15/07/2013
इंग्रजीच्या नादापाई
झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा
आता तरी तू मराठीतून बोल.....
इंग्रजीच्या पेपरात
होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा
होतो मराठीत नापास...
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की
पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु
म्हटल्यावर मनात मारते उड्या...
माय झाली मॉम आणि
बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून
श्यान पोर झाली मॅड.....
भांडण करते बायको घरात
बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे
खरा मराठी भाषेला धोका...
मराठी इसरत चालल
शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन
चालू आहे इंग्रजीचे रक्षण...
ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी,
आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष
म्हणजे असतो गुडी पाडवा.....
सावध व्हा मित्रहो,
जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला
सारे मराठी रक्षणासाठी.....
जय महाराष्ट्र...!!
मी मराठी __
15/07/2013
.. तर ४०० कोटी वाचतील: मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर तोफ डागली. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारला दिल्लीत कोणी विचारतही नाही, अशी खिल्ली मोदींनी उडवलीही. शिवाय सरदार सरोवर धरणाची उंची वाढवून वीज निर्मिती केल्यास महाराष्ट्राचे दरवर्षी विजेसाठी खर्ची होणारे ४०० कोटी रूपये वाचतील, असे मोदी म्हणाले.
प्रचार समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिलीच जाहीरसभा पुण्यात घेत मोदींनी निवडणूक प्रचाराचा एक प्रकारे नारळच फोडला. भाषणातून मोदींनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत थेट काँग्रेसला लक्ष्य केले. 'भ्रष्टाचार, घोटाळे आणि महागाईच्या मुद्द्यांमुळे पक्ष जेव्हा-जेव्हा संकटात येतो तेव्हा काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा ओढतो आणि देशाची धर्मनिरपेक्षाता धोक्यात असल्याची भाषा काँग्रेस करतो', अशी सणसणीत टीका मोदींनी केली.
वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या होणाऱ्या अवमुल्यनाला केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप मोदींनी केला. 'एका डॉलरच्या तुलनेत ६० रूपये इतके रूपयाचे अवमुल्यन झाले आहे. हे अवमुल्यन काही दिवसात केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वयापर्यंत जाण्याची चिन्ह आहेत, अशी खिल्लीही मोदींनी उडवली. विशेष म्हणजे देशाच्या पंतप्रधानपदी मनमोहनसिंग यांच्या सारखे अर्थतज्ज्ञ असताना रूपयाचे अवलमुल्यन कसे होते? महागाई का वाढते? असे सवाल उपस्थित करत 'मनमोहनसिंग अर्थशास्त्री नाही तर अनर्थशास्त्री' असल्याची टीकाही मोदींनी केली.
अन्न सुरक्षा विधेयकायवरून मोदींनी केंद्र सरकारच्या नितिमत्तेवरच बोट ठेवला. शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने उत्पादित केलेलं अन्न सडत असताना ते गरिबांना का दिलं जात नाही असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केला? त्यावेळी केंद्रातील काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हे अन्न गरिबांना न देता अन्नपासून मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ६५ पैसे इतक्या कवडीमोल दरात विकले. मद्य निर्मिती कंपन्यांच्या भल्यासाठी सरकारने हे अन्न मुद्दाम सडू दिले, असा आरोप मोदींनी केला.
देशाच्या सीमेत घुसखोरी करून पाकिस्तानी सैन्य भारतीय जवानांचे शीर कापून घेऊन जाते. आणि अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारताकडून बिर्यानी खाऊ घातली जाते, हे कोणते परराष्ट्र धोरण? असा सवाल मोदींनी केला.
15/07/2013
पायात घालायला चपलाही नसणार्या अलकाने जिंकून दाखवलं !
पायात घालायला चपलाही नसणार्या अलकाने जिंकून दाखवलं !
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळी काही आश्चर्यजनक तरीही अनेकांना सुखावणारे निकाल लागले आहेत. त्यातलाच एक निकाल आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या अलका टेकामचा...घरची कमालीची गरीब परिस्थिती, पायात... घालायला चपलाही नसणारी अलका टेकाम ही आदिवासी तरुणी भरघोस मतांनी मनसेकडून घोणसा चिखलगाव गटातून निवडून आली आहे. विरोधी उमेदवार काँग्रेसच्या सुनीता सुरपामचा तिनं दणदणीत पराभव केला. माहुलीच्या या 22 वर्षांच्या अलकाला गावकर्यांनीच पैसे जमवून निवडणुकीला उभं केलं होतं. त्या सगळ्यांच्या कष्टांच चीज झालं असल्याचं अलकानं म्हटलं आहे. यवतमाळ जि.प.मधल्या मनसेच्या त्या पहिल्याच उमेदवार आहे.
15/07/2013
जर राहुल गांधींच्या आजी नि गरिबी हाताव नारा दिला होता आणि जर खरंच हटवली असती तर. राहुल बाबा ला लोकांच्या घरी जाऊन जेवण करायचं नाटक कराव नसत लागलं.
-नरेंद्र मोदी
15/07/2013
हरामखोर सरकार ने पेट्रोल डिझेल चे भाव पुन्हा वाढवले
परवा शुक्रवारीच 1:30 रुपये कमी केले होते आणि आज रात्रि पासून 1:55 रुपये वाढवणार..मग कमी कशाला केले होते
वाढवायला...
च्या आयला यांच्या...मी
15/07/2013
दिग्विजय हा रावणाचा वंशज.
-स्वामी रामदेव
15/07/2013
मायावती म्हणतात कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांना बंदी घाला कारण ते हिंदुत्ववादी आहेत. मग मायावती तुमच्या पण पक्षांवर बंदी घालायची न तुम्ही पण तर एकाच जातीचा प्रचार करता...
आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघा
सगळे आहेत....आमच्या पक्षात...
15/07/2013
♣ मनसे रत्नागिरी विभाग -:
.
→रत्नागिरी महावितरण कार्यालयावर मनसेचा भव्य मोर्चा←
→महावितरणमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे, यासाठी 'मनसे' आक्रमक← तथा,
→कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी तत्वावर घेण्याचा भुमिकेवर 'मनसे' ठाम←
→कंत्राटी कामगारात ९८% असणाऱ्या मराठी कामगारांचा 'मनसे'ला पाठिँबा←
.
।।जय राजसाहेब।।
।।जय मनसे।।
15/07/2013
♣ मनसे नागपुर विभाग -:
.
→विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात 'मनसे'चा सत्ताधाऱ्यांच्या चहा पानावर बहिष्कार←
.
।। जय महाराष्ट्र।।
15/07/2013
माऊलीँचा पालखी सोहळा सुरु आहे सर्व वारकरी संप्रदायाना माझे प्रणाम माझे शुभेच्छा
- नरेंद्र मोदि
मोदिँनी जपली महाराष्ट्राची संस्क्रुती
पुण्यातील सभेत नरेंद्र मोदि मराठित बोलले
15/07/2013
हारणारे नेहमीच
हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच
जिंकत नाहीत...
हारणारेही कधीकधी
असे उडतात..की,
पुन्हा जमिनीवर
उतरत नाहीत..आणि,
जिंकणारे कधीकधी
असे आपटतात..की,
उडायचे पुन्हा स्वप्नही
पाहत नाहीत...
वेळ बदलते...
माणसं बदलतात
आयुष्य कुणासाठीही
थांबत नाही...
बदल हेच आयुष्य
असतं
आणि त्या बदलाचे नाव " महाराष्ट्रनवनिर्माण सेना "
15/07/2013
♣ मनसे मुंबई विभाग -:
.
→मनसे नगरसेवक श्री.संदीप देशपांडेनी केला सेनेचा मुंबई मनपातला ४३७ कोटी ₹ चा भ्रष्टाचार उघड←
→मुंबई महानगर पालिकेत वर्षानुवर्षे ठाण मांडुन बसलेली सत्ताधारी शिवसेना ४३७ कोटी ₹ आणि गहाळ झालेल्या ९००० फाईल्सचा हिशोब देईल का.?←
.
मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी ₹ इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय...
या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी मनसेतर्फे करण्यात आलीय.
→शालेय वस्तू घोटाळा
→औषधं खरेदी घोटाळा
→कचरा घोटाळा
→नालेसफाई घोटाळा
→रस्ते दुरुस्ती निविदांच्या रक्कमेत फेरफार आणि
→९ हजार फाईल्स गायब…
हे घोटाळे कमी होते म्हणून की काय आता महापालिकेच्या तिजोरीत असलेल्या पैशांनाही पाय फुटल्याचं दिसतंय.
मनसेचे आक्रमक नगरसेवक श्री.संदीप देशपांडे यांनी एक नवं प्रकरण उघडकीस आणलंय...
देशपांडे यांच्या दाव्यानुसार, तब्बल ४३७ कोटी ₹ रोख रक्कम महापालिकेच्या अकाऊंटींग प्रक्रियेतून गायब झालीये.
२००८ मध्ये करापोटी आलेली ही रक्कम महापालिकेच्या ताळेबंदात कॅश इन हॅण्ड दाखवली जातेय, पण या रकमेचा हिशेब महापालिकेला देता येत नाहीये.
महापालिकेला आपल्या विविध स्त्रोतातून कर रुपात उत्पन्न मिळतं. दररोज मिळणारी रक्कम नियम पद्धतीनुसार त्याच दिवशी बँकेच्या खात्यात जमा करणं बंधनकारक असतं. काही कारणास्तव हे शक्य न झाल्यास दुस-या दिवशी सकाळी तातडीनं ती रक्कम खात्यात जमा करावीच लागते. त्यानंतर विविध कामांसाठी आवश्यकतेनुसार रक्कम काढली जाते.
मात्र हे नेहमी घडतं का, याबाबत देशपांडे यांनी शंका उपस्थित केलीये.
महापालिकेतल्या गैरव्यवहारांबाबत विधीमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटलेत. अकाऊंटीग आणि लेखापरिक्षण पद्धतीवर तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे ताळेबंदात एवढ्या मोठ्या रकमेचा घोळ उजेडात येताच महापालिकेची तारांबळ उडली आहे. ही रक्कम नेमकी आहे तरी कुठे? ही त्रुटी की लबाडी याचा शोध आता सुरु झालाय.
अद्याप तरी शिवसेनेतुन या प्रकरणावर प्रतिक्रीया आलेली नाही.
.
।।जय राजसाहेब।।
।।जय मनसे।।