Prasad Ghorpade - प्रसाद घोरपडे

Prasad Ghorpade - प्रसाद घोरपडे

Share

●अध्यक्ष : महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना.
●प्रवक्ता व संघटक : भारतीय मराठा महासंघ (महाराष्ट्र राज्य) सामाजिक कार्यकर्ते.
राजकीय विषय विश्लेषक.

04/06/2026

कोपरखैरणे विभागातील मोडकळीस आलेली गणेश मार्केट या सिडको च्या इमारतीची पाहणी करून तात्काळ महानगरपालिका व सिडको च्या अधिकाऱ्यांना सदर बाब ही किती गंभीर आहे हे दाखवून दिली...
तसेच या विषयाची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार साहेब यांनी कोपरखैरणे वार्ड ऑफिसर भरत धांडे साहेब यांना सूचना देऊन तात्काळ सदर इमारतीला नोटीस बजावत सिडकोला त्याची माहिती दिली...
विशेष म्हणजे आता पोस्ट ऑफिस चे वरिष्ठ अधिकारी व सिडको चे अधिकारी हे या पोस्टातील कामगारांचा व तिथे ये जा करणाऱ्या सामान्य नागरिकांचा जीव किती दिवस धोक्यात घालणार आहे हे पहावे लागेल...

TV9 Marathi BBC News Marathi Pudhari

#प्रसादघोरपडेसडेतोड

02/06/2026

एका गावात स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर होते, तिथे त्यांचा एका भक्त रोज त्यांचे दर्शन करायला येत असे, मनोभावे भक्ती करून दर्शन घेऊन तो तिथून त्याच्या पुढच्या कामाला लागत असे.
पावसाळ्याचे दिवस होते, गुरुवार होता, स्वामी भक्त संध्याकाळ च्या वेळेस मंदिरात नेहमी प्रमाणे दर्शना साठी आला...
जोरदार पावसामुळे नदीला पूर आला अचानक गावात पाणी शिरले, पाण्याचा स्तर गुडघ्यापर्यंत आला, तात्काळ गावातील सगळे लोकं गावा बाहेर जायला लागले, काही समाजसेवक मंदिरा जवळ आले आणि त्या भक्ताला म्हणाले चला लवकर पाणी वाढत चालले आहे... त्यावर त्या भक्ताने त्यांना सांगितलं कि तुम्ही जावा मला माझे स्वामी वाचवतील... 🙏🏻 त्यावर त्या लोकांनी त्याला अनेक विनवण्या केल्या आणि मंदिरा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण तो काही बाहेर आला नाही अन ते पाहून ते लोकं तेथून निघून गेले...
आता हळूहळू पाणी वाढलं आणि पाणी मंदिराच्या छता पर्यंत आल..
तो भक्त मंदिराच्या छतावर जाऊन बसला तेवढ्यात तिथे एक बचाव कार्याची बोट आली, त्यांनी त्या भक्ताला मंदिराच्या छतावर बसलेले पाहिलं आणि त्याला आवाज देऊन बोटीत बसण्यास सांगितले असता तो त्यांनाही बोलला की तुम्ही इथून जावा मला माझे स्वामी वाचवतील...
हे उत्तर ऐकून बचाव कार्यातील लोकांनी त्याला पुन्हा विनवणी केली आणि सांगितले आता पाण्याची पातळी अजून वाढणार आहे त्यामुळे तुझा जीव जाऊ शकतो तू कृपया करून बोटीत बस... त्यावर त्या भक्ताने त्यांना पुन्हा तेच उत्तर दिले आणि त्यांना तिथून जाण्यास सांगितले आणि नाईलाजाने ते बचाव कार्यतील लोक तिथून निघून गेले 🙄
पाण्याची पातळी हळूहळू वाढून मंदिराच्या काळजापर्यंत आली, आणि तो भक्त मंदिराच्या कळसावर जाऊन पळसाला घट्ट धरून बसला.
थोड्याच वेळात तिथे एक बचाव कार्याचे हेलिकॉप्टर आले आणि त्या लोकांनी त्या भक्ताला वरून इशारा करत खाली एक रस्सी सकट एक जवान त्याला वर उचलून घेण्यासाठी उतरवीला... तर त्या भक्ताने त्या जवानालाही तिथून निघून जाण्यास भाग पाडले आणि त्याला सांगितले की तुम्ही जा मला माझे स्वामी वाजवतील...
जास्त वेळ त्या परिस्थिती त संघर्ष करता येत नसल्याने ते बचाव कार्याचे हेलिकॉप्टर तिथून निघून गेले....
आता पाण्याची पातळी वाढली आणि दुर्दैवाने त्या भक्ताचा बुडून मृत्यू झाला... 🙏🏻
तो भक्त स्वर्गात स्वामी समोर आला... आणि त्याने स्वामींना ओरडून रागवून मोठ्या आवाजात बोलून तावतवाने... मी तुमचा भक्त असून एवढी भक्ती करून ही तुम्ही मला का नाही वाचलं अशी विचारणा केली... 😞
त्यावर स्वामींनी त्याला शांतपणे सांगितलं की ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढून गुडघ्यापर्यंत आली त्यावेळेस गावातील लोकांच्या आधी तुला बाहेर काढण्यासाठी जी माणसं पाठवली होती ती मीच पाठवली होती.... त्यांना तू तुज्या मूर्ख पणा मुळे हाकलून दिलं.... तेवढं होऊन ही... मी नंतर एक बोट पाठविली त्यांना ही तू तुझ्या जिद्दी स्वभावाने परत पाठवून दिलंस... ते ही मी माफ करून नंतर तुझ्यासाठी स्पेशल हेलिकॉप्टर पाठवलं, त्या दुसऱ्या व्यक्ती चा जीव धोक्यात घातला... तर तू त्याला ही परत पाठवून दिलंस अन तुझ्या बुद्धी ची पात्रता दाखवलीस... 🤫
तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन तुझ्यावरती आलेल्या संकटात मी तुला तीन वेळा मदत करण्याचा प्रयत्न केला पण तू तो धुडकवलास...
आता सांग बरं यात माझी काय चूक... 😊

आता वरील कथेचा अर्थ आपापल्या परीने घ्यावा 🧎🏻

बाकी तुम्हाला ही सत्य कथा कशी वाटली ही कमेंट मध्ये जरूर सांगा. 👍🏻
fans

31/05/2026

इथून पुढे दारूपीऊन मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई म्हणून सरकार आपल्या टॅक्स चा पैसा आर्थिक मदत म्हणून मृताकांच्या नातेवाईकांना देणार 🤬

29/05/2026

सरकार ला नक्की भीती कशाची?

25/05/2026
23/05/2026

समाजकारण आणि राजकारण करताना सामाजिक भान महत्त्वाचेच.
आपले प्रेम, शुभेच्छा व आशीर्वाद नेहमीच माझ्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारे असतील.
🙏🏻💐🙏🏻 आपले आभार 💐🙏🏻💐

आपला,
प्रसाद घोरपडे

17/05/2026

कमेंट मध्ये सांगा कोना कोणाला माहिती आहे हा आपला #फेमस मराठमोळा तरुण व्यावसायिक अमर भाऊ ?
हा कोणता व्यवसाय, अन कुठे करतो?
आणि कोणी कोणी याच्या हातच्या त्या पदार्थ ची चव घेतली आहे...! 👍🏻

05/05/2026

कमजोर कायदा? 🤬

Want your business to be the top-listed Government Service in NAVI MUMBAI?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Room No E. 01, Plot 2/3, New Satara Society, Sector 14
Navi Mumbai
400709