29/03/2026
*▪️पोहरादेवी येथे राष्ट्रीय बंजारा साहित्य परिषदेचे संमेलन उत्साहात संपन्न..*
*—————————————————*
*“धर्मसत्ता आणि साहित्यसत्ता भक्कम असेल, तर राजसत्तेचा मार्ग आपोआप सुकर होतो.” - किसनभाऊ राठोड*
*—————————————————*
*पोहरादेवी, ता. मानोरा (जि. वाशीम) :* २५ मार्च -
संपूर्ण भारतातील गोर बंजारा समाजाची ‘काशी’ म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यात्रेनिमित्त गोर बंजारा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. तीर्थक्षेत्र भक्तिधाम येथील भव्य सभामंडपात संपन्न झालेल्या या संमेलनास विविध नामवंत साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती लाभली. ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ झालेल्या या साहित्य संमेलनात पारंपरिकतेचा साज, सांस्कृतिक ऊर्जेची लय आणि साहित्यिक चर्चांच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष श्री. मोतीराम राठोड, उद्घाटक भगवंत सेवक किसनभाऊ राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण, प्रा. विलासभाऊ राठोड, प्राचार्य डॉ. गणपत राठोड तसेच विविध नामवंत गोर बंजारा लेखक, कवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. मोतीराम राठोड होते, तर प्रख्यात उद्योगपती व धर्मनेते किसनभाऊ राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले. स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष राठोड व प्राचार्य डॉ. गणपत राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. विलासभाऊ राठोड यांनी समन्वयक म्हणून कार्यक्रमाची सूत्रे यशस्वीपणे हाताळली. प्रास्ताविकातून त्यांनी परिषदेच्या उद्दिष्टांचा आढावा घेतला. स्वागताध्यक्षीय भाषणात डॉ. सुभाष राठोड यांनी गोर बंजारा इतिहासाचा परामर्श घेत समाजबांधवांनी आपल्या भाषा, साहित्य व संस्कृतीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले, तर प्राचार्य डॉ. गणपत राठोड यांनी समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करत एकजुटीची गरज अधोरेखित केली. तसेच गोर बंजारा समाजातील युवकांनी व्यसनापासून दूर राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करावी असे प्रतिपादन केले.
प्रारंभी साहित्यिकांचा सत्कार व विशेष गौरव सोहळा पार पडला. विविध मान्यवरांच्या भाषणांतून समाजाच्या वर्तमान परिस्थितीचे विश्लेषण करताना भविष्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मा. मोतीराम राठोड यांनी साध्या व ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करत नव्या पिढीने आपली भाषा, संस्कृती आणि लोकसाहित्य जतन करण्याचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी साहित्य, शिक्षण आणि संघटन या त्रिसूत्रीची गरज त्यांनी स्पष्टपणे मांडली. तसेच गोर बोलीतील काही रंजक बोधकथांचे दाखले देत त्यांनी आपल्या भाषणाला अधिक प्रभावी आणि रसपूर्ण बनवले.
या परिषदेत ‘जागतिकीकरणाच्या रेट्यात गोर बंजारा भाषा, संस्कृती आणि साहित्याचे जतन व संवर्धन’ तसेच ‘गोर बंजारा समाजाचे एस.टी. आरक्षण : पार्श्वभूमी, आवश्यकता आणि वर्तमान स्थिती’ या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्रे घेण्यात आली. प्राचार्य डॉ. गणपत राठोड, श्री. होमसिंग पवार, साप्ता. बंजारा पुकारचे संपादक श्री. अविनाश चव्हाण, नांदेड, प्रा. सुनिता राठोड, पुसद, कु. राजश्री आडे आदी वक्त्यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक जनजागृती, धोरणात्मक नियोजन आणि एकात्मिक संघटनाची गरज अधोरेखित केली. विशेषतः एस.टी. आरक्षण विषयक चर्चासत्रात कु. राजश्री आडे यांचे विचार लक्षवेधी ठरले.
चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवरांचा किसनभाऊ राठोड, संमेलनाध्यक्ष मोतीराम राठोड, स्वागताध्यक्ष डॉ. सुभाष राठोड व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे गोर बंजारा बोलीभाषेतील बहारदार कवी संमेलन होय. हिंगोलीचे कवी रतन आडे, बाबुलाल राठोड, प्रेमकिसन राठोड (पुणे), डॉ. शांतीलाल चव्हाण (पातूर), नागपूर येथील कवी उदलभाऊ राठोड तसेच सुरेशभाऊ राठोड (भिवापूर) यांनी आपल्या प्रभावी काव्यरचनांद्वारे समाजजीवन, संघर्ष आणि सांस्कृतिक अस्मिता जिवंत केली. पारंपरिक लोकगीते व लोकनृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकत लोकसंस्कृतीच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सुबक व प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रेमकिसन राठोड, श्री. मिथून राठोड यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. मिथून राठोड यांनी केले. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गोर बंजारा समाजातील साहित्यिक चळवळ, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.
एकंदरीत, या भव्य साहित्य संमेलनाने गोर बंजारा समाजातील साहित्य, भाषा आणि संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला नवे बळ दिले असून, सामाजिक ऐक्य व जागरूकतेचा प्रभावी संदेश दिला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून नव्या पिढीत सांस्कृतिक अभिमानाची जाणीव अधिक दृढ होऊन, शिक्षण, साहित्यनिर्मिती आणि सामाजिक प्रबोधनाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
03/08/2023
बंजारा समाजाचे विविध प्रश्न व मागण्या घेऊन ॲड.पंडित भाऊ राठोड यांनी घेतली कॅबिनेटमंत्री अतुल सावे यांची भेट..!
बंजारा समाजाचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. पंडित भाऊ राठोड यांनी समाजाचे वरिष्ठ नेते प्रा. पीटी चव्हाण सर उपस्थित राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यावरील विविध प्रश्न व मागण्या घेऊन आज राज्याचे गृहनिर्माण व बहुजन विकास कल्याण मंत्री अतुलजी सावे यांची भेट घेतली, या भेटीत पंडित भाऊ यांनी बंजारा समाजाच्या तांड्यावरील प्रश्नाबद्दल मंत्री महोदय यांना सविस्तर माहिती दिली, एकंदरीत विस्तृत चर्चेनंतर बंजारा समाजाचे प्रश्न व विविध मागण्या सोडवण्यासाठी माझ्या विभागाकडून सर्वतोपरी मदत मिळेल व जलद गतीने समाजाची कामे करून दिली जातील असा शब्द मंत्री महोदय यांनी पंडित भाऊंना दिला.
राज्यातील तांड्यावरील बंजारा बांधवांच्या रस्ते, वीज, पाणी, याविषयी कोणत्याही समस्या व अडी-अडचणी असल्यास त्या बंजारा बांधवांनी पंडित भाऊ यांच्याशी संपर्क साधावा असा आवाहन ॲड. पंडित भाऊ राठोड यांनी केल आहे.
धर्मनेता आदरणीय किसनभाऊ राठोड यांनी दिलेला नारा..
चलो गोर राज सत्ता की ओर...
राज सत्ते शिवाय विकास नाही..
बंजारा पाऊल पडतो पुढे...
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद Pandit Rathod
03/08/2023
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, यांनी कुश न्यूरॉलॉजी, व कॉर्डिलाजी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली...
भाजपा नेते ॲड.पंडितभाऊ राठोड यांच्या आग्रहास मान देऊन कार्यकर्त्याला बळ मिळावे म्हणून मा. बावनकुळे साहेबांनी भेट देऊन डॉ. कुणाल जाधव यांचे कौतुक केले. यावेळी मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, पुणे शहराचे मा. महापौर मुरलीधरजी मोहोळ, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री मा. विक्रांतजी पाटील साहेब यांचे सत्कार सन्मान करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण, प्रेमकिसन भाऊ राठोड, अमोल भाऊ पवार, रावसाहेब भाऊ चव्हाण, अनिलजी नाईक, गोर सज्जन राठोड, पत्रकार संदीप जाधव, संजयजी दिवार यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) Rashtriya Banjara Parishad Rashtriya Banjara Parishad Pandit Rathod Pandit Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद BJP Maharashtra Chandrashekhar Bawankule P T Chavan
03/08/2023
पूरग्रस्त बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी अलंक्रीतताई सरसावल्या; पूरग्रस्तांना केली आर्थिक मदत
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद Pandit Rathod Alankrit Kisanrao Rathod Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) Rashtriya Banjara Parishad Rashtriya Banjara Parishad Pandit Rathod P T Chavan
03/08/2023
निष्ठेला फळ आणि कार्यकर्त्याला बळ देणारा धर्म नेता गोर हृदयसम्राट मा.किशनभाऊ राठोड
🔥🔥🔥🏳️🔥🔥🔥
12 वर्ष सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष पदावर जाणारा निष्ठावंत नेता म्हणजे... मा.विलासभाऊ राठोड
🔥🔥🔥🏳️🔥🔥🔥
गोर बंजारा समाजामध्ये ज्याची एक वेगळी ओळख आहे 12 वर्ष ज्याने तन मन धनाने निष्ठेने संघटना प्रती व भाऊच्या आदेशाचे पालन करून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये कार्य केले.
त्यांची प्रामुख्याने समाजा प्रती असलेली तळमळ निष्ठा धडाडीने काम करणारा अनुभव आसलेला आणि भाऊच्या एक जवळचा कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजाचा मध्ये लोकप्रियता पाहून धर्मनेता गोर हृदयसम्राट किसनभाऊ राठोड यांनी गोर बंजारा समाजातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मा.विलासभाऊ राठोड यांची निवड करून निष्ठेचे फळ देले.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून कार्य करणारे नेते बंजारा समाजाला राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती होताच समाजा मध्ये व संघटनेमध्ये काम करणारे नेते कार्यकर्त्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. संघटनेच्या व नेते मंडळी कडून जागो जागी सन्मान सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या व समाजाच्या सर्व नेते मंडळी कार्यकर्ते यांची ताकत सोबत घेऊन मा.विलासभाऊ राठोड यांचा चेहरा राष्ट्रव्यापी नेता म्हणून वोळख देऊन लोकप्रियतेच्या उंच शिखरावर पोहोचवले ... संपूर्ण नेते कार्यकर्ते मजबुतीने कार्यक्षम बनवणारा नेता म्हणून धर्मनेता मा.किसनभाऊ राठोड यांचा समाजाला सार्थ अभिमान आहे.
एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करणारा नेता ते राष्ट्रीय अध्यक्ष पदी विराजमान करून गोर बंजारा तीर्थक्षेत्र सर्वोच्च स्थान धर्मपीठ भक्ती धाम, पोहरादेवी येथे भव्य दिव्य सन्मान सत्कार करून महंत गुरुवर्य समाज बांधवांनी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. एक सामान्य कार्यकर्ताच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सर्वोच्च सन्मान आसेल.. माणसाला खरो खरी जगण्याला काय लागतो.. जर आपण निष्ठावंत एक निष्ठ राहिलो तर फळ हे नक्की मिळतच आणि किशनभाऊच्या सारखा धर्मनेता आसला तर कार्यकर्त्याला हत्तीचे बळ हे निश्चित मिळतच...💪🏻🔥 आणि विलासभाऊ हे यातील एक उत्तम उदाहरण ... समाजामध्ये परिवर्तन घडून आणणारा अभ्यासु कार्यक्षम राष्ट्रीय पातळीवर समाजाला मा.विलासभाऊ राठोड यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात समाजाला ताकत मिळेल... समाजातील तळागाळातील लोकांच्या न्याय हक्क मिळून देण्यासाठी विलासभाऊ राठोड हे ताकतीने तन मन धनाने काम करतील याची खात्री व पूर्ण विश्वास आहे.
आपली राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तमाम समाज बांधवांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन..व शुभेच्छा !!🔥🌺🌺🏳️ गोर धर्म की जय, जय सेवालाल, जय हमुलाल
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद Alankrit Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) Rashtriya Banjara Parishad Rashtriya Banjara Parishad Pandit Rathod P T Chavan
30/07/2023
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद Pandit Rathod Alankrit Kisanrao Rathod गोर धर्म
30/07/2023
गोर बंजारा समाजाच्या वाडी-वस्ती तांड्यावरील मुलभूत प्रश्नांची जाण असलेले, व देशभरातील विविध राज्यात मोठा जनसंपर्क असलेले शांत, संयमी, अभ्यासू, आक्रमक व धाडसी नेतृत्व धर्मनेता किसनभाऊ राठोड यांचे विश्वासु प्रा. विलास भाऊ राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद या बंजारा समाजातील देशातील सर्वात मोठ्या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विलास भाऊ यांचे जागोजागी सत्कार समारंभ व जंगी स्वागत! विलास भाऊंच्या निवडी मुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण!
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली राष्ट्रीय बंजारा परिषद विदर्भ राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद Pandit Rathod Alankrit Kisanrao Rathod गोर धर्म
29/07/2023
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली Kisanrao Rathod Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad )
राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली Alankrit Kisanrao Rathod Rashtriya Banjara Parishad Rashtriya Banjara Parishad
28/07/2023
गोर बंजारा समाजातील देशातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रा. विलासभाऊ राठोड यांची निवड झाल्याने देशभरातील विविध राज्यातील बंजारा बांधवांना त्यांचं अभिनंदन केलं
Kisanrao Rathod. राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली Kisanrao Rathod Kisanrao Rathod राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद (Rashtriya Banjara Parishad ) राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषद सांगली