदी विरोधक मीडिया एकमुखाने दुजोरा देत आहे.अशाच प्रकारच्या भावना मोदीविरोधक सोशल मीडियावरही व्यक्त करत आहेत.काही जण तर टोकाला जाऊन यामागे युतीचे अंतर्गत राजकारण आहे असेही म्हणत आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी दहा सभा घेऊन मोदी सरकारवर तुफान टीका केली होती. त्याचा बदला म्हणून मोदी सरकार राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून छळत आहे असे त्यांचे सर्वसाधारणपणे म्हणणे आहे.या चौकशीचा राजकीय अन्वयार्थ काय ? खरोखरच राजकीय सूड आहे का ? कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार ? यामध्ये न पडता खरी परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊ..

इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ( IL&FS) ही वित्तीय क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे.या कंपनीच्या कारभारात फार मोठे घोटाळे झाले आहेत. ज्या ज्या कोणाचे या कंपनीशी व्यवहार होते त्यापैकी अनेकांना ईडीने चौकशी साठी बोलावले आहे आणि भविष्यात बोलावतील. राज ठाकरे यांना अशाच एका व्यवहारासंबंधी नोटीस आली आहे.

दादर पश्चिमेला असलेली कोहिनूर मिल विकत घेण्याचा सौदा काही वर्षांपूर्वी झाला.४२१ कोटी रुपयांच्या हा सौदा करण्यासाठी कोहिनूर डेव्हलपर्स ग्रुपचे उन्मेश जोशी, मातोश्री ग्रुपचे राज ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी राजन शिरोडकर या तिघांनी "कोहिनूर सिटीएनएल" या नावाची एक जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापन केली.IL&FS ने सुरवातीला यासाठी २२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले.

काही दिवसांनंतर म्हणजे २००८ साली IL&FS ने कंपनीने सगळे कर्ज फक्त ९० कोटी रुपयांत सेटल करून टाकले.याचा दुसरा अर्थ कंपनीने १३५ कोटी रुपयांचा मोठा तोटा सहन केला.

सर्वसाधारणपणे ज्यावेळी व्यवहारात एकाला तोटा होतो त्यावेळी दुसऱ्याला फायदा होत असतो.जर IL&FS ला तोटा झाला तर फायदा कोणाला झाला ?

नेमके यानंतर काही दिवसांतच राज ठाकरे यांनी कोहिनूर सिटीएनएल आपला हिस्सा विकून टाकला आणि ते बाजूला झाले.इथपर्यंतच राज यांचा संबंध या प्रकरणात आहे. वरील सर्व गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारचा कल्पनाविलास नाहीये.

या १३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करण्याच्या व्यवहारात काही पैशांची अवैध अफरातफर (मनी लॉंडरिंग) आहे की नाही किंवा ते कर्ज देताना अशा काय त्रुटी होत्या ज्यामुळे IL&FS ला कर्जरकमेच्या ६०% तोटा सहन करावा लागला.कारण ६०% तोटा ज्याला "हेअर कट" असे म्हणतात हे परसेंटेज खूप मोठे आहे.

राज बाजूला झाल्यानंतर सुद्धा या कंपनीने वित्तपुरवठा करणे थांबवले नाही. ऐकून केलेला वित्तपुरवठा ८६० कोटी रुपये इतका आहे.

हे प्रकरण २००८ चे आहे मग नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का बाहेर आले ?

IL&FS या कंपनीत मोठे घोटाळे झाले असावेत असे गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये उघडकीस आले.कंपनीवर तब्बल ९१००० कोटी रुपयांची कर्जे आहेत. कंपनी ने दिलेल्या कर्जांपैकी किती वसूल होतील याबाबत शंका आहे. कंपनीच्या व्यवहारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर झाली आहे असा संशय आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षाअखेर दिलेल्या रिपोर्टमध्ये या कंपनीविरुद्ध कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कंपनीने दिलेल्या कर्जांपैकी किती कर्जे बुडीत आहेत याची खरी माहिती ताळेबंदात दिली नाही असा गंभीर आरोप या कंपनीवर आहे. कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करून केंद्र सरकारने कारभार ताब्यात घेतला आहे. डायरेक्टर्स, ऑडिटर्स,वरिष्ठ कर्मचारी आणि कंपनींकडून कर्ज घेतलेले सर्वजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ईडीने या कंपनीविरुद्ध पहिली चार्जशीट फक्त ५ दिवसांपूर्वी म्हणजे १७ ऑगस्टला फाईल केली आहे आणि कंपनीच्या ५७० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

कर्ज जरी जुने असले तरी 'प्रकरण" नवे आहे इतकेच लक्षात असूदे.उन्मेश जोशी आणि राज ठाकरे या दोघांना ईडीने जे समन्स बजावले आहे ते या कंपनीचा गैरव्यवहारातून उद्भवलेल्या चौकशीच्या अनुषंगाने आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही.अशी चौकशी सगळ्यांची होत आहे.

"जर कोणताही गैरव्यवहार केला नसेल तर कुणालाही घाबरून जायचे कारण नाही" ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अगदी योग्य आहे.

माझ्या मते राज यांचा या प्रकरणाशी संबंध खूप मर्यादित स्वरूपाचा आहे. गैरव्यवहार नसेल तर त्यांना काहीही होणार नाही. ते सहीसलामत बाहेर पडतील.परंतु या चौकशीचा राजकीय इशू जर करण्यात आला तर मात्र त्याची परिमाणे वेगळी असतील,परिणाम वेगळे असतील.राज यांना त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे.

पन्नास वर्षांपूर्वी विविध भारतीवर याच कोहिनूर मिल्सचा एक रेडिओ प्रोग्राम विविधभारती वर लागायचा. त्याच्या जिंगलची थीम आज आठवली...

कोहिनूर मशहूर है..

वरील लेख www.mhpositive या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे.
त्याची लिंक: http://bit.ly/2L5ilcq

आनंद विश्वनाथन

कोहिनूर मशहूर है – MH +ve राजकीय सूडबुद्धीने या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत असे मनसेचे म्हणणे आहे. आणि त्याला मोदी विरोधक मीडिया एकमुखाने द...

05/08/2019

👉🏼 पहला फ़ैसला
जम्मू कश्मीर से अनुच्छेद ३७० हटाया गया

👉🏼 दूसरा फ़ैसला
जम्मू कश्मीर से 35A हटाया गया

👉🏼 तीसरा फ़ैसला
जम्मू कश्मीर का २ हिस्सों में बंटवारा

👉🏼 चौथा फ़ैसला
जम्मू कश्मीर अब केंद्र शासित प्रदेश

👉🏼 पांचवा फैसला
लद्दाख बिना विधानसभा का केंद्र शासित प्रदेश

मोदी सरकार के कश्मीर विषयक इन सभी फ़ैसलों का हृदयपूर्वक स्वागत

👉🏼 पहला फ़ैसला
जम्मू कश्मीर से अनुच्छेद ३७० हटाया गया

👉🏼 दूसरा फ़ैसला
जम्मू कश्मीर से 35A हटाया गया

👉🏼 तीसरा फ़ैसला
जम्मू कश्मीर का २ हिस्सों में बंटवारा

👉🏼 चौथा फ़ैसला
जम्मू कश्मीर अब केंद्र शासित प्रदेश

👉🏼 पांचवा फैसला
लद्दाख बिना विधानसभा का केंद्र शासित प्रदेश

मोदी सरकार के कश्मीर विषयक इन सभी फ़ैसलों का हृदयपूर्वक स्वागत!

BUSINESS MITRA MANAGEMENT CONSULTANCY PVT LTD on Google 05/06/2019

Income Tax Return
Filing of income tax provides proof for your income as legal and disclosed. It helps you in many ways such as getting refunds, applying for loans, applying for tenders, startup funding etc.

BUSINESS MITRA MANAGEMENT CONSULTANCY PVT LTD on Google Filing of income tax provides proof for your income as legal and disclosed. It helps you in many ways such as getting refunds, applying for loans, applying for tenders, startup funding etc. Filing of the income tax returns (ITR) is a statement of your income across different sources, tax liabilities...

Who is required to file income tax return? 24/05/2019

Who is required to file income tax return?
Click on Following Link...

Who is required to file income tax return? Who is required to file income tax return? Filing of income tax provides proof for your income as legal and disclosed. It helps you i...

17/10/2018

" अर्थार्जनाकडे लक्ष द्या ! "
( कारण सगळी सोंगं करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही.)

नमस्कार मित्रांनो ! उद्याच्या दसऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा !! आम्ही नेहमीच म्हणतो, "दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा !" यावर आता थोडं व्यावहारिक बोलूयात. आनंदाच्या तत्त्वज्ञानावर जगभरात आणि आमच्याकडेही खूप लिहिलं, बोललं व दाखवलं जातं. "आनंद मानण्यावर असतं" हे अर्धसत्य आहे. स्वतःजवळ "किमान" धनही नसताना सातत्याने आनंद मानत रहाणं अवघड असतं. या आनंदी मानसिकतेसोबत आम्ही आमचं अर्थार्जनही वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान", हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पर्याप्त अर्थार्जनाला पर्याय हा नसतोच. आता "पर्याप्त" म्हणजे किती, हे प्रत्येकाने आपापल्या विवेकानुसार ठरवावे, अन्यथा कुत्तरओढ होते !
आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे लोक व त्यांचे समाज अर्थार्जनासाठी कायकाय करतात हे भावना बाजूला ठेवून तार्किकद्रुष्ट्या पहा. दसऱ्याच्या निमित्ताने अर्थार्जनासाठी पाच महत्वाच्या गोष्टी इथे नमूद करू इच्छितो. पटल्या तर घ्या नाहीतर सोडून द्या!---

१. अस्मिता जपणे आणि आपापले सांस्कृतिक कार्यक्रम करणे, हे महत्वाचे आहेच. पण या गोष्टींसाठी स्वतःच्या वेळेचं, श्रमाचं आणि पैशांचं बजेट ठरवा. अर्थार्जनासाठी कुवत आणि वेळ लागतो. लक्षात ठेवा, सांस्कृतिक वा राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणांचे कार्यक्रम सुध्दा उद्योगपतींच्या पैशाशिवाय होत नाहीत. तेव्हा इतरांचे झेंडे उचलताना वा इतरांसाठी सतरंज्या टाकताना हे नेहमीच लक्षात ठेवा की "आपली आर्थिक औकात क्षीण होत नाहीय ना ? अर्थार्जनासाठी आपण आपली कुवत सुधारायला वेळ देतो आहोत ना ?" अस्मितांवर लढायला वा मरायला लावणारे स्वतःची आर्थिक तजवीज मात्र भक्कम करून ठेवत असतात.

२. अर्थार्जनासाठी भावनिक तडजोडी कराव्या लागतात. प्रसंगी अपमान गिळून पुढे जा. स्वाभिमानापायी तुटू नका. वाकण्याचं सोंग करून वेळ निभावून न्या. अर्थार्जनावर "फोकस" हवा. लढाई जिंकून तहात हरू नका. "Give & Take" ची लवचिकता ठेवा. व्रुथा अभिमानामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. पैसा नसताना फुकाचा अभिमान दाखविण्याची बाब ही या व्यावहारिक जगात हास्यास्पद ठरते व कुटुंबियांसाठी क्लेशदायी असते. छोट्या मतभेदांना मोठं करु नका. ग्राहक हुशार आहे आणि तुम्ही त्याचं ऐकायला उत्सुक आहात, असंच त्याला सातत्याने वाटलं पाहिजे.

३. अर्थार्जनावर फोकस ठेवताना श्रद्धांचा अतिरेक करू नका.अंधश्रद्धांना निष्ठूरपणे टाळा. अंधश्रद्धांचाही अंतिमतः व्यापारच केला जातो. आर्थिक व्यवहार करताना "उपयोगिता" बघा. यासाठी मन टाळा, मेंदू वापरा. श्रद्धांसाठी देणगी देताना अतिरेक न करता आपल्या मुलांचं भवितव्य डोळ्यांसमोर आणा. लक्षात ठेवा, धनिक लोक धार्मिक वा अध्यात्मिक प्रक्रियांना एका मर्यादेतच वेळ देतात. (किंबहुना धनाचा वापर करीत ही मंडळी स्वतःसाठी अध्यात्मिक प्रक्रिया कंत्राटाने राबवून घेतात !) क्षणिक मिरवण्यासाठी देणगी देण्याबाबतीत धनाढ्यांशी स्पर्धा करू नका. स्वर्ग इथेच आहे, तो इथेच शोधा वा निर्माण करा !

४. अर्थार्जनासाठी आपल्या मतलबावर लक्ष ठेवा. आपली संधी कुणी हिरावून घेता कामा नये. प्रत्येक नव्या संधीकडे सजगपणे, धाडसाने, संयमितपणे व हिशोबीपणे पहा. स्वतःकडील शंभर रूपयांपैकी अधिकाधिक दहा ते पंधरा रुपयांचा धाडसासाठी उपयोग करा. आपल्या गाठीशी पुरेसे पैसे असलेच पाहिजेत. संयम बाळगा. कुणी हरभऱ्याच्या झाडावर चढवतय म्हणून प्रचंड धोका पत्करण्याचा वेडेपणा करू नका. आश्वासनांना, आमिषांना बळी पडू नका. कोणताही आर्थिक व्यवहार करताना भरपूर प्रश्न विचारा, शंकांचं निरसन करून घ्या. एवढं करूनही व्यवहार करायचा नसेल तर संकोच न करता, न घाबरता सरळ नाही म्हणा. अस्थायी चांगुलपणा दाखवून नुकसान स्विकारु नका. लोक म्हणतील, "काय निर्लज्ज माणूस आहे". लोकांना बोलू द्यात. ते बोलतच रहातात. तुम्ही अर्थार्जनाकडेच लक्ष द्या. स्वतःच्या सेवेचं, कौशल्याचं, वस्तूचं मूल्य ओळखा. गंडवणारे खूप असतात. बाजाराचा अभ्यास करा आणि आपली किंमत ठणकावून वसूल करा.

५. कोणाच्याही संपत्तीने दिपून जाऊ नका. तुम्ही तुमच्या गरजांचा, जीवनपध्दतीचा आणि संयुक्तिक अर्थार्जनाचा विचार करा. एखादा खूप श्रीमंत असतो म्हणजे तो आपल्यापेक्षा जास्त हुशार, कर्तृत्ववान असतो; ही न्यूनगंडाची भावना दूर सारा. तुम्ही "तुम्ही" आहात. मी बरेच उद्योगपती सातत्याने अस्वस्थ राहिलेले पाहिले आहेत. अर्थात ह्यांच्या अस्वस्थपणाची बहुतेक कारणे ही "आ बैल, मुझे मार" सारखी असतात. अशा निरूपयोगी श्रीमंतांकडे न पाहता स्वतःचा उत्तम मित्रपरिवार बनवा. हे मित्र जिवाभावाचे असावेत जे अडचणीत आर्थिक मदत करतील वा मानसिक आधार देतील. सतराशेसाठ मित्र सांभाळण्यासाठी खूप वेळ व ऊर्जा खर्च करावी लागेल. मग अर्थार्जन केव्हा करणार ?

चला, ग्यान खूप झालं. गरिबांचं सक्रीय समर्थन करा, गरिबीचं नाही. मित्रांनो, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. थांबतो इथे. माझं अर्थार्जन आता बोलवतय मला !

------- डॉ. गिरीश जाखोटिया.

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


SS 2, OFFICE NO 10, SECTOR 3, KOPAR KHIARANE
Navi Mumbai
400706