📣 उद्योग आधार आता होणार बंद
📣 सर्वांना पुन्हा करावी लागणार MSME ला आपल्या व्यवसायांची नोंदणी
📣 MSME कडुन उद्योग आधार ऐवजी मिळणार उद्यम प्रमाणपत्र
📣 MSME च्या योजनांचा लाभ घेण्याकरिता यापुढे आवश्यक असेल उद्यम प्रमाणपत्र
🔹 सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाच्या आदेशानुसार उद्योजक आणि व्यावसायिकांनी MSME ला नोंदणी करण्याची प्रक्रिया ही ०१ जुलै, २०२० पासुन बदललेली असुन यापुढे MSME कडुन उद्योजकांना नोंदणी केल्यानंतर उद्यम नोंदणी प्रमाणपत्र (UDYAM REGISTRATION CERTIFICATE) मिळेल तसेच उद्योग आधार च्या जागी उद्यम प्रमाणपत्र मिळवावे लागेल.
🔹 यापुर्वी दिले जाणारे उद्योग आधार हे यापुढे ग्राह्य धरल्या जाणार नसुन ज्यांच्या जवळ उद्योग आधार आहेत त्यांनी पुन्हा आपली नोंदणी MSME ला करून नवीन प्रमाणपत्र अर्थात उद्यम नोंदणी प्रमाणपत्र तयार करणे आवश्यक आहे.
🔹 MSME कडुन मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याकरिता उद्योग आधार ऐवजी उद्यम नोंदणी प्रमाणपत्राची असेल यापुढे आवश्यकता.
🔹 एमएसएमई नोंदणीच्या नव्या प्रक्रियेला पूर्वनिर्धारित योजनेनुसार 1 जुलै 2020 पासून उद्यम रजिस्ट्रेशन या नावाने सुरुवात
🔹 केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाने यापूर्वीच 26 जून 2020 च्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्यानुसार 1 जुलै 2020 पासून उद्योगांचे वर्गीकरण आणि नोंदणी यासाठी नवी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत एखादा उद्योग उद्यम म्हणून ओळखला जाईल आणि त्याच्या नोंदणी प्रक्रियेला उद्यम रजिस्ट्रेशन म्हटले जाईल.
🔹 या प्रक्रियेची अधिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
🎯 एमएसएमई नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, कागदविरहित आणि स्वयं-घोषणेवर आधारित असेल. एखाद्या एमएसएमईच्या नोंदणीसाठी कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे जोडण्याची आवश्यकता नाही.
🎯 नोंदणीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता आहे; नोंदणीनंतर एक नोंदणी क्रमांक दिला जाईल
🎯 नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक उद्यम नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल;
🎯 या प्रमाणपत्रावर एक डायनॅमिक क्यूआर कोड असेल ज्याच्या द्वारे आमच्या पोर्टलवरील वेबपेज आणि उद्योगाच्या तपशीलाची माहिती मिळवता येईल;
🎯 नोंदणीचे नूतनीकरण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही;
🎯 गुंतवणूक आणि उद्योगांची उलाढाल, पॅन आणि जीएसटीशी संबंधित तपशील आपोआप संबंधित सरकारी यंत्रणेकडून घेतला जाईल;
🎯 एमएसएमई मंत्रालयाची ऑनलाईन प्रणाली प्राप्तिकर आणि जीएसटी इन प्रणालीशी पूर्णपणे एकात्मिक असेल
🎯 ज्यांच्याकडे ईएम-II किंवा यूएएम नोंदणी किंवा एमएसएमई मंत्रालयांतर्गत, असलेल्या इतर प्राधिकरणाने जारी केलेली इतर प्रकारची नोंदणी असेल त्यांना स्वतःची नव्याने नोंदणी करावी लागेल;कोणत्याही उद्योगाने एकापेक्षा जास्त उद्यम नोंदणी करू नये. मात्र, उत्पादन किंवा सेवा किंवा दोहोंसहित कितीही व्यवहारांची माहिती एकाच नोंदणीमध्ये विशेषत्वाने नमूद करता येईल किंवा भर घालता येईल.
📣 वरील झालेल्या बदलांविषयी अधिक तसेच सविस्तर माहिती मिळविण्यासाठी तसेच उद्योग आधार ऐवजी नवीन उद्यम प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संपर्क करावा
अधिक माहितीकरिता 8879458104 नंबर वरती संपर्क करा किव्हा खालील लिंक वर क्लिक करा
https://wa.me/918879458104