06/04/2021
अनिल देशमुख यांचा राजीनामा..
देवेंद्र फडणवीस to सुप्रिया सुळे
ते बघ बाजूला टोपी घालून उभे आहेत ते आता घरी बसतील.. समजले ना एकटे देवेंद्र फडणवीस काय करतील.. विचारशील का असं अता परत कधी..😂
आणि जयंत रावांना सांग मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो..🤣🤣
14/11/2020
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची मध्यप्रदेश भाजपाच्या सहप्रभारी म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
Pankaja Gopinath Munde
Dr Pritam Gopinath Munde
BJP Maharashtra
01/09/2020
अनंत चतुर्दशी च्या सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा..!
01/08/2020
#नाम_तो_सुना_ही_होगा_शिंदे_सरकार
01/08/2020
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे . दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे दूध खरेदीचा दर १५ ते २० रुपये लिटर प्रमाणे शेतकऱ्यांना मिळत आहे . तर शहरी भागातील ग्राहकांना तेच दूध ५० ते ६० रुपये दराप्रमाणे विक्री केली जात आहे. यातील तफावतीवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे मात्र या फरकाचा मलिदा शासकीय खुर्चीवर बसलेले आणि शासनाचे घटक असलेले पांढरपेशे पुढारी लाटताना दिसत आहेत. सरकारने यामध्ये लक्ष देऊन दूधला सरसकट दहा रुपये अनुदान व निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान व दुध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करावा. यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
कोरोना संक्रमण रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. हातावर पोट असलेल्या कामगारांचा प्रश्न गंभीर होत चाललाय, पोलिस,आरोग्य कर्मचारी डॉक्टर ही असुरक्षित वाटत आहेत. लोकांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. जनतेला आवश्यक गोष्टींचा पुरवठा होत नाही.
शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दिसेनासे झालेत. शेतकरी कर्जमाफीतुन शेतकर्यांची फसवणूक झाली आहे . अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पिके जळू लागली आहेत. तर काही ठिकाणी पाण्यावाचून जळत आहेत. खतांचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. रासायनिक खताच्या दुकानासमोर रांगाच्या रांगा लागत आहेत. "सोशल डिस्टंसिंग" ची रोज वाट लागत आहे . कुठलाही ठोस निर्णय घेताना प्रशासन दिसत नाही. सामन्यांना दिलासा देणारी एक ही योजना सरकार कडून येत नाही. प्रशासनावर कोणाची पकड आहे हे समजत नाही अस्थिरता आराजगता अविश्वासाचा वातावरण तयार झालेला आहे . विज बिल प्रश्न मोठा गंभीर झाला आहे.फळबाग, ड्रीप ,कांदाचाळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही. शेतकरी कांद्याच्या भावा मुळे आत्महत्या करत आहेत. आत्महत्या नावाचा कलंक तालुक्याला लागत आहे .अनैतिकते मधून तयार झालेलं तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे सरकारमध्ये ही समन्वय नसल्याचे दिसतय . राज्याचा कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री हे घराबाहेर पडत नाहीत. मुख्यमंत्री मंत्र्यांना आवर घालू शकत नाहीत, तर मंत्री प्रशासनापुढे हतबल दिसून येत आहेत.असं हे दोन बायकांचा संसार असलेले सरकार कधी कोसळेल हेही सांगता येत नाही अशी एकंदरीत राज्याची परिस्थिती झालेली आहे .आणि यांमध्ये सर्वसामान्य शेतकरी मात्र भरडला जात आहे. रस्त्यावरती दगडाची मूर्ती ठेवून दुग्धाभिषेक घालण्यात आला. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करावा व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी तर्फे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
23/07/2020
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच', असं ब्रिटिश राजवटीला ठणकावून सांगणारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक परिवर्तनासाठी झटणारे लेखक, तत्वज्ञ, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
31/05/2020
कुशल प्रशासक म्हणून इतिहास ज्यांना ओळखतो अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
10/05/2020
"आपले अस्तित्व घडवणारी सर्वप्रथम गुरू म्हणजे आपली आई"
आतंरराष्ट्रीय मातृ दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
19/03/2020
क्रुपया सर्वांना एक विनंती आहे की पूर्ण पणे खरेदी करून घ्या ......उद्या पासुन सर्व शहरे बंद राहणार आहेत ....